मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध । Essay On Mobile Phone Uses And Misuses

मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध । Essay On Mobile Phone Uses And Misuses

आज आपण आपल्या आजू बाजूला फक्त नजर फिरवली तर आपल्याला दिसून येईल की, लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण मोबाईल घेऊन बसलेले असतील.

मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे समजणे हे आजच्या या पिढीला खूप महत्वाचे आहे विनाकारण मुलांना मोबाईलचे अतिरिक्त वेड लागलेले दिसेल.

सर्वजण मोबाईलच्या अभावी असल्याचे दिसेल. तरी आजच्या निबंधा मध्ये आपण ” मोबाईल फोन” यावर सविस्तर माहिती बघणार आहोत.

मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध । Essay On Mobile Phone Uses And Misuses

मोबाईल चा शोध कोणी लावला :

मोबाईल फोन हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण ( यंत्र ) असून याचा उपयोग विविध प्रकारे होतो. मोबाईल फोन ला मराठी भाषेत भ्रमणध्वनी म्हणतात.

भ्रमणध्वनी म्हणजेच संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करणारे यंत्र. जो जॉन एफ् मिशेल आणि मार्टिन कूपर यांनी शोध लावला.

मोबाईल चा शोध केव्हा लागला :

सर्वप्रथम मोबाईलचा शोध हा सन 1973 मध्ये मोटोरोला नावाच्या कंपनीने लावला होता व जो जॉन एफ् मिशेल आणि मार्टिन कूपर यांनी मिळून तयार केला होता.

आणि तेव्हा पासून आज पर्यंत ह्या मोबाईल फोन मध्ये अनेक बदल घडत आलेले आहेत.

मोबाईलच्या आकारात रचनेत त्याच्या वापर करण्याच्या पद्धतीत व त्यातील बदलत जाणाऱ्या नवनवीन संरचनेत दिवसेंदिवस बदल होत चालले आहे.

मोबाईल फोनचा वापर :

आजच्या आधुनिक काळात व वाढत जाणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे आज मोबाईल फोनचा वापर सर्वत्र क्षेत्रात होत असल्याचे दिसून येत आहे.

घरगुती जीवनात ही मोबाईल फोनने अनन्य साधारण दर्जा प्राप्त केले आहे. आज सर्वत्र मोबाईल फोनचेच राज्य असल्याचे दिसत आहे. मोबाईल फोनमुळे सर्व गोष्टी सहज प्राप्त होताना दिसत आहेत.

म्हणून आज मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर होत आहे. म्हणून मोबाईल फोन ही आजच्या काळात चैन्येची गोष्ट नसून जीवनाश्यक गोष्ट बनली आहे.

मोबाईल मुळे आपल्याला नव- नवीन गोष्टी, ज्ञान, कल्पना जरी मिळत असतील तरी सुद्धा मोबाईल फोनचे फायदे खूप असल्याने तेचा अतिरिक्त वापर केल्यावर आपल्या शारीरिक स्वास्थ्य साठी धोकादायक ठरू शकतो, म्हणून मोबाईल फोनचा वापर हा मर्यादित करावा.

मोबाईल फोनचे उपयोग / फायदे :

मोबाईल फोन हे प्रकारे उपयुक्त यंत्र आहे. आपल्या रोजच्या जीवनात विविध मार्गांनी मोबाईल फोनचा वापर आपल्याला होतो. मोबाईल फोनचे अनेक उपयोग आहेत यातील काही येतील पुढील प्रमाणे :

बोलण्यासाठी उपयुक्त :

जेव्हा मोबाईल फोन तयार झाला तेव्हा तो फक्त बोलण्यासाठी वापरला जात होता. आज त्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत.

पण एकमेकांशी संवाद साधने म्हणजेच बोलणे हा मोबाईल फोनचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे. मोबाईल फोनचा वापर करून आपण कोणत्याही व्यक्तीशी कधीही आणि कुठेही सहज संपर्क साधू शकतो.

मोबाईल फोन द्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीशी बोलणे सहज शक्य झाले आहे. मोबाईल फोनचे वजन हलके / कमी असल्याने आपण मोबाईल फोन आपल्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतो. त्याचा आकार हा लहान असल्याने तो पॅन्टच्या किंवा शर्टाच्या खिशात सहज समावतो.

मनोरंजनाचे साधन :

आजच्या काळात मोबाईल फोन बोलण्या व्यतिरिक्त अनेक प्रकारे वापरला जातो. त्यातील महत्त्वाचा उपयोग म्हणजे एक मनोरंजनाचे साधन म्हणून हा मोबाईल फोन खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

मोबाईल च्या मदतीने आपण गाणे ऐकू शकतो, व्हिडीओ बघू शकतो, सिनेमा, गेम अशा प्रकारे मोबाईलचा वापर करून आपण आपली वेळ घालू शकतो. तसेच स्त्रिया मोबाईल च्या मदतीने वेगवेगळी कौशल्ये शिकत आहेत आणि पैसे सुद्धा कमवत आहेत.

इंटरनेट चालविण्यासाठी उपयुक्त :

मोबाईल फोनच्या मदतीने आपण कधीही आणि कुठेही सहजपणे इंटरनेट चालू शकतो. व त्याच्या मदतीने आपल्याला नव- नवीन गोष्टी शिकायला मिळतात.

कुठल्या जागात काय चालू आहे हे सहजपणे समजते. जगभरातील कोणत्याही ठिकाणाची माहिती सहज प्राप्त होते.

सोशल मीडिया वापरण्यासाठी :

मोबाईल फोनच्या साह्याने आपण सोशल मीडिया वापरू शकतो. विविध प्रकारच्या ॲप्स चा वापर करून मनोरंजन कार्यक्रम, संवाद साधने, व्हिडिओ कॉल, चॅटिंग असे विविध प्रकारच्या पर्यायांचा लाभ घेऊ शकतो व विविध प्रकारची माहिती मिळवून ज्ञान मिळू शकतो.

व्यावसाय क्षेत्रात उपयुक्त :

आज मोबाईल फोन ने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे त्यातील बहुतेक व्यवसाय हे मोबाईल फोनच्या साह्याने केले जातात. त्यामुळे घर बसल्या अनेक व्यवहार ठरवले जातात.

एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यांशी काही मिनिटातचं संपर्क साधून व्यापार ठरवतो. त्यामुळे आपली वेळ वाचते व आपला व्यवसाय दुप्पट मध्ये वाढ होते.

शिक्षण क्षेत्रात उपयुक्त :

मोबाईल फोन विविध क्षेत्रात प्रगती तर केलीच त्यासोबत शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोबाईलचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. अभ्यासा बाबतीत काही अडचण आल्यास मोबाईल मुळे सोडविणे सहज शक्य झाले.

छायाचित्रण काढण्यासाठी :

काही वर्षा पूर्वी एखादा फोटो काढायचे म्हणजे फोटोग्राफरला बोलवावे लागेत त्यासाठी आर्थिक खर्च सुद्धा होत पण त्या मोबाईल फोन आल्यामुळे फोटो काढणे, व्हिडिओ काढणे सहज शक्य झाले आहे.

बँक सुविधा :

आजच्या गुंतागुंतीच्या काळात आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेच्या समोर उभा राहण्याची गरज नाही किंवा बँकेत सुद्धा जायची गरज नाही.

आज घर बसल्या आपण मोबाईल च्या मदतीने बँकेचा व्यवहार करू शकतो. तसेच मोबाईल मध्ये आपण ऑनलाईन क्षेत्रातील सर्व कामे घरबसल्या करू शकतो.

मोबाईल फोन चे दुष्परिणाम / मोबाईल फोन चे तोटे  :

  1. मोबाईल फोनचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. आपण मोबाईल फोनचा वापर करून आपले जीवन सोयीस्कर करत आहोत पण मोबाईल फोन मुळे आपले किती नुकसान होत आहे याकडे दुर्लक्ष करीत आहोत.
  2. बरेचसे लोक मोबाईलचा अतिवापर करतात त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. मोबाईल फोन मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात ते शरीरासाठी अपायकारक असतात.
  3. विशेषतः लहान मुलांसाठी हे ( हाय इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड ) खूप आणि कारक ठरतात. मेंदूसाठी व रक्तासाठी हानिकारक ठरतात. मोबाईलच्या अति वापरामुळे डोकेदुखी, टेन्शन वाढते.
  4. मोबाईल मुळे शरीराच्या हालचाली कमी झाल्या आहेत त्यामुळे आळस हा वाढत जात आहे.
  5. मोबाईल फोनच्या वापरामुळे लोक मनोरंजन, गेम यांच्या आहारी जात आहेत त्यामुळे वेळेचे भान राहीना व आपली महत्त्वपूर्ण वेळ वाया जात आहे.
  6. मोबाईल पासून निघणाऱ्या रेडिएशनचा वेग हा ८८४ Mh २ इतका आहे. त्यामुळे अतिरेक झोपेचे प्रमाण वाढत आहे. आणि अतिरेक झोपेमुळे शरीरावर घातक परिणाम होतो.
  7. मोबाईल पासून निघणाऱ्या इलेक्ट्रॉनिक रेडिएशन चा सर्वात वाईट परिणाम हा मनुष्याच्या ब्रेन वर होतो. त्यामुळे अलीकडे ब्रेन ट्यूमरचे प्रमाण वाढत आहे.
  8. मोबाईलचा अतिरिक्त वापर वाढल्यामुळे लोक वाहने चालविताना सुद्धा मोबाईलवर बोलतात त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
  9. मोबाईल फोनच्या / सेलफोनच्या अतिवापरामुळे एकाग्रता भंग होते त्यामुळे मानसिक ताण वाढतो. अशाप्रकारे मोबाईल फोन आपल्या दैनंदिन जीवनावर घात करतो.

निष्कर्ष :

मोबाईल फोन हा आपल्या जीवनासाठी उपयुक्त तर आहेच सोबत त्याचे परिणाम सुद्धा आहेत. म्हणून मोबाईलचा वापर हा मर्यादित गरजेपुरताच करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

मोबाईल ही एक चैन्येची आणि आपल्या मदत करणारी गोष्ट आहे त्याचा वापर आपल्याला पाहिजे तेवढाच करावा व मोबाईल जीवनावश्यक साधनांमध्ये जोडणे चुकीचे आहे.

मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे आरोग्यावर सुरक्षिततेवर परिणाम होतो, जर आपल्याला आपले जीवन सुखी, समाधानी ठेवायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजे पुरता करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि मोबाईल फोनच्या कमी वापरणे आपले आरोग्य निरोगी राहील हे मात्र नक्कीच !!


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रानो !