प्रदूषण या विषिया वर निबंध । Pollution Essay In Marathi

प्रदूषण या विषिया वर निबंध । Pollution Essay In Marathi

प्रस्तावना,

आजचे जग हे ” डिजिटल” मानले जाते. बघावे तिकडे नव- नवीन वस्तू पहायला मिळतात. मोबाईल, वाहने मोठ- मोठ्या इमारतींनी जनू थैमानच घातले आहे.

आजच्या वैज्ञानिकांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे. या ” डिजिटल” जगात माणसाला काही वरदान मिळाले तसेच काही शापही आहेतच. अशा या ” डिजिटल” जगाला ” प्रदूषणाने” जणू आळाचं घातले आहे.

प्रदूषण या विषिया वर निबंध । Pradushan Essay In Marathi

माणसाचे व पर्यावरणाचे प्राचीन काळापासूनचे संबंध आपल्याला बघायला मिळतात पण अलीकडे या संबंधामध्ये ” प्रदूषण” यामुळे मोठी फूट पडलेली दिसायला येईल.

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा समज आहे पण हवा, पाणी, जमीन या ही माणसाला तितक्यात गरजेच्या आहेत हे ही चुकीचे नव्हे.

आपण आजच्या या वैज्ञानिक युगात याचा विसर पडलेला दिसत आहे. म्हणूनच माणसाच्या व पर्यावरणच्या मध्ये ” प्रदूषण” हि सर्वात मोठी समस्या बघायला मिळते.

पर्यावरणामध्ये हानिकारक, दूषित, विषारी पदार्थाची भर घालण्यास ” प्रदूषण” असे म्हटले जाते.

पर्यावरणा मधून आपल्याला जीवनाश्यक व मौल्यवान वस्तू मिळतात त्याचा फायदा माणूस करून घेत आहे पण सोबतच पर्यावरणाचा नाश पण होत चालला आहे.

आपल्या अवती- भवती बघितले तर आपल्याला प्रदूषणच प्रदूषण बघायला मिळेल.

प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे व गंभीर होत आहे. यामुळे मानवी जीवनावर व आपल्या सजीव सृष्टी वर प्रदूषणाचा परिणाम होत आहे.

प्रदूषण एवढे गंभीर झाले आहे की लहान मुलांना शाळेपासून प्रदूषण हानिकारक आहे हे सांगण्याची गरज भासली आहे. आजच्या जगात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण व त्याचे होणारे मानवी जीवनावर परिणाम बघायला मिळतील.

मुख्यतः जलप्रदूषण, वायू प्रदूषण ध्वनि प्रदूषण यांनी मानवी जीवनाला मोठे नुकसान होत आहे.

१) जल प्रदूषण :-

‘ जल’ म्हणजेच ” पाणी” व ” पाणी हे आपले जीवन आहे’ असे मानले जाते. मग पाणीच नसेल तर? या सृष्टी वरचे पाणी संपले तर सर्व सजीव जीवन हि हळू- हळू नष्ट होऊन नाहीशी होईल

म्हणून आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून पाण्याला मानवी जीवनाची उपमा देण्यात आलेली आहे. पूर्ण अलीकडे वाढत चाललेल्या या वैज्ञानिक युगात ” जल प्रदूषण” मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

” जल प्रदूषण” म्हणजेच नदी, नाले, तलाव, समुद्र, जलाशयांचे साठी यांना दूषित करणे. आत्ताच्या काळात बघावे तिकडे मोठ- मोठे कारखाने बघायला मिळतील.

या कारखान्यांमध्ये दिवसाला कित्येक लिटर पाणी रोज वापरले जाते. कारखान्यातील रासायनिक पदार्थ या पाण्यामध्ये मिसळले जातात व नको असलेले पाणी नद्या, नाल्यांना सोडले जाते.

त्याच नद्यातील पाणी आपल्या रोजच्या जीवनात वापरतो त्यामुळे साथीचे रोग, पोटाचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. व जल प्रदूषण हि होत चालले आहे.

ग्रामीण भागामध्ये नदी किनाऱ्यावर बायका कपडे धूतेत, जनावरे धूतलेली दिसतील व नदी किनाऱ्यावरच विष्ठा केली जाते तेच पाणी नदीला जाऊन मिळते. व नदीतील जन-जीवन धोक्यात येते.

आपल्या पर्यावरणामध्ये ” पर्यावरण साखळी” बघायला मिळेल म्हणजेच एका सजीवावर दुसरा सजीव निर्धारित असतो म्हणजेच जल प्रदूषणाने नदी, तलाव, समुद्रातील मासे अजून काही अन्य जीव

असतील तर ते त्यांचे मृत्यू होऊन जाते व माशांवर निर्धारित असणारे दूर जीव आपोआप नष्ट होतात. व हीच साखळी पुढे असंच चालत राहते.

तसेच नदी पात्रात पाला- पाचोळा, प्लास्टिकचा कचरा जमा झाल्याने नदीला पूर येण्याची शक्यता असते. सन १९८५ मध्ये मुंबई मधील मिठी नदीला आलेल्या पुराचे कारण म्हणजेच नदीमध्ये साचलेला कचरा.

” जल प्रदूषण” ही आजच्या काळात सर्वात मोठी समस्या बनली आहे. ” जलप्रदूषण” रोखने हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

जल प्रदूषण टाळण्यासाठी उपाय- योजना :-

जल प्रदूषण थांबवण्यासाठी प्रत्येकाला पुढे यायलाच हवे. पाणी आपले जीवन आहे व आपल्या जीवनाला आपणच वाचविले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचे जलप्रदूषण रोखण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.

१) जल- प्रदूषण थांबवण्यासाठी नदी, नाले, विहिरी, तलाव अशा ठिकाणी कचरा टाकण्याची थांबविले पाहिजे.

२) समुद्र- तळावर जहाजांतून होणारी तेल- गळती थांबविले पाहिजे.

३) सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी घाण करू नये.

४) पाण्यातील रोगकारक जिवाणूंची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे.

५) पिण्याचे, पाण्याचे नियमित परीक्षण करणे.

६) कीटकनाशकांचा वापर कमी करणे.

७) नदीकिनाऱ्यावर कपडे, जनावरे होणाऱ्या आळा घालणे.

पाला- पाचोळा, प्लास्टिकचा कचरा जमा झाल्याने नदीला पूर येण्याची शक्यता असते. सन १९८५ मध्ये मुंबई मधील मिठी नदीला आलेल्या पुराचे कारण म्हणजेच नदीमध्ये साचलेला कचरा.

” जल प्रदूषण” ही आजच्या काळात सर्वात मोठी समस्या बनली आहे. ” जलप्रदूषण” रोखने हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.


२) वायू प्रदूषण :-

“वायु ” म्हणजेच ‘ हवा’ आणि हवेचे महत्व सर्वांनाच माहिती. अन्न- पाणी नसेल तर आपण चार- पाच दिवस जगू शकतो. पण हवा नसेल तर १० मिनिट ही नीट जगणं कठीण आहे. म्हणून आयुष्य जगायला प्रत्येक सजीवाला ‘हवा ‘ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

” वायू प्रदूषण” हि सर्व जगाला भेडसावणारी व पर्यावरणाला दूषित करणारी गंभीर समस्या आहे. वायू प्रदूषणामुळे हवेत विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ हवेत अशा प्रमाणात मिसळलेले जातात की,

त्यामुळे हवेच्या नैसर्गिक गुणवत्तेत अशाप्रकारे बदल होतो की ती हवा आपल्याला श्वसनात दूषित ठरली जाते. आजच्या वैज्ञानिक युगात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे,

वाहनातून निघणारे विषारी वायू वातावरणामध्ये मिसळले जातात. व ती हवा दूषित होऊन श्वासाने आजार होण्याची समस्या वाढते. वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, कारखान्यांची वाढती संख्या यांचा परिणाम वायुप्रदूषणावर होत आहे.

कारखान्यातून निघणारे घातक वायू ते वातावरणात मिसळून जातात. व त्यांच्या परिणाम सजीव सृष्टीवर होतो. मोठ- मोठ्या इमारती व कारखान्यांसाठी आपुरी जागा यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.

झाडांची संख्या कमी झाल्याने वातावरणातील Oxigen वायूचे प्रमाण कमी होऊन कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण वाढले आहे. वायू प्रदूषणामुळे सूर्यापासून आपले रक्षण करत असलेला ओझोन थर विरळ होत चालला आहे.

त्यामुळे सूर्यापासून निघणारी घातक किरणे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे कर्करोग, त्वचेचे आजार, कॅन्सर यांसारख्या रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.

वाढते शहरीकरण हे एक वायू प्रदूषणास भारत घालणारे प्रमुख कारण ठरत आहे. शहरी भागांमध्ये झाडांची संख्या कमी व वाहनांची चालली आहे.

२०१४ च्या WHO ( World Health Organization ) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायुप्रदूषणामुळे संपूर्ण जगभरात ७ दक्षलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता.

वाहनांमधून निघणारा नायट्रोजन ऑक्साईड व डाय-ऑक्साइड (NO + NO२), कोळसा व रॉकेल जळाल्याने निघणारा सल्फर ऑक्साईड (SO२) यांचा परिणाम मानवी जीवनावर होतोच तसा प्राणी, पक्षी इतर सजीव प्राण्यांवर ही होतो.

आरोग्यास अत्यंत हानीकारक असलेला वायू कार्बन मोनॉक्साईड (CO ), वीट भट्ट्या, वीज निर्मिती केंद्र, वाहनांची इंजिने यामधून बाहेर पडतो. याचा परिणाम शरातील ऑक्सिजन कमी करण्यास व हिमोग्लोबिन यांच्यावर होतो.

वायु प्रदूषणामुळे वातावरणात २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकाराचे अतिसूक्ष्म धूलिकण आढळतात. ते फुफ्फुसांवर डायरेक्ट अटॅक करतात.

वायू प्रदूषण टाळण्यासाठी उपाय- योजना :-

वायु प्रदूषण म्हणजे वातावरणामध्ये घातक व दूषित पदार्थ मिश्रित होणे. ते थांबण्यासाठी आपल्याला काही उपाय करण्याची गरज आहे.

१. वायू प्रदूषण टाळण्यासाठी मुख्यतः वाहनांचे प्रदूषण पातळी तपासली पाहिजे.

२. कुठेही कचरा जाळणे, रबर, ट्यूब, प्लास्टिक जाळणे इत्यादी टाळावे.

३. लोकवस्ती पासून कारखाने दूर असावे याची काळजी घ्यावी.


३) ध्वनि प्रदूषण :-

“ध्वनि ” म्हणजेच ‘ आवाज’ आपल्याला परिसरात अनेक कर्कश आवाज आपल्याला ऐकायला मिळतील. काही चांगले तर काही कर्कश आवाज ऐकायला येतील.

नको असलेला, खूप जोराचा आवाज म्हणजेच ध्वनि प्रदूषण. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहनांचा हॉर्नचा आवाज वातावरणामध्ये पसरत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार ध्वनी स्तराचे सुरक्षित माप ४५ डेसिबल असल्याने सांगितले आहे. आणि ९० डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी वातावरणामध्ये पसरल्याने बहिरेपणा येण्याची शक्यता आहे.

वातावरणामध्ये जास्त ध्वनी पसरल्याने चिडचिडपणा राग व रक्तवाहिन्या संकुचित होतात. हृदयाच्या कामाची गती अतिपतळीमध्ये वाढते. व सारख्या- सारख्या येत असलेल्या आवाजामुळे शरीतील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आणि हार्ट स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

ध्वनी प्रदूषण टाळण्याचे उपाय :-

१. लाऊड स्पीकर, डीजे, इत्यादी मोठ्या आवाजात न वाजवता मध्यम व कमी आवाजात ठेवावा.

२. वाहनांच्या उगाचच येणाऱ्या कर्कश आवाज, हॉर्न वर बंदी घालते.

३. कारखाने निवासी वस्तीपासून दूर करावे. कारण कारखान्यातील चिमण्यांचा आवाजापासून दूर राहता येईल.

४. वाहने वेळेवर दुरुस्ती केली पाहिजे.


४) भूमी प्रदूषण :-

” भूमी” म्हणजेच ” जमीन/ माती” यांचे होणारे प्रदूषण म्हणजेच ‘ भूमी प्रदूषण’ हवा, पाणी, प्रमाणेच जमीन हि अत्यंत आवश्यक नैसर्गिक घटक आहे.

वाढते औद्योगिकरण, उद्योगधंदे यामुळे जमिनीचा ऱ्हास होत चालला आहे. कारखान्यातील रासायनिक पदार्थयुक्त पाणी जमिनीवर सोडल्याने जमिनीतील उपयुक्त जीव- जंतूंचा नाश होतो.

शेतामध्ये फवारले जाणाऱ्या कीटकनाशके यामुळे जमिनीची धूप होते. व जमीन नापीक होतो. सूर्यापासून येणारे अतिरिक्त उष्णतेमुळेही घेऊन प्रदूषण वाढत आहे.

वाढते, शहरीकरण, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थांचे विल्हेवाट जमिनीवर लावली जात आहे त्यामुळेही भूमी प्रदूषण होत आहे.

भूमी प्रदूषण टाळण्याचे उपाय :-

१. शेतामध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करणे.

२. दूषित पाणी जमिनीवर न सोडता चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावणे.


ये देखील अवश्य वाचा :-