भारतीय शेतकरी मराठी निबंध । Shetkari Marathi Nibandh
आपला भारत देश हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. आणि आपल्या देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत.
म्हणून आपल्या देशाला कृषिप्रधान देश असे सुद्धा म्हणले जाते. तरी आज आपण याच भारतीय शेतकरी या विषयावर निबंध करणार आहोत.
भारतीय शेतकरी मराठी निबंध । Shetkari Marathi Nibandh
Table of Contents
भारत देश हा अनेक खेड्यांचा बनून बनला आहे. आणि या खेडांच्या जीवनाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. म्हणून भारतात प्रामुख्य व्यवसाय हा शेती आहे.
संपूर्ण देशाला अन्न देण्याचे, धान्य पुरवण्याचे काम शेतकरी करतो म्हणून शेतकऱ्याला ‘ अन्नदाता’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी म्हणजेच – शेती करणारा, शेतात राबणारा पोशिंदा.
या शेतकऱ्याचे नाव जरी तोंडावर आले तर डोळ्यांसमोर गरिबी, कर्जबाजारी आणि नुकसान झाल्यास सहकाराच्या अनुदानासाठी भीक मागणारा आणि ते अनुदान कधी मिळाले नाही तर स्वतः आत्महत्या करून घेणारा लाचार व्यक्ती नजरेसमोर येतो.
शेतकरी विषयी माहिती :
आपण रोज अन्न खातो तो पुरविणारा शेताचा एक महत्त्वाचा आणि मुख्य भाग हा शेतकरीच असतो. आपल्या देशात शेती हा व्यवसाय फार प्राचीन काळा पासून आलेला आहे.
शेतीची परंपरा ही खूप जुनी आहे. असे म्हणतात की, शेतीचा उगम हा पुरातन काळापासून म्हणजेच आदिमानवाच्या विचारातून झाला आहे. भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे हवामान असल्याने इथे विविध प्रकारची शेती हे शेतकरी करीत असतात. म्हणून भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते.
भारतात सर्वात गरीब जीव म्हणजेच शेतकरी आहे. तो स्वतःच्या शेतात राब राबतो दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून कुपोषित राहतो पण संपूर्ण देशाला अन्न पिकवतो. देशातील जनतेच्या अंगावर वस्त्र रहावे म्हणून कापूस पिकाची शेती करतो पण या शेतकऱ्याच्या अंगावर फाटके कपडे असतात.
भारतीय शेतकरी शेती करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडी या कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता उन्हा- तानात राबतो पण स्वतःचे रक्त आटवून शेतामध्ये कष्ट करून पीक पिकवितो पण त्याच्या या कष्टाचा पाहिजे तेवढा योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही.
लाखो रुपयांची जमीन म्हणजे शेती शेतकऱ्या जवळ असते परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी, खर्चासाठी त्याच्याजवळ एक रुपया नसतो. त्यामुळे त्याला बँकेची पायरी चढायला लागतो.
हा शेतकरी पिढ्या न पिढ्या कर्ज घेत आलेला आहे. वेळेवर कर्ज न फेडल्यामुळे हा शेतकरी आत्महत्या सारख्या मार्गावर जातो. भारतीय शेतकरी फक्त शेतांमध्ये कष्ट करतो पिक पिकवतो थोडक्यात भारतीय शेतकरी फक्त एक प्रकारचा उत्पादक आहे. त्यांनी पिकविलेल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही.
पुढील काही ओळींतून शेतकऱ्याची स्थिती स्पष्ट होते.
” काळ्या मातीत जन्माला
काळ्या मातीशी नातं,
घाम गाळून कष्टाचा
भरतो तुमचं आमचं पोटं”
या ओळींमधून असे लक्षात येते की शेतकरी हा या माती साठीच जन्माला येतो, याच मातीत कबाड कष्ट करून घाम गाळून आपल्या देशातील सर्व जनतेचे पोट शेतकरी भरतो.
त्यामुळे भारतीय शेतकरी हा अनेक पिढ्यांपासून दरिद्री म्हणजेच गरीबी असल्याचे दिसून येते. पण याच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकावर व्यापारी लोक पुढे जातात श्रीमंत होतात मात्र हा शेतकरी गरीब राहतो.
अनेक लोक या शेतकऱ्याला गरीब बनवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. पहिला म्हणजे व्यापारी लोकांचा वर्ग आणि दुसरा म्हणजे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्या तसेच कीटक नाशके आणि शेतीला आवश्यक असणारी अवजारे यांचे भाव दिवसेंदिवस वाढत असतात.
परंतु या मोठ्या कंपन्या शेतकऱ्या जवळूनच बियाणे घेतात ते पण कमी किंमती मध्ये आणि त्यावर थोडीफार प्रक्रिया करतात व पुन्हा तोच माल सोन्याच्या भावाने पुन्हा शेतकऱ्यालाच विकतात त्यामुळे शेतकरी गरीब होत गेला आणि हे व्यापारी कंपन्या दिवसेंदिवस श्रीमंत होत गेले.
तसेच शेतकरी कष्ट करून पीक पिकवितो आणि अनेक जंगली प्राणी म्हणजेच रान डुक्कर, हरणांचे कळप व नील गाई शेतामध्ये हमला करतात व शेतकऱ्याचे शेतामध्ये डुलणारे सुंदर पिकांचे नुकसान करतात.
तसेच भारतामध्ये असलेले सर्व शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे आपल्या सर्वांना माहिती आणि भारतामध्ये असणारी पावसाची अनियमता ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे.
पावसाच्या अनियमता मुळे पिकांचे नुकसान होते. आणि कधी कधी होणारे अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस, पूर, आणि चक्रीवादळ सोबत होणारी गारपीट, आणि त्यामुळे पिकांवर येणारी किड आणि विविध प्रकारचे रोग इत्यादी कारणांमुळे पिकांचे नुकसान होतं. अशा स्थितीमध्ये काही वेळा संपूर्ण शेतीचे नुकसान होते. उत्पादन घटते व शेतकऱ्याला आत्महत्या हा एकच पर्याय उरतो.
सर्वजण शेतकऱ्यांवर अन्याय करतातच पण निसर्ग सुद्धा या गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करत असतो. एवढ्या मोठ्या समस्या समोर येऊन सुद्धा शेतकरी घाबरत नाही तो हिंमतीने सर्व परिस्थितीवर मात करतो व पुन्हा शेतामध्ये कामाला लागून कष्ट करून नव्याने पीक घेतो व देशाची अन्नाची गरज भागवतो.
आजचा आधुनिक शेतकरी :
शेतकरी एवढे कष्ट करतो राबतो त्याच्या या कष्टाला बघून भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ” जय जवान ! जय किसान ! ” अशी घोषणा करून भारतीय शेतकऱ्यांचा गौरव केला. पण काळ जस- जसं बदलत गेला तस- तसं शेतकरी सुद्धा बदलत गेला आजच्या काळात ज्ञानाची गंगा सर्वांच्या उंबरठ्यावर पोचली आहे.
त्यामुळे शेतकरी आणि शेती करण्याच्या पद्धती मध्ये प्रगती झाली. त्यामुळे चांगली बी- बियाणे, कीटकनाशके, खते इत्यादींचा वापर करून शेतकरी आपले उत्पन्न वाढू लागला, शेतकऱ्यांला शेतीसाठी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही.
तो टिंबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेऊ लागला. बागायती शेतीसाठी विहिरी मधून पंप बसवून शेतीला पाणी देऊ लागला.
व अधिक पीक कसे निघेल याकडे लक्ष देऊ लागला. आजच्या जगाची परिस्थिती सुधारल्याने देश प्रगतीच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतीसाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व यंत्रणा सहज उपलब्ध झाल्या ज्यांचा वापर करून शेतकरी शेती करू लागला त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्या पेक्षा बऱ्याच चांगल्या प्रमाणात सुधारली आहे.
शेतकरी जगाचा पोशिंदा :
जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात. आपण दुकानात धान्य घेण्यासाठी जातो आणि उत्तम दर्जाचे धान्य सुद्धा घेतो पण त्यामागचे असणाऱ्या शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला दिसत नाही. जर आपण विचार केला की शेतकऱ्याने शेती करायची बंद केली तर काय होईल ? शेतकरी आहे म्हणून आज आपण पोटभर जेवण करून जगत आहोत या शेतकऱ्याने शेती करायचं बंद केली तर सगळा देश उपासमारीने मरेन.
लोक अन्ना साठी एकमेकांना मारतील, संपूर्ण देशात भांडण, गोंधळ दिसेल व अन्न नाही या कारणाने संपूर्ण देश मरेल म्हणून आपल्या देशाला व देशातील प्रत्येक नागरिकाला जिवंत राहायचे असेल तर शेतकरी आपल्या देशात असायलाच पाहिजे. याच शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादना वाढ करून अन्न धान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवलं आहे. देशाला जगात मोठी बाजारपेठ बनवले आहे.
आपल्या देशातील धान्य बाहेरच्या देशात पाठवले जाते. गव्हाच्या उत्पादनां मध्ये भारताचा संपूर्ण जगात दुसरा क्रमांक येतो याचा अर्थ असा की आपला भारतीय शेतकऱ्यांच्या संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाला मोठा दर्जा दिला आहे.
विविध धान्य भारतातून बाहेर देशात निर्यात केली जातात त्यामध्ये साखर, तांदूळ, गहू, हापूस आंबा, द्राक्षे इत्यादी पिके निर्यात केली जातात. आणि याच भारतीय शेतकऱ्यांमुळे आपल्या भारत देशाचे सुद्धा नाव उंचावले आहे.
शेती आणि त्यापासून मिळणारे अन्न ही गोष्ट राष्ट्र हिताशी निगडीत असल्याने शेतकऱ्यांनी नियोजन पूर्वक शेती करावी. तसेच सेंद्रिय खतांचा वापर जास्त करावा. विष नाशक कीटकनाशके वापरू नयेत.
फळबागा, बागायती शेती व शेती शिक्षण संशोधन या गोष्टींकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी हा या संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. म्हणून शेतकऱ्यांचे जीवन सुखी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे व शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे.
शेतकरी बांधवांचे दुःख जाणून घेतले पाहिजे. कारण हा शेतकरी सुखी आणि आनंदी असेल तर संपूर्ण जग सुखी आणि आनंदी असेल.