ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh
आपल्या आसपास पर्यावरणा मध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण बघायला मिळते जसे की, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, वायु प्रदूषण आणि या प्रदुषणांचा आपल्या जीवनावर अत्यंत घातक परिणाम होतो.
ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh
अलीकडच्या काळात तर प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा वाढत जात आहेत.
म्हणून आपण आजच्या निबंधा मध्ये ध्वनी प्रदूषण हा निबंध मराठी भाषेत बनणार आहोत.
Sound Pollution Essay in Marathi
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय :
गरजेपेक्षा जास्त व कर्कश अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त मोठा आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो त्या आवाजाला ” ध्वनि प्रदूषण ” असे म्हणतात.
आपल्या अवती- भवती रोज किती तरी प्रकारचा आवाज होत असतो. भारत हा अफाट लोकसंख्याचा देश आहे. इथे अनेक उद्योगधंदे, औद्योगीकरण मोठ मोठ्या प्रमाणात चालत असते
त्या कामासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची पुरवठा करण्यासाठी मोठ्या वाहनांची आवश्यकता असते व याच वाहनांच्या हॉर्ना पासून त्या आवाजा पासून ध्वनि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
जेव्हा दोन व्यक्ती संवाद साधत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याचा आवाज हा ३० ते ४० डेसिबल येवढा असतो आणि त्यापेक्षा जास्त आवाज झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
विविध संस्थांच्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, सरासरी लोकसंख्येच्या एकूण अर्धा पेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनी प्रदूषणाची बळी आहे.
आपले कान ३० ते ४० डेसिबल येवढा आवाज सहन करण्याची ताकद ठेवतो आणि याच मर्यादितील आवाज आपल्या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो परंतु ८० डेसिबल येवढा आवाज आपण सतत आठ तासांसाठी ऐकला तर आपल्याला बहिरेपणा येण्याची शक्यता असते. यावरून आपल्याला कळते की हे ध्वनि प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
ध्वनी प्रदूषणाची कारणे :
आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती तरी विविध प्रकारचा आवाज ऐकतो काही आवाज आपल्याला ऐकाव असे वाटते परंतु काही आवाज एवढे कर्कश असतात की, ते आवाज ऐकु येताच आपण कानावर हात ठेवतो आणि हेच आवाज ध्वनी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात.
आपल्या आसपासच्या जीवनात लाखो वाहने आपण बघत असतो वाहनातून निघणारा धूर पासून वायु प्रदूषण होतेच पण वाहनांच्या हॉर्न च्या आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणाचे संकट वाढत आहे.
एक निदर्शना मधून असे लक्षात आले की कर्णकर्कश हॉर्न चे डेसिबल मध्ये मोजमापन केला असता त्याची पातळी १००- २०० डेसिबल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे.
यामुळे वाहने ही ध्वनी प्रदूषणा साठी प्रमुख कारण बनत जात आहेत व या कर्कश ध्वनिचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
ध्वनी प्रदूषणाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे दिवाळी मध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाकड्या. फटाक्यांमुळे ध्वनि- प्रदूषण व वायू प्रदूषण या दोन्ही प्रकारचे प्रदूषण होत असल्याचे दिसते. या फटाक्यांचा ध्वनि हा १४० ते १६० डेसिबल एवढ्या मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्माण होतो आणि हा ध्वनी हानिकारक आहे.
मोठ्या आवाज करणारे रेडिओ, लग्नामध्ये व इतर कार्यक्रमांच्या वेळी लावले जाणारे D.J. व फोडले जाणाऱ्या फटाकड्या, बॉम्ब यांमुळे ध्वनी प्रदूषण मध्ये आणखी भर घातली आहे. वाढत जाणारे कारखाने आणि या कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरी व त्यामुळे होणारा ध्वनि खूप मोठ्या प्रमाणात होणारा आवाज यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढत चालले आहे.
इतरांच्या शांतपणे जगण्याच्या व झोपण्याच्या अधिकारावर आक्रमण करणारी कर्णकर्कश संगीताच्या नावावर नवीन वर्ष साजरा करण्यासाठी स्पर्धात्मक मोठा आवाज करून गाणे वाजवणारी पिढी. ध्वनी प्रदूषणा साठी कारणीभूत ठरत आहे.
भारतीय संस्कृतीने अनेक सणे, जयंती साजऱ्या केल्या जातात त्यामुळे गणपती उत्सव, शिव जयंती, बसवा जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात त्यामध्ये D.J. डान्स मोठ्याने ओरडणे, भांडण या सर्व गोष्टींमुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे.
मोठ्या आवाजात वाजवलेली गाणे, T.V. यांच्या संपर्कात जास्त वेळ राहिले असते मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याचा धोका असतो व सोबतच ध्वनी प्रदूषण सुद्धा होते.
ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम :
अतिरिक्त ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आज आपल्या संपूर्ण पर्यावरणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
ध्वनी हा हवेच्या माध्यमाने प्रसारित होऊन प्रवास करत असतो म्हणून ध्वनीचे मापन हवेच्या गुणवत्ता पातळी मध्ये केले जाते. ९० डेसिबल पेक्षा अतिरिक्त जोराचा आवाज वारंवार आपल्या कानावर पडत असल्यास बधिरत्व ( बहिरेपणा ) येण्याची शक्यता आहे.
ध्वनी प्रदूषण निष्कर्ष मराठी माहिती
ध्वनी प्रदूषणा मुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे मानवी आरोग्यावर होतो. जास्त जोराचा आवाजा मुळे शरीराच्या नाडी तंत्रात कायमस्वरूपी बदल होतो आणि ऍड्रेलिन प्रवाह वाढायला लागतो व त्यामुळे शरीरातील हृदयाच्या कार्याची गती वाढली जाते. सतत आवाज येत असल्याने जोराच्या आवाजा मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढते व त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या संकुचित होऊन कायमच्या कमजोर होतात. ज्यामुळे हृदयाघात आणि हार्ट स्ट्रोकचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.
अतिरिक्त आवाजामुळे व प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी मुळे न्यूरोसिस आणि नर्व्हस ब्रेक डाऊन देखील होतो असे काही संशोधकांनी सांगितले आहे.
प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी कानावर पडल्यास रक्तदाब वाढतो. व डोकेदुखी सुरू होते. ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा सर्वात घातक परिणाम म्हणजे बहिरेपणा होय.
अतिरिक्त आवाजामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. ऐकायला कमी येणे व कानात सतत बेल वाजत राहिल्या सारखा आवाज येणे, झोप बिघडून अचानक जाग येणे यामुळे व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होऊन स्वास्थ्य बिघडते व वेदना होणे,
थकवा होणे, अस्वस्थता वाटणे, कुठल्याही कामामध्ये मन न लागणे, बोलण्यात अडथळा येणे व हार्मोन्स मध्ये बदल होणे यांसारखे घातक परिणाम मानवी आरोग्यावर ध्वनी प्रदूषणामुळे होतात.
तसेच, गरोदर स्त्रियांनाही अतिरिक्त ध्वनी मुळे त्रास होतो, त्यांचे मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे अकाली प्रसूती होण्याचे प्रकार अलीकडे बघायला मिळत आहेत.
ध्वनी प्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना खूप मानसिक त्रास होतो. ज्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊन त्यांना जगणे नकोसे वाटते. शहरी भागामध्ये अतिरिक्त आवाज जास्त असल्याने तेथील लोकांचे पाचेंद्रिये निकामी होत आहेत. अशाप्रकारे ध्वनि प्रदूषणाचे घातक परिणाम आपल्या दैनंदिन जीवना मध्ये होत आहेत.
अशा प्रकारे ध्वनी प्रदूषणाचे अत्यंत वाईट परिणाम होताना दिसत आहेत.
ध्वनी प्रदूषण चे उपाय :
१) ध्वनी प्रदूषणाचा पहिला घात हा कानावर होतो म्हणून कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामा पासून बचाव करण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे. सोबतच पोषक आहार असणे गरजेचे आहे आणि योग्य प्रमाणात झोप असणे गरजेचे आहे.
२) शाळा, महाविद्यालये व दवाखाने हे ” ध्वनि- प्रदूषण” निषिद्ध भाग आहेत. या ठिकाणी अतिरिक्त ध्वनि निर्माण होऊ नये याचे सर्वांनी पालन केले पाहिजे.
३) मोबाइलचा कमीत कमी वापर करावा. मोबाईल वर गाणे, चित्रपट बघताना व ऐकताना आवाज हा आपल्या पुरताच मर्यादित असावा याचे भान ठेवावे.
४) वाहनांच्या हॉर्नचा आवाज अनावश्यक ठिकाणी न वाजवावा. गरज आहे त्या पुरताच हॉर्न वाजवला पाहिजे.
५) डीजे सारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा आवाज योग्य डेसिबल पातळी मध्ये ठेवून वापर करावा जेणेकरून त्यांच्या आवाजामुळे कोणाला त्रास होणार नाही.
६) कर्णकर्कश आवाज असलेल्या ठिकाणी इअर प्लगचा वापर करावा जेणेकरून त्या आवाजाचा परिणाम आपल्या स्वास्थ्य वर होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
७) दिवाळी मध्ये उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी करावा कारण ह्या फटाकड्या ध्वनी प्रदूषण साठी कारणीभूत ठरत आहेत.
८) रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपक वापरावर उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलेली आहे तरी या नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे.
९) रात्रीच्या वेळी सर्व वातावरण शांत असते त्यामुळे रात्री कोणीही कुठल्याही प्रकारचा आवाज आपल्या आसपासच्या परिसरा मध्ये करू नये.
१०) आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली इत्यादी साधनांचा आवाज कमी ठेवावा, लाऊड स्पीकर वापरापासून इतरांना परावृत्त करावे.
११) लग्न समारंभामध्ये बँड, ताशा यांचा वापर करणे टाळावे. वरील काही उपाय व नियमांचे पालन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यास चालू केल्यास ध्वनी प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून वंचित राहण्यास मदत होईल.
त्यामुळे आपले मानवी आरोग्य निरोगी राहील व सोबतच पर्यावरण सुद्धा स्वच्छ व निर्मळ राहील. म्हणून ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.