शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importance Of Education

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importance Of Education

आज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाण्याच्या एकमेव मार्ग म्हणजेच ” शिक्षण”. माणूस आपले आयुष्य जगत असताना, समाजामध्ये वावरत असताना अनेक चांगल्या- वाईट गोष्टी अनुभवतो व शिकत असतो.

माणसाच्या जगण्याचा खराखुरा अर्थ म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे शाळेतले, कॉलेजमधले शिक्षण नव्हे तर शिक्षण म्हणजे आयुष्य जगायला शिकवणारा मार्ग आहे.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importantance Of Education

माणूस हा बुद्धिमान प्राणी समजला जातो. व मानवी विकास म्हणजे माणसाच्या बुद्धीचा विकास असेही म्हणता येईल. ऐतिहासिक काळापासून असे म्हणतात माणूस हा सुरुवातीला अज्ञानी होता कशाचे शिक्षण नसलेला.

अंगावर कपडे नको ना खायला नीट अन्न नको. पण जसं- जसं बुद्धी विकसित झाली, माणूस पुढे येत गेला म्हणजेच नव- नवीन गोष्टीचे शिक्षण घेत गेला.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध

शिक्षणाचे महत्त्व अपार आहे. माणूस स्वतःच्या विकासासोबत आपल्या समाजाचा कुटुंबांचा, नातेवाईकांचा विकासही करू शकतो.

शिक्षण आपल्या उज्वल भविष्यासाठी व पुढच्या पिढीच्या हितासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या मदतीने आयुष्यात काही उत्तम व उच्च दर्जाचे साध्य करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे.

शिक्षणामुळे मोठ्या सामाजिक, कौटुंबिक सोबतच राष्ट्रीय पातळीवरील समस्या, अडचणी, योग्य मार्ग निवडण्याची क्षमता प्रदान करते. समाजातील नकारात्मक विचारांवर मत देण्याचे साधन आहे. असहे ” शिक्षणाला ” दर्जा दिला जातो.

आयुष्यात आपल्याला जे काही बनवायचे आहे जसे की डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनीयर बनवण्यास सक्षम करते म्हणजेच शिक्षण. तसेच ज्ञान, कौशल्य वाढविण्यासाठी समाचार वाचणे, टीव्हीवर चांगले ज्ञानदायी कार्यक्रम पाहणे, पुस्तके वाचणे हे सर्व काही शिक्षणासाठी उपयुक्त ठरते.

शिक्षणामुळे जीवनाचे निश्चित ध्येय निश्चित होऊन ते साकारण्याचे ध्येय प्राप्त होते. समाजातील जाती धर्म, धर्मनिरपेक्षता नष्ट करण्यासाठी शिक्षण उपयुक्त ठरते.

शिक्षणाची परंपरा प्राचीन काळापासून आलेली आहे. वेगवेगळ्या कलेसाठी वेगवेगळे शिक्षण घेतले जाते. आजच्या आधुनिक जगात शिक्षणाचे स्वरूप बदलत चालले आहे.

देश विकासाच्या दिशेने प्रगती करत आहे. त्यामुळे शिक्षणाला अत्यंत उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. लहान वयामध्ये मुला- मुलींना शिक्षणाचे महत्त्व शिकवले जात आहे.

पहिलं समाजामध्ये शिक्षणाला पाहिजे तेवढे महत्त्व नाही होते, लोक अज्ञानी होते, चांगल्या- वाईट गोष्टीचे प्रशिक्षण नसल्याने, जात- धर्म यामध्ये फूट असल्याने आपला मानव समाज मागे राहिला होता, याच कारणामुळे कित्येक वर्षे आपल्याला भारत देशावर इंग्रजांनी राज्य केले व आपल्या देशातील संपत्ती लुटून घेतली.

सुरुवातीच्या काळामध्ये तर शिक्षणाला अतिशय कमी दर्जा होता तसेच मुलींना तर शालेय शिक्षणाचा अधिकार ही दिलेला नाही होता. मुलींच्या शिक्षणासाठी ” ज्योतिबा फुले” व ” सावित्रीबाई फुले” यांनी मुली शिक्षण घ्यावे यासाठी स्वतःच्या जीवनाचा विचारही केलेला नाही. स्त्री शिक्षण हे आपल्या समाजासाठी किती महत्त्वाचे आहे यासाठी त्यांनी लढा दिला. व ३ जुलै १८५१ रोजी मुलींसाठी पहिला शाळा काढण्यात आली.

शिक्षण हे आपण सभोवतालच्या गोष्टींना बघून ही शिकू शकतो. शिक्षण हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास मदत करते.

शिक्षण हा माणसाचा पहिला महत्वाचा हक्क समजला जातो. शिक्षणाशिवाय माणूस पूर्ण होत नाही व जीवन व्यर्थ आहे असे समजले जाते. शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास सुधारण्यास मदत होते.

आपल्या देशातील शिक्षण हे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण या तीन विभागांमध्ये विभागले गेलेले आहे.

देशामध्ये लहान मुलांना शाळा, तरुणांसाठी महाविद्यालयांचे स्थापना करून देशाच्या गुणवत्तेत व विकासात वाढ करण्यास हात भार लावण्याचे काम करत आहे.

कारण आपला देश विकासाच्या मार्गावर चालत आहे व तरुण मुले- मुलीच आपल्या देशाला योग्य त्या वाटेवर घेऊन जातील त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयां मार्फतही शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाते.

शिक्षण घेणे म्हणजेच फक्त पुस्तकी शिक्षण हवे. किंवा शाळेमध्ये दिली जाणाऱ्या शिक्षणासोबतच आपल्या सभोवताली, घरामध्ये, समाजांमध्ये व परिसरामध्ये आपण कसे वावरतो वागतो ही एक प्रकारचे शिक्षण आहे.

शिक्षणामुळे आपण मन, व्यक्तिमत्व ज्ञान, आचार विचार सर्व बदलण्यास भाग पाडतो. सकारात्मक विचारांना चालना देण्याचे काम हे शिक्षणच करते.

शिक्षण आपल्या सर्वांच्या भविष्याला व जीवनासाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आणि हे साधन वापरून आपण जीवनामध्ये काहीही चांगले साध्य करू शकतो. शिक्षणाचा दर्जा हा उत्तम असेल तर माणसाच्या आयुष्यात कौटुंबिक व सामाजिक आदर मिळवण्यास मदत करते.

शिक्षण ही माणसाला मजबूत बनविते म्हणजेच सकारात्मक विचारांना चालना देऊन मनातील नकारात्मक विचारांचा नाश करते. शिक्षणामुळे ज्ञानामध्ये भर पडून विकासाच्या दिशेने जाण्याची वाट याच शिक्षणामुळे प्राप्त होते.

शिक्षण हे विविध प्रकारे दिले जाते व घेतले ही जाते. एका व्यक्तीचा अनुभव हा दुसऱ्या व्यक्तीला नवीन काहीतरी शिकण्यासाठी उपयुक्त ठरतो व त्या व्यक्तीचा विकास होतो.

विकास म्हणजे बुद्धीचा विकास असे ही संबोधता येईल. पूर्वीच्या माणसामध्ये विकास होऊनच आजचा हा नवीन माणूस जन्माला आलेला आहे.

शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपण आपल्याला सभोवतालच्या गोष्टींना बघूनही शिकू शकतो. कोणतेही वस्तू अथवा परिस्थितींना सहजपणे समजून घेण्याची मनस्थिती प्राप्त करते.

शिक्षण प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आणि जीवनात आव्हाने जिंकण्याची क्षमता देते. हा एकमेव असा मार्ग आहे जो कोणत्याही क्षेत्रात आवश्यकतेनुसार ज्ञान संपादन करते.

जीवनात यश, सन्मान आणि ओळख मिळवण्यासाठी, सर्वांसाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.

शिक्षण हे नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत करते. संशोधन नवीन शोध व आधुनिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास मदत करते.

आजचे जग आधुनिक संशोधनाकडे व विज्ञानाकडे जाताना दिसत आहे. ते याच शिक्षणामुळे व डिजिटल वर्ल्ड म्हणून जगाची नवी ओळखही आजच शिक्षणामुळे झालेली दिसत आहे.

म्हणून, शिक्षण ही सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे जी वैयक्तिक विकासासोबत देशाचा व जगाचा विकास ही करण्याची भूमिका बजावते.

भारत सरकारने शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता ५ वर्षे ते १५ वर्षे वयाच्या सर्व मुलांना अनिवार्य शिक्षण पद्धती चालू केलेली आहे.

प्रत्येकाने सकारात्मक विचाराने समस्यांना तोंड देण्याचे धाडस प्राप्त करावे या हेतूने मागासलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना चांगले शिक्षणाचे फायदे व्हावे त्यासाठी अनेक सोयी केलेल्या आहेत.

प्रत्येक नागरिकाचा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे व बाजवला पाहिजे. समाजामध्ये शिक्षणाशिवाय जीवन कठीण होते म्हणून प्रत्येकाने शिक्षण हा आपला पहिला हक्क बजावला पाहिजे सावित्रीबाई फुले म्हणतात की,

” विद्येविना गती गेली

गती विना मती गेली,

मती विना शुद्ध खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले”.

याचाच अर्थ असा आहे की माणसाचे जीवन हे विद्येशिवाय शून्य आहे, व्यर्थ आहे. विद्या म्हणजेच शिक्षण. जर शिक्षण नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. तो प्रगती पासून वंचित राहतो.

आणि जर व्यक्तीची प्रगती होत नसेल तो नवीन गोष्टींचा विचारही करत नसेल तर त्याच्या बुद्धीचा हे विकास होत नाही. म्हणून अज्ञानाला दूर करून ज्ञाना कडे जायचे असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावाच लागतो. जरी ” शिक्षणाचे मूळ कडू असू शकतात पण त्यावर, येणारे फळे हे गोडं असतात.

म्हणून शिक्षण हे अवघड आहे त्याचा फायदा आपल्याला होणार नाही असा नकारात्मक विचार न करता, शिक्षण माणसाला हुशार बनवते आणि माणसातील चांगल्या गुणांना बाहेर काढण्यास मदत करते सकारात्मक विचार करून शिक्षण घेतलेच पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व जाणून अमेरिकेचे विचारक जॉन डेव्ही म्हणतात की, ” शिक्षण जीवनाची सुरुवात नसून शिक्षणात जीवन आहे.”

याचा अर्थ असा की जीवनात शिक्षण नसेल तर ते जीवन अर्थहीन आहे. त्यात जीवन जगण्याचा काही उपयोग नाही. म्हणून चांगली जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने शिक्षण हे घेतलेच पाहिजे.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद माझ्या मराठी मित्रांनो !