पृथ्वीवर झाडे नसती तर मराठी निबंध । If There Are No Trees on Earth Essay in Marathi

पृथ्वीवर झाडे नसती तर मराठी निबंध । If There Are No Trees on Earth Essay in Marathi

आपल्या पर्यावरणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला बघायला मिळतात. आणि याच झाडां मुळे आपले पर्यावरण स्वच्छ, सुंदर दिसते.

जर आपण विचार केला किंवा कल्पना जरी केली की, निसर्गातील ही झाडे अचानक नाहीशी झाली किंवा गायब झाली तर काय होईल ?

पृथ्वीवर झाडे नसती तर मराठी निबंध । If There Are No Trees on Earth Essay in Marathi

तरी याच कल्पनेचा विचार करून आपण आज ” झाडे नसतील तर…… ” हा निबंध बघणार आहोत. आपल्या पृथ्वीवर झाडे आहेत म्हणून ही सजीव सृष्टी ऊर्जा आहे आणि जीवनाचे नव नवीन स्त्रोत आहेत. आपण म्हणतो की, झाडे आहेत म्हणून जीवन आहे.

विविध प्रकारच्या झाडांच्या सौंदर्याबद्दल आपल्याला आकर्षक वाटते, झाडांचे मानवी जीवना मध्ये काय उपयोग आहे हे आपण विचार करतो. परंतु जेव्हा पृथ्वी वरील ही नसतात तेव्हा

आपण चालू परिस्थिती बद्दल बोलणे अशक्य आहे कारण झाडे नाहीत अशी कल्पना करणे फार कठीण आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे झाडे नसतील तर मानवी जीवन सुद्धा अस्तित्वात राहणार नाही.

पृथ्वीवर झाडे नष्ट झाली तर :

पृथ्वीवरील सर्व झाले नष्ट झाली तर हे सर्व सजीव सृष्टी वर खूप भयानक परिणाम दिसून येतील आणि सजीव जीवन हे हवा, पाणी आणि अन्न या गोष्टींवर अवलंबून असते.

ऑक्सीजन शिवाय आपण काही मिनिट सुद्धा जगू शकत नाही आणि वातावरणात ऑक्सिजन पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम ही विविध प्रकारचे झाडे आणि रोपे करीत असतात, म्हणून झाडे ही निसर्गाने दिलेली सर्वात महत्त्वाची देणगी आहे.

झाडे ऑक्सिजन देतातच पण सोबत आपण कार्बन-डाय-ऑक्‍साईड शरीराच्या बाहेर टाकतो तो पण झाडे शोषून घेतात त्यामुळे सर्व वातावरण निर्मळ राहते.

मग ही एवढी महत्त्वाची झाडे नसतील तर आपण कसे जगलो असतो. झाडे नसतील तर कशी कल्पना केल्यास ऑक्सीजन साठी सर्वांच्या पाठीवर ऑक्सिजन टाकी आणि तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून जगावे लागले असते.

झाडे नसती तर काय झाले असते :

जर झाडे नाहीशी झाली तर संपूर्ण वातावरण आणि हा निसर्ग रंगहीन दिसला असता झाडे आपल्याला फक्त प्राणवायूचा नव्हे तर इतर अनेक गोष्टी देतात. झाडांपासून आपल्याला अन्न मिळते फळे मिळतात.

मग ही झाडे नसतील तर आपल्याला अन्न मिळणार तर कुठून ? असा प्रश्न आपण सर्वांसमोर उभा राहतो. तसेच झाडांच्या लाकडांपासून अनेक फायदा होतो.

घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू टेबल, खुर्ची, कपाट अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फर्निचरच्या वस्तू याच झाडांच्या लाकडांपासून होतात. झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवना मध्ये होतो.

अनेक झाडे आपल्याला आयुष्या मध्ये विविध रोगांवर मात करण्यासाठी सुद्धा केला जातो. झाडांमध्ये औषधी गुण असतात आणि त्याचा उपयोग करून अनेक रोग, महामारी सुद्धा दूर केल्या जातात.

झाडांच्या पानांचा उपयोग डेकोरेशन मध्ये करतात तसेच काही झाडांची पाने घराला तोरण बांधण्यासाठी वापरतात. तर काही झाडांना धार्मिक आणि प्राचीन काळापासून महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे.

महत्त्वाचे म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात वापरला जाणारा पेपर झाडांपासून बनविला जातो. अशाप्रकारे ही झाडे आपल्याला खूप फायदेशीर ठरतात.

मग ही महत्त्वपूर्ण झाडे नसतील तर या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला होणार नाही. झाडांपासून मिळणारे कुठल्याही गोष्टीचा लाभ आपल्याला होणार नाही. झाडे आपल्याला सावली देतात उन्हा पासून आपला बचाव करतात. थंडगार वारे झाडेच आपल्याला देतात. मग ही झाडे नाहीशी झाली तर सर्वत्र उन्हच दिसेल.

कडाक्याच्या उन्हाचे चटके आपल्याला बसतील. कुठेही फुलांच्या फळांच्या बागा दिसणार नाहीत. सगळीकडे दगड- धोंडे आणि कडाक्याचे उन्हच पसरलेले दिसेल. झाडांवर अवलंबून असणारे पक्षी कुठे जाणार पक्षी राहणार कुठे आणि खाणार तरी काय ? किती भयानक परिस्थिती निर्माण होईल बापरे !

जर झाडे नसतील तर :

झाडांन शिवाय कुठल्याही सजीव प्राण्याला खाण्यासाठी अन्न मिळणार नाही. झाडां विना जगणे कठीण होईल नुसतं कठीणच नव्हे तर झाडे नसतील तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार तरी कसा आणि ऑक्सिजन नसेल तर आपण जगूच शकणार नाही.

जर ही झाडे नसतील तर ह्या पृथ्वीवर जगणे अशक्य होईल. झाडांशिवाय संपूर्ण वातावरण बदलून जाईल. वातावरणा मध्ये उन्हाचे प्रमाण वाढेल त्यामुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होईल आणि अशा परिस्थितीत कुठल्याही सजीव जिवंत राहू शकत नाही. झाडे ही पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

जर ही झाडे नसतील तर वातावरणातील पावसाचे प्रमाण कमी होईल. आणि पाऊस पडला नाही तर आपल्याला पाणी मिळणार तरी कसे ?

पृथ्वीवर झाडे नसती तर :

सगळी जमीन कोरडी पडेल, नदी, नाले, तलाव सुद्धा कोरडी होतील. जंगले नाहीशी होतील सर्व प्राणी जीवन नष्ट होईल व कुठेही हिरवळ दिसणार नाही गवत ही दिसणार नाही सगळीकडे फक्त उन्हाचे साम्राज्य दिसेल.

दगड- धोंडे आणि माती व कडाक्याचे उन्ह येवढेच या पृथ्वीवर राहील बाकी सर्व सजीव सजीव सृष्टी संपुष्टात येईल या सुंदर पृथ्वीचे रूपांतर एक बंजर वाळवंटामध्ये होईल.

म्हणून आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना खूप महत्त्व दिले होते. ते तुळस, वड, आणि पिंपळ या वृक्षांची पूजा सुद्धा करत होते.

तसेच आपले पूर्वज बेल, तुळस आणि दुर्वा या वनस्पतींना देवतांच्या पूजेमध्ये स्थान दिलेले आणि ती परंपरा आपण आजही जोपासत आलेलो आहोत.

आपण सोने-चांदी, खनिजे यांना संपत्ती समजतो तसेच झाडे सुद्धा एक प्रकारची संपत्तीच आहे. म्हणून माणसाला व या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव जीवाला झाडांची आवश्यकता फार पूर्वीच्या काळापासून आहे. म्हणून आपले पूर्वज म्हणत की,

” वृक्षवल्ली आम्हा, सोयरी वनचरी” झाडे ही आपली सर्वात महत्त्वाची आवश्‍यकता आहेत आणि याच झाडांमुळे आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात.

अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या गरजा पुरवण्या मागे झाडांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. या पलीकडे म्हणजे विविध रोगांवर उपचारां साठी लागणारी औषधे या झाडांपासून तयार करण्यात येत आहेत.

विविध रोगांवर मात करण्यासाठी झाडे उपयुक्त ठरत आहेत. पण आज पृथ्वीवर झाडांची अवस्था खूप बिकट होताना दिसत आहे. शहरीकरणा साठी आणि उद्योग-धंद्यां साठी वृक्षतोड केली जात आहे.

जंगले तोडून नव्याने वस्ती करत आहेत. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. वृक्षतोडी मुळे जंगली प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आणि पावसाचे प्रमाण सुद्धा कमी झाले.

आणि तापमान वाढलं आहे. असे अनेक दुष्परिणाम फक्त झाडांची संख्या कमी झाल्याने होत आहेत. तर मग विचार करा ही झाडे नसतील तर काय काय होईल ?

सजीव हा या पृथ्वीवर असाच पिढ्या न पिढ्या टिकून राहायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम झाडे ठेवावी लागतील व पर्यावरण संतुलित ठेवावा लागेल तरच ही पृथ्वी ” सुजलाम सुफलाम” होईल.

म्हणून देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, झाडांची संख्या कमी न होऊ देणे, प्रत्येकाने एक तरी झाड लावून आपल्या पर्यावरणाला मदत केली पाहिजे.

आपल्याला सुखी व आनंदी जीवन जगायचे असेल तर आपण झाडांचे प्रमाण सुद्धा वाढविले पाहिजे आणि वृक्षतोड थांबवली पाहिजे. झाडे ही आपली मित्र आहेत आणि आपण ही मित्रता जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-