संगणक वर मराठी निबंध । Essay on Computer Information in Marathi

संगणक वर मराठी निबंध । Essay on Computer Information in Marathi

प्रस्तावना :

संपूर्ण सृष्टीवर मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो बुद्धिमान प्राणी आहे. मानवाकडे विचार करण्याची शक्ती आहे. नव- नवीन बदल घडवण्यामध्ये मानवाने खूप प्रगती केली आहे. याच प्रगतीमधील एक महत्त्वपूर्ण शोध म्हणजेच संगणक होय.

संगणक निबंध 

संगणकाला इंग्लिश भाषेमध्ये कॉम्प्युटर ( Computer ) असे म्हणतात. Computer चा अर्थ अस की,

C – Commonly

O – Operated

M – Machine

P – Particularly

U – Used

T – Technical

E – Education

R – Research

संगणक वर मराठी निबंध । Essay on Computer Information in Marathi

Table of Contents

Computer हा शब्द Compute ( कोम्प्युट ) या इंग्लिश क्रियापद पासून बनलेला आहे. सुमारे ५० ते ६० वर्षापूर्वी संगणकाचा वापर फक्त आकडे मोड किंवा गणना करण्यासाठी केला जात होता. परंतु अलीकडे या संगणक यंत्रामध्ये अनेक विविधता व सुधारणा करुन संगणकाला आणखी प्रगत करून मानव आपली कामे करून घेत आहे.

संगणक म्हणजे काय :-

” संगणक हे माहिती स्वीकारणे, दिलेल्या सूचनांनुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तरे देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ” तसेच, ” संगणक हे मानव निर्मित विद्युत यंत्र असून ते माहिती घेते. व त्या माहितीवर प्रक्रिया करते. व जलद आणि अचूक उत्तरे देते आणि माहिती साठवून ठेवून ती माहिती पाहिजे तेव्हा जशीच्या तशी परत संप्रेरित करते. ”

संगणकाचा शोध :

संगणका सारख्या वेगवान असलेल्या यंत्राचा शोध ” चार्ल्स बॅबेज “ यांनी १८३३ ते १८७१ या दरम्यान ऍनालीटीकल इंजिन तयार केले. सुरुवातीला संगणक फक्त आकडे मोड व गणिती कामा साठी वापरले जात होते. व ” चार्ल्स बॅबेज “ यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते.

संगणकाचे फायदे आणि उपयोग :

संगणक हे एक असे उपकरण आहे जे प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरले जाते. आजच्या एकविसाव्या शतकामध्ये संगणकाचे मानवाच्या जीवनात एक प्रगतशील व अमुलाग्र बदल घडवून आणला आहे.

प्रत्येक क्षेत्रामध्ये वैयक्तिक व सामूहायिक पद्धतीने संगणकाचा वापर करून माणसाचे व आपली वेळ, मेहनत वाचवली आहे.

१) वेग :

संगणकाचा वापर करून मनुष्य आपली कामे वेगाने पार पाडत आहे. कोणतेही काम सेकंदांमध्ये अचूक व वेगवान होत आहे त्यामुळे वेळ वाचत आहे.

२) अचूकता :

संगणकाचा वापर करून आपल्याला अचूक व योग्य माहिती मिळते.

३) अथकपणा :

मानवाचे थोडे जास्त काम केले असता त्याची कार्यक्षमता कमी होऊन कंटाळा येऊ शकतो परंतु संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला कंटाळा येत नाही. संगणक एकाच प्रकारचे काम किंवा वेगवेगळे कामे करण्यास कार्यक्षम ठरतो.

४) स्वयंचलित :

संगणकाला कोणतेही काम करण्यासाठी योग्य सूचना दिल्या असता संगणक आपले काम कोणाच्याही मदती शिवाय देखरेखी शिवाय ते काम पार पाडते.

५) ताक्रिक प्रक्रिया :

संगणक गणिती प्रक्रिया बरोबरच ताक्रिक प्रक्रिया करू शकतो. कोणत्याही शास्त्रातील संकल्पना सोडविण्या करिता संगणकाचा उपयोग होतो.

संगणकाचा वापर कुठल्या क्षेत्रात केले जाते :

संगणक हा आजच्या प्रत्येक क्षेत्रात खूप उपयोगी वस्तू आहे तर चला मग पाहूया की संगणक कोणत्या क्षेत्रात वापरले जाते.

१) संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात झपाट्यानं होत आहे त्यात संगणकाचा उपयोग करून आलेख काढणे, आकृत्या काढणे, चित्र काढणे इत्यादी कामे सोईस्कर झाली.

२) शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा संगणकाने प्रगती केली विद्यार्थ्यांना शाळे मधूनच संगणकाचे ज्ञान दिले जात आहे.

३) किती ही अवघड गणिती सूत्र असो संगणकाचा वापर करून चटकन सोडवणे सोपे झाले आहे.

४) अतिशय महत्त्वाची माहिती असेल तर ती आपण संगणकामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो व पुन्हा पाहिजे असेल तेव्हा संगणक आपल्याला पुन्हा देतो.

५) उद्योग धंदे, व्यापारी, बँक, कॉल सेंटर, शेअर मार्केट, हॉस्पिटल अशा अनेक व असंख्य क्षेत्रांमध्ये संगणकाचा होतो.

६) रेल्वे तिकीट रिझर्वेशन करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरते.

७) रोगाचे निदान लावण्यासाठी प्रत्येक शास्त्र क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाचा उपयोग केला जातो.

८) इमारतीचे डिझाईन, आर्किटेक्चर साठी सुद्धा संगणक हे खूप फायदेशीर आहे.

९) भौतिक, गुंतागुंतीच्या शास्त्रात संगणक वापरला जातो.

१०) तसेच घरगुती कामासाठी डेकोरेशन करण्यासाठी संगणकाचा उपयोग केला जातो.

संगणकाचे प्रकार :

संगणकाचा शोध लागल्या पासून ते आत्ता पर्यंत संगणकाच्या आकारात बरेच बदल होत गेलेले आहेत. सुरुवातीला संगणक आकाराने खूपच मोठा होता पण आता त्याचा आकार खूप लहान झाला आहे. जसे की, डेक्सटॉप, लॅपटॉप

संगणकाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.

  1. अनालॉग कॉम्प्युटर
  2. डिजिटल कॉम्प्युटर
  3. हायब्रीड कॉम्प्युटर

संगणकाची काम करण्याची पद्धत :

संगणकाला कोणते काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते. जर या तीन प्रक्रिये मधील एक प्रक्रियाही कार्यरत नसेल तर कुठलेही काम पूर्ण होऊ शकत नाही.

इनपुट डिवाइस ( Input Device ) :

संगणकाला कुठलेही काम करण्यासाठी योग्य सूचना ची गरज असते. व संगणकाकडून अचूक माहिती पाहिजे असेल तर संगणकाला योग्य माहिती देणे गरजेचे असते. व ती माहिती देणाऱ्या विभागाला इनपुट डिवाइस असे म्हणतात.

की- बोर्ड, माऊस, स्कॅनर, वेब कॅमेरा हे भाग इनपुट डिवाइस मध्ये येतात.

सी. पी. यु. ( Central Processing Unit ) :

संगणकाचा मेंदू म्हणजे ओळखला जाणारा भाग म्हणजे सी. पी. यु. संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग सी. पी. यु. ला म्हंटले जाते. हा संपूर्ण भाग लहान लहान इलेक्ट्रॉनिक्स भागांनी बनलेला असतो.

सी. पी. यु. मध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात.

अरीथमॅटिक लॉजिक युनिट ( ALU ) :

संगणकाचे या भागांमध्ये गणिती आणि तर्क विषयाची माहिती तपासली जाते तसेच या भागात बेरीज, वजाबाकी, भागाकार गुणाकार या सर्व क्रिया या ALU मध्ये केल्या जातात म्हणून हा संगणकाचा महत्वाचा घटक आहे.

कंट्रोल युनिट ( C.U ):

मानवी शरीरात मेंदू ज्या प्रमाणे काम करतो तसेच संगणकाचा मेंदू कंट्रोल युनिट ला म्हणतात. संगणकामध्ये होणाऱ्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल युनिट करत असतो.

आउट पुट डिवाइस ( Output Device ) :

इनपुट विभागाने दिलेली सर्व माहिती सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कडून प्रक्रिया होऊन ती पुढे आउटपुट विभागाकडे पाठवली जाते. म्हणून हा भाग संगणकामध्ये महत्त्वाचा समजला जातो.

मॉनिटर, प्रिंटर हे आउटपुट डिवाइस आहेत.

संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर :

संपूर्ण संगणक हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर भागांचा बनलेला असतो.

हार्डवेअर म्हणजे संगणकाचा इलेक्ट्रॉनिक भाग जो आपल्याला डोळ्याने दिसू शकतो व आपण त्या भागाला स्पर्श करू शकतो.

उदा : मॉनिटर, की- बोर्ड, मदर बोर्ड, माऊस, इत्यादी….

सॉफ्टवेअर म्हणजेच संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या सॉफ्टवेअर कडून नियंत्रित होत असते त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टिम ( Operation System ) हे संपूर्ण संगणकावर कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे.

संगणकाची मेमरी ( Computer Memory ) :

C.P.U. नंतर येणारा संगणकाचा महत्वाचा भाग म्हणजे मेमरी. आणि मेमरी म्हणजे स्मरणशक्ती. संगणकाची स्मरणशक्ती मेमरी ला म्हणतात ही मेमरी CPU मधील मदर बोर्ड वर स्लॉटमध्ये लावली जाते. या मेमरीचे दोन भाग पडतात.

रँडम ऍक्सेस मेमरी ( Random Access Memory ) :

कंडोम ॲक्सिस मेमरीला साधारणता RAM म्हणून ओळखले जाते. ही RAM Memory माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी उपयोगी पडते. या मेमरी मध्ये ठेवलेला डेटा आपण पुन्हा पुन्हा बघू शकतो तो मेमोरी मध्ये जसाच्या तसा स्टोअर केलेला असतो.

RAM चे दोन भाग पडतात.

१) Static RAM.

२) Dynamic Static RAM.

रीड ओन्ली मेमरी ( Read Only Memory ) :

रेड ओन्ली मेमरी ला साधारणता ROM म्हणून ओळखले जाते. ह्या मेमरीला डेटा हा फक्त वाचण्यासाठी वापरला जातो. या मधील कुठल्याच माहिती मध्ये बदल करता येत नाही व संगणक बंद पडल्यास किंवा अचानक लाईट बंद झाल्यास या मेमरी मधील डेटा नष्ट होत नाही.

नेटवर्कचे प्रकार :

संगणकाला विविध नेटवर्कसद्वारे जोडले जाते. नेटवर्क चे मुख्यतः तीन प्रकार पडतात.

1. लोकल एरिया नेटवर्क ( LAN ) :

एकच ठिकाणाच्या किंवा एकच इमारती मधील वेगवेगळे संगणक एकमेकांना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात. या नेटवर्क मध्ये सर्व संगणक एकमेकांशी एकाच प्रकारच्या केबलच्या मदतीने जोडले जातात.

LAN फक्त १० किलो मिटर पेक्षा कमी अंतरा साठी वापरले जाते. व हे बाकी नेटवर्कस पेक्षा स्वस्त नेटवर्क आहे.

2. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क ( MAN ) :

MAN नेटवर्क हे LAN नेटवर्क पेक्षा मोठे असते. यामध्ये संपूर्ण शहरातील संगणक एकमेकांशी जोडले असते. व यासाठी वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो.

3. वाईड एरिया नेटवर्क ( WAN ) :

WAN हे सर्वात मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकांना जोडले जातात, तेव्हा त्या नेटवर्क ला वाईड एरिया नेटवर्क असे म्हटले जाते. हे नेटवर्क सॅटलाईट द्वारे जोडले जातात.

 

अशा प्रकारे या संगणकाचे उपयोग व खूप महत्त्वाचा घटक आहे म्हणून या जगभरा मध्ये अनेक ठिकाणी याचा वापर केला जात आहे.


* ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

 

धन्यवाद मित्रांनो !