सोशल मीडिया वर निबंध मराठी मध्ये । सोशल मीडिया चे फायदे आणि नुकसान । Essay On Social Media In Marathi

सोशल मीडिया वर निबंध मराठी मध्ये । सोशल मीडिया चे फायदे आणि नुकसान । Essay On Social Media In Marathi

आजच्या काळात सोशल मीडिया ही सर्वात जास्त प्रगत झालेला साइड आहे. जस जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढत गेले तसतसं प्रसार माध्यमे आणि माणूस प्रगत व विकसित होत गेला.

सोशल मीडिया हे टेलिव्हिजन पेक्षा अधिक प्रभावी ठरत चालेले माध्यम आहे. ज्याच्या परिणाम संपूर्ण जगावर झालेला दिसत आहे तसेच इंटरनेटचा वापर

हा प्रत्येक व्यक्ती करू लागला म्हणून इंटरनेटचे जाळे आज जगभर पसरले आहे. इंटरनेट नी जणु संपूर्ण जगाला मिठीच मारली आहे. म्हणून आज आपण याच सोशल मीडिया बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

सोशल मीडिया वर निबंध मराठी मध्ये । सोशल मीडिया चे फायदे आणि नुकसान । Essay On Social Media In Marathi

सोशल मीडिया म्हणजे काय ?

प्रत्येक जण सोशल मीडिया ची व्याख्या आपापल्या पद्धतीने सांगतात पण गुगलच्या मते सोशल मीडिया म्हणजे ” वेबसाईट” किंवा ” ॲप” ज्या वापर कर्त्यांना ( म्हणजे आपण युजर्स ) कन्टेन्ट ( Content ) तयार करण्यास

आणि सामायिक करण्यास किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये भाग घेण्यास सक्षम करतात, त्यांना सोशल मीडिया असे म्हणले जाते.

मराठी भाषेमध्ये सोशल मीडिया ला ” सामाजिक माध्यम” असे म्हणले जाते. या सामाजिक माध्यमांद्वारे प्रत्येक व्यक्ती आपली मते मांडण्याचा, लिहिण्याचा व इतरांशी आदान- प्रदान करण्याचा हक्क आहे.

सोशल मीडिया चे प्रकार :

आज सोशल मीडियाचे वेड संपूर्ण जगाला लागले आहेत. या सोशल मीडियाचे विविध Networks आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये काही असे आहेत जे अतिशय प्रिय आहेत तर काहींचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो.

त्यामधील आपल्याला माहिती असणारे आणि अतिशय लोकप्रिय असणारे माध्यम म्हणजे Instagram, WhatsApp, Facebook, Twitter, Pinterest, YouTube इत्यादी आहेत आणि यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक अशी माध्यमे आहेत. ज्यांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

व्हाट्सअँप म्हणजे काय ? ( WhatsApp ) :

आज WhatsApp चे वेड संपूर्ण जगाला लागले आहे. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये १००% WhatsApp ही ॲप असतेच आणि प्रत्येक जण त्याचा वापर सुद्धा करतात इतर ॲप नुसारच WhatsApp चे अकाउंट/ प्रोफाइल बनवावे लागते.

WhatsApp वापरणे खूप सोपे आहे. या माध्यमाच्या द्वारे आपण एकमेकांशी बोलू शकतो. फोन करू शकतो. Chatting, Voice Call, Video Call असे पर्याय या ॲप मध्ये आहेत.

जगातला कुठलाही कोपरा असो आपण या ॲप द्वारे संपर्क साधू शकतो. ही ॲप च्या सेटिंग मध्ये विविध पर्याय बघायला मिळतील जेचा वापर करून आपण या माध्यमाला आपल्याला पाहिजे त्या प्रकारे सेट करू शकतो.

फेसबुक म्हणजे काय ? ( Facebook ) :

Facebook ही सुद्धा लोकप्रिय माध्यमं पैकी एक महत्त्वपूर्ण आहे. नावा प्रमाणेच या माध्यमाचा वापर केला जातो. या ॲपची अकाउंट/ प्रोफाइल बनवावी लागते.

Facebook वापरणे अतिशय सोपे आहे. ओळखीच्या किंवा अनोळख्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधता येतो. स्वतःचे फोटो Facebook वर पोस्ट केले जातात.

हे ॲप बिझनेस साठी सुद्धा वापरले जाते. याद्वारे Chatting, Voice Call, Video Call करता येतो. यामधून कोणालाही Friend Request पाठवून आपल्या Friend List मध्ये ऍड केले जाते. प्रसिद्ध कलाकार या माध्यमांवर Active असतात.

इंस्टाग्राम म्हणजे काय ? ( Instagram ) :

Instagram ही अलीकडे सर्वाधिक पसंद केल्या जाणाऱ्या माध्यमं पैकी एक माध्यम आहे. जसे फेसबुकचा वापर केला जातो त्याप्रमाणे इंस्टाग्राम वापरली जाते.

Instagram ला फेसबुक ची पुढची आवृत्ती सुद्धा म्हणू शकतो. Facebook प्रमाणेच या मध्ये सुद्धा आपले अकाऊंट/ प्रोफाइल बनवली जाते. आणि Facebook ने Instagram ला विकत घेतली.

Instagram हे Facebook कंपनीचे दुसरे ॲप्लिकेशन आहे. हे वापरणे अतिशय इन्स्टंट आणि सोपे आहे. शाळा- महाविद्यालयांतील मुले सर्वाधिक प्रमाणात Instagram वापरतात. तसेच प्रसिद्ध कलाकार या माध्यमांवर Active असतात. या ॲपमध्ये Follow हा पर्याय असतो.

पिंटरेस्ट म्हणजे काय ? ( Pinterest ) :

Pinterest हे Facebook आणि Instagram प्रमाणेच आहे. येथे फोटोच्या साह्याने माहिती पोस्ट केली जाते. या माध्यमातून नवनवीन युक्ती ( Idea ) कला ( Art ) येथे शिकविल्या जातात व लिहिल्या जातात.

येथे Video, Animation चा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो. ब्लॉगिंग करणाऱ्या लोकांसाठी या सोशल मीडिया फायदेशीर ठरतात.

आपल्या ब्लॉगच्या फोटो सोबत ब्लॉग बद्दल थोडक्यात माहिती लिहून इथे पोस्ट केल्यास आपल्या वेबसाईटवर जास्त लोक म्हणजे Traffic येऊ शकते.

ट्विटर म्हणजे काय ? ( Twitter ) :

Twitter हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे सोशल मीडिया ॲप आहे. या माध्यमाच्या सहाय्याने आपण थोड्या शब्दात आपली मते मांडू शकतो. यामध्ये आपण Post करू शकतो व सोबतच Like करणे, Chatting, Tweet, Retweet सुद्धा करू शकतो तसेच एखाद्या फोटो वर कमेंट सुद्धा करता येते.

या माध्यमाच्या सहाय्याने कमी शब्दात जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जातो. प्रसिद्ध कलाकार, राजनीतिक लोक, नेते, फेमस ॲक्टर्स, पंतप्रधान अशी सर्व लोक हे सोशल मीडियाचा वापर करतात आणि या सर्व लोकांचे सर्वात जास्त फॉलोवर्स Tweeter या माध्यम वरच आहेत.

लिंकडीन म्हणजे काय ? ( Linkedin ) :

बाकी सर्व माध्यमांपैकी Linkedin हे माध्यम पूर्णतः वेगळे आहे. या सोशल मीडिया माध्यमा मध्ये जास्त व्यवसायिक प्रोफाईल असतो. जिथे आपण शिक्षण, काम, अनुभव, व्यवसाय, नोकरी या गोष्टींवर भर दिला जातो. आपले स्वरूप, ठिकाण, भाग यांची माहिती आपण इथे देऊ शकतो.

या मध्ये Connection असा पर्याय असतो त्याचा वापर करून आपण आपल्या भागात काम करत असणाऱ्या इतर व्यक्तींची जोडले जातो त्याचा उपयोग आपल्याला व्यवसाय अथवा नोकरी साठी करू शकतो.

अशा प्रकारे सोशल मीडिया चे काही प्रकार आहेत ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो.

सोशल मीडिया ची थोडक्यात माहिती व त्यांचे फायदे :

या सोशल मीडिया मुळे माहितीची देवाण- घेवाण झपाट्याने होऊ लागली त्यासाठी वापरले जाणारे व्हिडिओ व टेक्स्ट किंवा ब्लॉग्स तयार होऊ लागले.

याच सोशल मीडियाच्या मदतीने स्वतःचे मत किंवा माहिती इतरांपर्यंत पोहचवणे सोपे झाले. फक्त स्वदेशात नसून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात माहिती पोहोचवण्याची किमया या सोशल मीडियाने साकारली.

बातम्या, चित्रपट, मनोरंजनाचे कार्यक्रम या सोशल मीडिया मुळे सहज उपलब्ध होऊ लागले. ज्ञानाचे एक मोठे भांडार सोशल मीडिया च्या साहाय्याने जगासमोर उभारले. व याचा वापर करून सर्वजण आपापल्या आवडी निवडीं नुसार क्षेत्र निवडू लागले.

सोशल मीडिया मुळे सर्व समाज, लोक एकत्र येऊ लागले. अन्य देशातील नागरिकांसोबत मैत्रीचे नाते बनले सर्वजण आपापल्या विचारांची संस्कृतींची देवाण- घेवाण करत आहेत.

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तींशी संवाद साधणे हे सोशल मीडियामुळे सहज शक्य झाले. सोशल मीडियाचा फायदा खूप वेगवेगळ्या प्रकारे केला जातो तो म्हणजे असा –

सोशल मीडियाचा फायदा आपण कशाप्रकारे घेऊ शकतो :

1) नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी :

आजच्या काळात नव नवीन शिकण्याची आवड दिवसें- दिवस वाढत जात आहे. त्यामध्ये निरोगी आरोग्य कसे ठेवावे, पोषक आहार, व्यायाम, शिक्षण, नोकरी या क्षेत्रातील नव- नवीन गोष्टी शिकण्याची आवड आज काल वाढताना दिसत आहे व ही आवड जोपासताना सोशल मीडियाने सर्वात मोठा वाटा घेतलेला आहे. Facebook, Instagram व सर्वात महत्त्वाचे म्हणजे Youtube हे उत्तम माध्यम बनले आहेत.

बालवाडी पासून ते पदवी पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रम आपल्या या सोशल मीडिया च्या माध्यमातून प्राप्त होतो. मनोरंजन, हास्यास्पद व्हिडिओ, जोक्स सर्व काही सोशल मीडिया मुळे प्राप्त झाले.

2) सोशल मीडियाचा ब्रँड म्हणून वापर :

सोशल मीडियाने संपूर्ण जगाला आपले वेड लावलेच आहे पण सोबतच सर्व क्षेत्रांमध्ये आपला दर्जा वाढविला आहे. एक ब्रँड म्हणून सोशल मीडियाचा वापर प्रामुख्याने व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी होतो.

उत्पादनाच्या विक्रीसाठी, ग्राहकांशी बोलण्यासाठी, संपर्क करण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर केला जातो. Instagram, Twiteer, Facebook इथे आपल्या व्यवसायाची माहिती देऊन एक उत्तम ब्रँड म्हणून हा सोशल मीडिया वापरला जातो.

3) सोशल मीडिया व्यवस्थापन :

मोठ- मोठ्या कंपन्या, प्रसिद्ध कलाकार, बिझनेस मॅन सोशल मीडियावर आपले अकाऊंट बनवितात. सोशल मीडिया मुळे आर्थिक मदत होते हे अलीकडच्या काळामध्ये कळाले आहे.

नामांकित लोकांचे व कंपन्यांचे अकाउंट वेळेवर पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याने ते सोशल मीडिया चे सर्व कामे एखाद्या कंपनीला किंवा व्यक्तीला सोपवितात. त्या बदलत्या तो व्यक्ती पैसे घेतो व सोशल मीडिया चे सर्व व्यवस्थापन करत असतो.

सोशल मीडिया मुळे होणारे परिणाम :

आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया मुळे आपले आयुष्य खूप सोपे झाले आहे पण या सोशल मीडिया चे फायदे आहेत तसेच त्याचे परिणाम सुद्धा आहेत.

आपण सोशल मीडियाचा वापर मनोरंजन म्हणून करतो पण त्या मनोरंजनाच्या नादात आपण आपली महत्त्वपूर्ण वेळ गमावतो. काही लोक दिवस- रात्र मोबाईल, संगणक यांच्या समोर तासानंतास बसल्याने आपले आरोग्य धोक्यात येते. कंबर दुखी, पाठ दुखी, डोळ्यांचे विकार, डोके दुखी, अशा आजारांची लागण होत आहे.

सोशल मीडियाचा वापर जास्त झाल्याने सर्व नागरिक सोशल मीडियावर अतिरिक्त विश्वास ठेवत आहे त्यामुळे चुकीच्या बातम्या आणि अफवा यांचा परिणाम होत आहे. सोशल मीडियामुळे मनोरुग्नाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर नियंत्रित व गरजे पुरता करणेच फायदेशीर ठरेल.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-