कोरोना नंतरचे जग मराठी निबंध | Corona Nantarche Jag Essay in Marathi

Corona Nantarche Jag Essay in Marathi मित्रांनो अनेक वर्षापासून आपल्यामध्ये महामारी चे रोग होते संसर्गजन्य रोग होते. परंतु या रोगांचा आपल्यावर पाहिजे तेवढा घात होत नव्हता. गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्याला कोरोना महामारी सारखा नवीनच आणि अत्यंत घातक व रोगाची माहिती झाली.

कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाला जागीच थांबवले. कॉलेज बंद झाली , बाजारपेठा ठप्प झाल्या , कित्येकांचे आर्थिक नुकसान झाले तर काही जणांचे जगणे देखील मुश्कील झाले.

रोज कष्ट करून जगणाऱ्या लोकांशी तर हाल-अपेष्टा झाली. उपासमारीने मरण्याची वेळ त्यांच्यावर आली. या कोरोना काळामध्ये खूप काही बदल झाले. थोडक्यात कोरोना नंतरचे संपूर्ण जगच बदलले.

आणि या बदलत्या जगा बद्दल आम्ही आजच ” कोरोना नंतरचे जग मराठी निबंध | Corona Nantarche Jag Essay in Marathi “ या लेखांमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पाहूया कोरोना नंतरचे जग मराठी निबंध…

कोरोना नंतरचे जग मराठी निबंध | Corona Nantarche Jag Essay in Marathi

कोरोना व्हायरस चा प्रसार चीन मधील वुहान येथून झाला आणि हळूहळू हा वायरस संपूर्ण जगामध्ये पसरला. कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण जगाला covid-19 या नवीनच रोगाची माहिती मिळाली. संपूर्ण जग या रोगाने ग्रस्त झाले. कित्तेक जण मृत्युमुखी पडले.

एकमेकांसोबत गटामध्ये थट्टा मारत बसणारे संपूर्ण जग एकमेकांपासून दूर झाले कॉलेज विद्यालय शाळा सर्वकाही बंद झाल्या. घराघरांमध्ये नातेवाईकांमध्ये दुरावा पसरला प्रत्येक जण एकमेकांपासून एक फूट अंतरावर राहू लागला. तसेच तोंडाला मास्क तर अत्यावश्यक गरज बनली.

जगभरातील मोठमोठे डॉक्टर तज्ञ वैज्ञानिक या रोगावर उपचार काढण्याचा प्रयत्न करू लागले. हळूहळू वॅक्सिंग आणि प्रतिबंध करणे शक्य होऊन झाली परंतु आज देखील त्यामध्ये संपूर्णता यश मिळाले नाही आज देखील थोड्या प्रमाणात का होईना संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे.

जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही नष्ट न झाल्याने लसीकरण करून घेणे, मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे या गोष्टी नित्य गरजेच्या झालेल्या आहेत. कोरोना काळात मानवी जीवन संपूर्णपणे ढवळून निघाले. त्यामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले, तेच बदल आता यापुढेही राहतील की नाही हे येणाऱ्या काळातच समजेल.

ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही केला नव्हता त्या गोष्टी कोरोना काळाने आपल्याला करायला लावल्या.

कोरोना महामारी यायच्या अगोदर चे जग आणि धोरणानंतर चे जागा यामध्ये खूपच फरक झालेला दिसून येतो.

कोरोना नंतरचे जग मराठी निबंध | Corona Nantarche Jag Essay in Marathi

कोरोनानंतरचे जग हा विषयच खूप रंजक आहे. सध्या मानवी वर्तणूक आणि सहजता यावर झालेले परिणाम पाहता पूर्वीसारखे व्यावसायिक नियम आणि सामाजिक व्यवस्था टिकू शकेल असे दिसत नाही. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यावर धोरणाचा परिणाम झालेला नाही. प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाने आपले ठसा उमटवलेला आहे आणि त्यामध्ये बदल देखील घडून आलेले आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, खेळ, कला, उद्योग, सण-उत्सव या सर्व गोष्टींत कमालीचा परिणाम जाणवू लागला आहे.

कोरोना त्यानंतरच्या काळामध्ये काही चांगले आणि काही वाईट बदल घडून आले तर ते आपण पाहूया.

तंत्रज्ञान हे आजच्या काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाने खूप काही प्रगती केली आहे त्यामुळे नवनवीन गोष्टींचा विकास झाला. या काळामध्ये हे तंत्रज्ञान मानवाच्या खूप काही गरजा पूर्ण करू लागला. माणूस एकमेकांपासून दूर असला quarantine झालेला असला तरी देखील तो एकमेकांना मोबाईलच्या माध्यमातून पाहू लागला आणि बोलू लागला.

तंत्रज्ञानामुळे कोरोना काळात बाहेर फिरणे अशक्य असले तरी लोक मोबाईल आणि संगणक वापरून एकमेकांच्या संपर्कात येत होते. त्यामुळे पूर्वी कामांमध्ये व्यस्त असलेले लोक नातेवाईकांशी मित्रमैत्रिणींशी गप्पा करून यामध्ये त्यांच्या नात्यातील दुरावा कमी झाला आसावा.

संपूर्ण जगात ठप्प झाल्याने लोकांना घरामध्येच राहणे बंधनकारक होते. त्यामुळे लोक विविध कलाकुसरी, पाककृती, योगाभ्यास, व्यायाम प्रकार शिकणे आणि जगण्याचे विविध मापदंड ठरवणे शक्य झाले. घरामध्ये राहू व्यक्ती आपल्या कुटुंबाला वेळ देऊ लागला कुटुंबातील विचारांचे आदान-प्रदान होऊ लागले. थोडक्यात कामांमध्ये व्यस्त असलेला माणूस स्वतःला वेळ देऊन स्वतःच्या कुटुंबाच्या सहवासात राहू लागला.

कोरोना काळाने शाळा महाविद्यालय बंद झाले बरोबर परंतु यातून नवीन मार्ग उदयास आला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टिकोणातून ऑनलाइन शाळा ऑनलाईन क्लासेस ही प्रणाली उदयास आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नातील घर बसून शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. डिजिटल शिक्षण घेणे ही सहज गोष्ट झाली. शिक्षकांशी ऑनलाईन क्लासमध्ये भेटणे देखील नित्याचेच झाले. त्यामध्ये सरकार आणि विविध शैक्षणिक संस्था निवेश करतीलच. कोणतेही प्रमाणपत्र शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरजच भासणार नाही.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झालेले होते अशा विद्यार्थ्यांना अन्य कोणत्याही शहरांमध्ये न जाता नोकरी मिळू लागली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम या पद्धतीमुळे. ज्या वेळी पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता त्या वेळी प्रत्येक जण आपण असलेली नोकरी सोडून आपापल्या घरी परत आले अशावेळी प्रत्येक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही पद्धती स्वीकारले त्यामुळे तरुणांना आपले घर न सोडता घरी बसूनच पैसे कमी होण्याचा एक मार्ग उघडला. सर्व पगार आणि आर्थिक व्यवहार ऑनलाईनच केले जातील. त्यामुळे व्यक्ती एकमेकांच्या संपर्कामध्ये कमी येऊ लागेल त्यामुळे हा महामारी चा प्रसार कमी झाला.

कोरोनानंतर जगात झालेल्या बदलांना सामोरे जाणे आणि स्वतःच्या राहणीमानात बदल करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप गरजेचेच आहे. लग्नसराई, सांस्कृतिक सण – समारंभ हे तर काही लोकांच्या उपस्थितीत होऊ लागले आहेत. त्यामुळे लग्नाचा खर्च कमी झाला आणि आई-वडील आपल्या मुलींचे लग्न कमी खर्चामध्ये करू लागले. या मुळे खूप जणांचे आयुष्य देखील बदलले.लग्नातील खर्च आणि सांस्कृतिक देखावा यापुढे असणार नाही, अशी लक्षणे सध्या दिसत आहेत.

अशाप्रकारे नंतरच्या जगामध्ये खूप काही चांगले बदल झाले त्या सोबतच काही वाईट देखील बदल घडले ते म्हणजे-

घरामध्ये बसून असल्याने मेक मोबाईल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर जास्त प्रमाणात करु लागला त्यामुळे डोके दुखी, कंबर दुखी आणि डोळ्यांचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढू लागले.

कोरोना काळामुळे बहुतांश व्यक्ती हे आप आपली नोकरी सोडून घरी आहे त्यामुळे अशा व्यक्तींचे आर्थिक परिस्थिती खूपच खालावली त्यांचे जगणे मुश्किल झाले.

कोरोना काळानंतर देखील काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीचा शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थी घरबसल्याच शिकत आहेत परंतु असे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढे ज्ञान मिळत नाहीत त्यांचा शंका-कुशंका चे निरसन होत नाही.

भारतीय संस्कृती मध्ये एक विकास साजरे करत असणारे सण-उत्सव बंद झाले त्यामुळे आपली संस्कृती देखील थांबलेली आहे असे वाटत आहे.

असे असले तरी देखील कोरोना नंतर जग हे खूपच आगळेवेगळे झाले आहे यामध्ये काही गोष्टी या खूपच चांगल्या आहेत तर काही गोष्टींचे दुष्परिणाम देखील दिसत आहे. परंतु कसेही असले तरी आपल्याला या जगाचा सामना करावाच लागेल. या जगामध्ये रहात असताना जगाच्या नियमांन सोबत स्वतःला देखील बदलले खूप आवश्यक आहे.

कोविड उपचार केंद्र, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन कोर्सेस, ऑनलाईन खरेदी, हे बदल मुख्यत्वे आपणाला यापुढे देखील पाहायला मिळतील. सर्व काही ऑनलाईन विकत घेता येऊ शकेल. ऑनलाईन कामाच्या संधी देखील उपलब्ध होऊ लागतील.

दवाखाने आणि वैद्यकीय क्षेत्र हे बऱ्यापैकी सुधारित आवृत्तीत पुढे येऊ शकतील. कारण कोरोनामुळे सर्व लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल सावधान झालेले आहेत. गर्दीत नियमित मास्क वापरणे हा देखील नियम येऊ शकेल. कोरोना नंतरचे जग हे संपूर्णतः वेगळे जग असेल जेथे जगण्याची पध्दती, काम, शिक्षण आणि कौटुंबिक मापदंड बदललेले असतील.

आणि अशा या कोरोना नंतरच्या बदललेल्या जगाचा सामना प्रत्येक व्यक्तीला करावाच लागेल.

मित्रांनो हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

तर मित्रांनो ! ” कोरोना नंतरचे जग मराठी निबंध | Corona Nantarche Jag Essay in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment