भारतामध्ये खेळले जाणारे खेळांची माहिती । Information About Indian Games
भारत देश हा विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. अनेक जाती, धर्माचे लोक लोकांचे वास्तव्य भारता मध्ये आहे. विविध भाषा, वेषभूषांनी नटलेल्या या भारतामध्ये अनेक प्रकारचे खेळ देखील खेळले जातात.
भारता मधले खेळांची माहिती
लहान मुलांसोबत तरुण व वयस्कर लोकही येथे विविध खेळ खेळताना दिसतील. काही जण मैदानी खेळ तर काही बैठे खेळ खेळत असतात.
माझा आवडता खेळ मराठी निबंध । Essay On Favorite Game
तर आपण आज भारतामध्ये खेळले जाणारे खेळांची माहिती बघणार आहोत.
विशेषतः भारतामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे मैदानी खेळ आहेत पण आपण मुख्यतः जे खेळ जास्त लोकप्रिय आहेत त्यांची माहिती बघणार आहोत.
कबड्डी :-
मैदानी खेळ म्हणून ओळखला जाणारा कबड्डी हा खेळ भारताचा लोकप्रिय खेळामध्ये येतो. भारतामध्ये हा खेळ खेळला जातोच पण नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये देखील
कबड्डी ला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहेच सोबतच बांगलादेशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून देखील कबड्डी ला मान आहे. पूर्व भारतामध्ये कबड्डी ला “हुतुतू” या नावाने देखील ओळखली जाते.
-
कबड्डी मैदान :-
प्रत्येक मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असते. कबड्डी हा खेळ हा तरुण मुले, लहान मुले व महिला देखील खेळतात प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आकाराचे मैदान आवश्यक असते
म्हणजेच तरुण मुलांसाठी मैदानाची लांबी १२.५० मी. व रुंदी १० मी. येवढी असावी तर महिलांसाठी आणि मुलांसाठी मैदानाची ११ मी. व रुंदी ८ मी. असावी.
तसेच मैदानामध्ये अगदी मध्य भागावर एक रेषा अखिल जाते त्यामुळे मैदानाचे दोन समान भाग व्हावे. मैदानाच्या दोन समान भागाला ” कोर्ट” असे म्हणतात.
व मैदानाच्या दोन्ही बाजूंना एक- एक मीटरच्या अंतरावर एक रेषा आखली जाते. व त्या रेषेला ” लांबी” असे म्हणतात.
व मैदानाच्या मध्य रेषे पासून दोन्ही बाजूला ३ मी. अंतरावर समांतर ” टच रेषा” असते व या ” टच रेषेपासून” १ मी अंतरावर बोनस रेषा असते.
-
कबड्डी खेळाचे खेळाडू :-
कबड्डी या खेळाला संघीक खेळ असे म्हणतात. या खेळामध्ये दोन संघ असतात व प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात व सामनाच्या वेळेस प्रत्येक संघातील ७ खेळाडू मैदानामध्ये उतरतात.
व बाकीचे ४ खेळाडू राखीव असतात म्हणजे खेळताना कुणाला जखम वगैरे झाल्यास राखीव खेळाडूतील खेळाडू खेळामध्ये उत्तरतो. व प्रत्येक संघात एक कर्णधार नेमलेला असतो.
-
कबड्डी खेळाच्या नियम व अटी :-
खेळ चालू होऊन खेळाडू मैदानामध्ये उतरतात तेव्हा सुरुवातीला नाणे फेक केली जाते. त्यामध्ये जो संघ जिंकतो त्या संघातील एक खेळाडू विरोधी संघाच्या कोर्ट मध्ये पाठविला जातो.
कबड्डी हा खेळ २०-२० मिनिटांच्या दोन राऊंड (Round ) मध्ये खेळला जातो. व प्रत्येकी २० मिनिटानंतर ५ मिनिटांचं ब्रेक असतो. त्या मध्ये प्रत्येक संघ आपला कोर्ट बदलतात.
एक संघाने दुसऱ्या संघाचे अधिक खेळाडू बाद ( आऊट / Out ) केले असता तो संघ विजयी घोषित केला जातो.
व दोन्ही संघाने समान खेळाडू बाद केल्याने म्हणजे त्या परिस्थिती निर्माण झाल्याने ५ मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळला जातो. मग त्या अतिरिक्त ५ मिनिटांच्या खेळामध्ये जो संघ जिंकेल, त्या संघाला विजयी घोषित केले जातील.
२) क्रिकेट :-
लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. जगात सर्व नामांकित असलेला क्रिकेट हा खेळ भारताच्या लोकप्रिय खेळा मध्ये येतो.
भारताचा लोकप्रिय खेळ आहेच सोबतच पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया देशात देखील क्रिकेटला लोकप्रियता आहे. व इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेट खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त होते व व्यायामही होतो,
तसेच क्रिकेट खेळ मुळे शारीरिक व्यायाम होतोच सोबतच बुद्धीचाही वापर येथे लागतो म्हणून बुद्धीचा देखील विकसित होतो.
अलीकडे सगळ्यांना वेड लावणारा हा खेळ दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. आयपीएल व आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे लोकांच्या मनामध्ये अधिकच प्रेम वाढत आहे.
-
क्रिकेटचे मैदान :-
क्रिकेट हा एक मैदानी खेळ असल्याने क्रिकेटला मैदानाची आवश्यकता असते. क्रिकेटचे मैदान हे आकाराने गोल असते व मैदानाच्या अगदी मधोमध २०.११ मी. लांब व ३.०४ मी. रुंद अशी एक प्रकारची खेळ पट्टी तयार करण्यात आलेला असते.
त्या खेळपट्टीवर हिरवे गवत किंवा हिरवळ असते अन्यथा मेटिंग अंथरलेली असते. व खेळपट्टीच्या मध्यभागापासून ६८.५७ मी. येवढ्या अंतरावर एक सीमारेषा आखली जाते. व या सीमारेषाच्या आतमधील सर्व क्षेत्र खेळण्यासाठी वापरले जाते.
-
क्रिकेट खेळाचे साहित्य :-
क्रिकेट हा खेळ खेळण्यासाठी मुख्यतः बॅट, चेंडू यष्ट्या व काही शरीर संरक्षक साधनांचा वापर केला जातो.
-
बॅट:-
०.९६ मी. लांब व ७०.७८ सेमी रुंद असलेली ही बॅट विलो नावाच्या लाकडापासून बनवितात. हे लाकूड हलके व चिक्कट सरळ असल्याने ह्या लाकडांचा उपयोग कशासाठी होतो.
तसेच बॅट चा वरचा दंडा हा दंडगोलाकार असून तो रबर च्या पट्टीने बनविला जातो. व बॅटची मागची बाजू ही फुगलेली व समोर एकदम सपाट असते व खाली अर्धवर्तुळाकार असते.
-
चेंडू :-
चेंडू हा एकदम गोलाकार असतो व आतून रबर, लोकर किंवा धाग्याने घट्ट बांधलेला असतो. व चेंडूचा हा मुख्यतः ०.२२ मी. एवढा असतो व तो चिकट कातड्याचा असतो. व चेंडूचे वजन हे साधारणता ५ १/२ ते ५ ४/४ औस एवढे असते.
-
यष्ट्या :-
खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना मधोमध व समोरासमोर व समांतर २०.११ मी. अंतर ठेवून तीन तीन अशा लाकडांच्या दांड्या रवलेल्या असतात त्यांना यष्ट्या असे म्हणतात. ही यष्ट्या जमिनीपासून वर ०.७५ मी. उंच व ०.२२ मी. रूंद असाव्यात.
व या यष्टयांच्या वर दोन विट्या ठेवल्या जातात तेव्हा चेंडू लागून ते विट्या किंवा यष्ट्या पडतात तेव्हा विकेट्स (OUT ) किंवा खेळाडू बाद झाला असे ठरवले जाते.
-
संरक्षक साधने :-
क्रिकेट खेळताना बॅट किंवा चेंडूचा मार बसू नये म्हणून खेळाडूंना काही संरक्षक साधनांचा वापर केला जातो.
चेहऱ्याला मार लागू नये म्हणून डोक्याला जाड धातूंनी बनलेला टोपी वापरले जाते व समोर तोंडाला जाळी लावलेली असते, जेणेकरून चेंडू चेहऱ्यावर तीव्र गतीने आल्यास तो चेंडू त्या जाळीला लागावे.
हाताला संरक्षक गाईड्स किंवा जाड ग्लब्ज असते व पायाला बूट असतो किंवा गुडघ्यापर्यंत पॅड संरक्षक असतो त्याला लेग गाईड्स असेही म्हणतात.
-
क्रिकेट खेळाचे खेळाडू :-
क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ म्हणून हि ओळखला जातो. या खेळामध्ये दोन संघ व प्रत्येकी संघात ११-११ खेळाडू असतात.
व दोन अंपायर असतात व प्रत्येकी संघात एक कर्णधार असतो. क्रिकेटचे सामने हे काही एक दिवसीय तर काही पाच दिवसाचे असतात. व सामन्यांचा निर्णय अंपायर देत असतो.
-
क्रिकेट खेळाच्या नियम व अटी :-
खेळ चालू होताना खेळाडू मैदानावर येतात व सुरुवाती नाणे फेक (टॉस ) केली जाते. जो संघ टॉस जिंकतो तो गोलंदाजी किंवा बॅटिंग ठरविल्याप्रमाणे घेतो व मॅच च्या ओव्हर या ठरवलेल्या असतात. व प्रत्येक ओव्हर मध्ये ६ चेंडू असतात.
जर बॅटिंग केल्याने चेंडू एखाद्या खेळाडूने कॅच केल्यास खेळाडू बाद होतो. व वाईड बॉल किंवा बाऊंसर झाला तर त्या बॉल नो बॉल म्हणून करार दिला जातो, व बॅटिंग करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त रन दिला जातो.
३) खो- खो :-
खो- खो हा खेळ सुद्धा मैदानी खेळा मध्ये येतो व हा खेळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो म्हणून खो- खो हा खेळ भारताचा लोकप्रिय खेळामध्ये समाविष्ट होतो.
या खेळामध्ये गती ला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
-
खो- खो खेळाचे मैदान :-
खो- खो चे मैदान हे ३३.६ मी. लांब तर १५.५ मी. इतके रुंद असते. तर मैदानाच्या मधोमध एक मध्यपट्टी असते मध्य पट्टीची लांबी २४.६८ मिटर रुंदी ३० सेमी असते.
व खो- खो च्या मैदानामध्ये दोन खुंट्या असतात त्याची लांबी १.३६ मी. व परीघ हा ३३.०२ ते ४०.६४ सेमी असतो. व या खुंट्यांपासून पहिल्या पट्टीचे अंतर हे २.५४ मी. असते.
व बाकी सर्व पट्ट्या मधील अंतर हे अनुक्रमे २.४३ मी. असते. व दर २.४३ मी. नंतर आठ खेळाडू आळीपाळीने विरुद्ध दिशेने तोंड करून बसलेले असतात.
व खुंट्यांच्या दोन्ही बाजूला ४.५६ मी. X १५.५४ मी. आकाराचे चौकोन असतात.
-
खो- खो खेळाचे खेळाडू :-
खो- खो या खेळाला सांघिक खेळ असेही म्हणतात. या खेळामध्ये दोन संघ असतात व प्रत्येकी संघात १२- १२ खेळाडू असतात. व सामन्याच्या वेळेस प्रत्येक संघातील ९ खेळाडू मैदानामध्ये उतरतात
व बाकीचे ३ खेळाडू राखीव असतात, प्रत्येक संघात एक कर्णधार असतो व एक अंपायर देखील असतो.
-
खो- खो खेळाच्या नियम व अटी :-
खो- खो हा खेळ दोन संघामध्ये तो भागांमध्ये खेळाला जातो. या खेळाचा संपूर्ण कालावधी हा ३७ मिनिटांचा असतो. पहिला संघ पाठलाग करतो तेव्हा दुसरा संघ स्थितीत असतो व दुसरा संघ पाठलाग करतो तेव्हा पहिला संघ बचाव स्थितीत असतो व ५ मिनिटे विश्रांतीसाठी चा कालावधी असते.
पाठलाग करणार्या संघाचे आठ खेळाडू हे दोन खुंट्यानं मधील आठ चौकोनामध्ये विरुद्ध दिशेने तोंड करून असलेले असतात व नवंवा खेळाडू दोन्हीपैकी एक खुंटीजवळ उभा असतो व बचाव संघाचे ३ खेळाडू मैदानामध्ये असता.
खेळ सुरू होताच पाटलाग करणाऱ्या संघाचा नववा खेळाडू बचाव संघातील ३ खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करीत असतात. व बचाव संघाच्या खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूला असतो त्या बाजूला तोंड देऊन बसलेल्या आपल्या संघातील खेळाडू च्या पाठीवर “खो ” म्हणून थाप मारतो मग बसलेला खेळाडूंच्या जागेवर तो बसून खो दिलेला खेळाडू बचाव संघाच्या खेळाडूचा पाटलाग करतो हा क्रम असा चालतो.
4) ये देखील अवश्य वाचा :-
- माझा आवडता खेळ मराठी निबंध
- पाणी वाचावा जीवन वाचवा
- प्रदूषण या विषिया वर निबंध
- स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
- गुरु पौर्णिमेचे महत्व मराठी मध्ये
धन्यवाद मित्रांनो !