वाचाल तर वाचाल मराठी निबंध ” Vachal Tar Vachal” । If You Read, Read Marathi Essay

वाचाल तर वाचाल मराठी निबंध ” Vachal Tar Vachal” । If You Read, Read Marathi Essay

वाचनाची आवड ही प्रत्येकालाच असते असे नाही पण ज्या व्यक्तींना वाचनाची आवड असते ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. ” वाचाल तर वाचाल ” ह्या वाक्यातूनच आपल्याला वाचनाचे महत्त्व कळते की,

जो व्यक्ती नव- नवीन गोष्टी वाचण्याचा छंद बाळगतो त्याला नक्कीच अमूल्य असते. जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना प्राप्त झाला तर यश आपल्याजवळ चालून येते.

म्हणून आजच्या निबंधा मध्ये वाचनाचे महत्त्व घेऊन येत आहोत एक निबंध द्वारे तो म्हणजे ” वाचाल तर वाचाल“.

वाचाल तर वाचाल मराठी निबंध ” Vachal Tar Vachal” । If You Read, Read Marathi Essay

वाचाल तर वाचाल मराठी निबंध :

‘ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांचा अमूल्य असा विचार म्हणजे ” वाचाल तर वाचाल ” हा सर्वांसाठी अमूल्य असा संदेश देतो. प्राचीन काळापासून ज्ञान आणि वाचन यांचे नाते अगदी जवळचे असल्याचे दिसते.

ज्ञान पाहिजे असेल तर वाचन करावेच लागेल आणि वाचन असेल तर ज्ञान प्राप्त होतेच ज्ञान आणि वाचन या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. कोणाला ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आपल्याला वाचन करणे गरजेचे आहे.

आजचे जग हे तर दिवसेंदिवस जास्तच स्पर्धात्मक होत चालले आहे. ह्या स्पर्धात्मक जगात टिकून राहायचे असेल तर ज्ञान मिळवावे लागेल आणि ज्ञान मिळवून यशस्वी होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज भासते.

ज्या व्यक्तीच्या अंगी वाचन हा गुण असेल त्या व्यक्तीचे आयुष्य हे चांगलेच घडते. आजच्या या आधुनिक काळात ज्ञान प्राप्तीचे अनेक साधने उपलब्ध झालीत पण त्या सर्वांमध्ये वाचन हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.

संपूर्ण जीवन बदलून टाकण्याची ताकद एकट्या वाचनामध्ये आहे. म्हणून माणसाने वाचनाला आपला मित्र बनविला पाहिजे पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे.

ज्या व्यक्तींनी पुस्तकांशी मैत्री करून वाचनाची आवड जोपासली ते व्यक्ती एक आदर्श व्यक्तिमत्व घडवितात. वाचन हा गुण अंगी असेल तर आपल्याला एकटेपणा वाटणार नाही, कोणाच्या साथीची, सोबतीची गरज भासणार नाही आणि बोलण्यासाठी सुद्धा कोणाची गरज वाटणार नाही.

वाचन करणे ही एक उत्तम सवय आहे. आपल्याला वाचन करण्याची आवड असेल तर आपण आपला अमूल्य अशा वेळ कुठे ही गप्पा मारण्यात, आळस करण्यात, झोपण्यात वाया न घालवता तो वाचनात जातो व वाचनातून अनेक नवीन विचार, सुंदर विचार आपल्यापर्यंत पोहोचतात.

वाचन करून त्या वाचनातून मिळालेल्या ज्ञानाच्या साह्याने कितीतरी जणांनी आपले आयुष्य चांगला मार्गाला घेऊन जाऊन आयुष्यात यश प्राप्ती केली आहे. म्हणून म्हणतात की, ” वाचनाशी होईल मैत्री, यशाची मिळेल खात्री”.

वाचनाची आवड असणे खूप गरजेचे बाब आहे. आणि ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे त्यांनी वाचनाला आपले मित्र बनविले पाहिजे. एखाद्या क्षेत्रात जर काम करायचे असेल तर आपल्याला त्या क्षेत्रा बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे आणि ती माहिती मिळते म्हणजे फक्त आणि फक्त वाचनातूनच आणि त्यामुळे आपली ज्ञानगंगा परिपूर्ण होते व त्या क्षेत्रात आपल्याला यश मिळते.

पण आजच्या या आधुनिक काळाची प्रगती झपाट्याने झाल्याने सर्वजण कामात गुंतलेले दिसत आहेत. मोबाईल, संगणक, टीव्ही अशी उपकरणे बाजार पेठेत सहज उपलब्ध झाल्याने लोकांची वाचनाची सवय मोडत आहेत.

जास्त वेळ सर्वजण मनोरंजनामध्ये वाया घालवत आहेत. त्यामुळे वाचनाकडे सर्वांचा कल कमी होताना दिसत आहे. अलीकडे सर्वजण वाचनामुळे मिळणाऱ्या ज्ञाना कडे दुर्लक्ष करीत आहेत.

वाचनामुळे आपल्याला बोलण्याची आवड निर्माण होते. आपले विचार, मुद्दे इतरांना व्यवस्थित स्पष्टपणे समजून सांगण्याची ज्ञान मिळते. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना कसे बोलावे, आपली मते कशी पटवून द्यावी याचे आकलन वाचनामुळे होते. तसेच महत्त्वाचे म्हणजे वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते व आपल्या मेंदूला चालना मिळते व आपण तणावमुक्त सुद्धा राहतो.

खरं तर वाचनाची सवय ही लहानपणापासून अंगी असावी व ती पुढे तशीच जोपासली पाहिजे कारण लहान वयात एखाद्या गोष्टीची सवय शरीराला लागली असेल तर ती तसेच राहते.

वाचन हा असा खजिना आहे तो कधीही संपत नाही. आणि त्यामुळे ज्ञान हा मौल्यवान खजिना आपल्या पर्यंत येतो. उत्तम वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये आणखी चांगले बदल घडून येतात. म्हणतात ना आपण ज्या व्यक्तीच्या सहवासात राहतो त्याच व्यक्तीचे गुण आपल्या मध्ये येतात, वाचनाचे सुद्धा असेच आहे आपण जे वाचतो तेच ज्ञान आपल्याला मिळते.

म्हणून वाचन करताना सुद्धा विचार करून वाचले पाहिजे. काहीही न वाचता ज्या गोष्टींमुळे आपल्याला ज्ञान मिळेल, आयुष्यात यश मिळेल व चांगली व्यक्ती महत्त्व घडविण्यास मदत होईल असे विचार आपण वाचले पाहिजे.

” वाचन केल्यानी मिळते ज्ञान,

  दुर पळते आपले अज्ञान “

असे म्हणणे बरोबरच आहे. कारण वाचन हा एक मात्र असा मार्ग आहे ज्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींचे, क्षेत्राचे पाहिजे तेवढे ज्ञान मिळते व आपल्या मध्ये असलेल्या अज्ञानाचे डोंगर दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडतो.

म्हणून वाचनाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला असता ” वाचाल तर वाचाल” ही म्हण खरी झाली आहे. वाचनाने व्यक्ती समृद्ध बनतात, विचारांची तर्कता वाढते, नव- नवीन विचार करण्याची क्षमता प्राप्त होते; कल्पना शक्ती वाढते, बोलण्याचा वेग वाढतो.

वाचनाची आवड असेल तर लिहिलेल्या वाक्याचा, शब्दाचा व मजकुराचा अर्थ कळतो अन्यथा अनेकदा चुकीच्या वाचन्यामुळे अनर्थ सुद्धा होतात. हा चांगले न वाचण्याचा दुष्परिणाम आहे. म्हणून बरेचदा आपण वाचनाला कंटाळा करून महत्त्वाची कागदपत्रे न वाचता त्यावर सही करतो त्यामुळे लोक याचा गैरफायदा घेतात व आपली फसवणूक होते.

आज वाचनाची आवड कमी झाल्यामुळे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत नापास होतात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा वाचनाला कंटाळा करतात परिणामी परीक्षेत अनपेक्षित गुण मिळतात.

अध्ययन आणि अध्यापनामध्ये वाचनाला फार महत्त्व आहे. शालेय- महाविद्यालयीन पुस्तकांसोबतच विद्यार्थींनी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनास सुरुवात करावी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाचण्याची गोडी निर्माण होईल.

पण आज जीवन गतिमान झाले आहे. कामे जास्त आणि वेळ कमी भासत आहे. त्यामुळे आपण वाचन या छंदा पासून दूर जात आहोत. एखादे पुस्तक वाचावे म्हणले तरी सुद्धा आपल्याला कंटाळा वाटत आहे.

पुस्तके ही ज्ञान दायी असतात पण आपल्याला या पुस्तक वाचण्यापेक्षा मोबाईल टीव्ही पाहणे अधिक चांगले वाटू लागले आहे. त्यामुळे अलीकडे ” वाचन संस्कृती ” नाहीसे होताना दिसत आहे. वाचनाची आवड राहिली ती फक्त आपल्या आजी- आजोबांच्या काळातील लोकांनाच तेच लोक रोज वर्तमानपत्र, नव- नवीन पुस्तके, पुरातन काळातील कथा वाचताना दिसतात.

आजच्या काळातील किंचितच लोक वाचताना दिसत आहेत. आज सर्व वाचनालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. येथे वाचनालया पेक्षा सिनेमा गृह, हॉटेल अशा ठिकाणी गर्दी दिसत आहे.

वाचनाने मनुष्य ज्ञानी होतो. आणि ते मिळालेले ज्ञान हे खूप मौल्यवान असते ज्ञानाची तुलना ही पैसा, सोने- चांदी, दागिने यांसोबत होत नाही. ज्ञान हे यापेक्षाही किमती आहे हे आजची पिढी विसरत आहे व म्हणूनच ती वाचना पासून दूर जात आहे.

पुस्तके नव्या जगाचे, व उज्ज्वल भविष्याचे एक सुवर्ण स्वप्न साकारण्यासाठी मदत करीत असतात. जगातील विविध घडामोडींची , ठिकाणांची, संस्कृतींची माहिती वाचनामुळे प्राप्त होते. आपला भारत देश हा विविधतेने अनेक परंपरेने नटलेला देश आहे.

या देशाचा इतिहास हा खूप सहासमयी व धाडसी आहे. अनेक थोर- महान पुरुष आपल्या देशात होऊन गेलेले आहेत. महा-भारत, गीता यांसारखे महाकाव्य झालेली आहेत व त्यांची पुस्तके, कथा सुद्धा उपलब्ध आहेत मग हे सारे ज्ञान आपल्याला फक्त वाचना मधून मिळते म्हणून ही पुस्तके आपण वाचलेच पाहिजेत !

आपल्याला चांगले व्यक्ती महत्त्व घडवायचे असेल तर आजू- बाजूला होणाऱ्या घडामोडींचा कल्पना असणे गरजेचे आहे आणि ते जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्र वाचणे बंधनकारक आहे.

आजच्या आपल्या पिढीला वाचनाची खूप गरज आहे. आणि ही गरज पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. वाचनामुळे आपला विकास होतो. आणि वाचनाला आपण योग्य दर्जा दिला नाही तर आपले हाल हे ” वाचाल तर वाचाल ” या म्हण प्रमाणे होईल हे मात्र नक्कीच !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-