गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Essay On Guru Pornima In Marathi

गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Essay On Guru Pornima In Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुव्रिष्णू ;

गुरुदेवो महेश्वरः ।

गुरु: साक्षात परब्रम्ह

तस्मै श्रीगुरवे नमः ।।

अर्थात गुरू ला ब्रह्मा, विष्णू, आणि महेश्वर म्हणजेच महादेव पेक्षा आहे श्रेष्ठ व महान स्थानं आहे.

‘ गुरु’ म्हणजेच काय, ” अंधकार दूर करणारा” सत्याचा मार्ग दाखवणारा, चांगलं- वाईट शिकवणारा, समाजा- मध्ये वागायला शिकविणारा म्हणजेच आपल्या आयुष्याला योग्य ते वळण व मार्ग दाखविणारा व्यक्ती.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहिलं ‘ गुरु’ हा आई- वडील असतेत. जे आपल्याला या सुंदर आशा जगामध्ये घेऊन येतात. लहानपणापासून आपले संगोपन करतात. चांगले विचार शिकवतात.

समाजामध्ये ताठ मानेने आपण राहावे म्हणून धडपड करत असतात. स्वतः कुठल्या गोष्टीचा विचार न करता आपल्या मुलांचे आयुष्य चांगले व्हावे हि इच्छा मनात धरून जगतात. म्हणूनच आई- वडील आपल्या पहिले ‘ गुरु’ आहेत.

गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Essay On Guru Pornima In Marathi

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणा मध्ये वेगवेगळे ‘ गुरु’ प्रत्येकांकडून वेगवेगळे ज्ञान नवीन- नवीन विचार शिकायला म्हणतात.

अशा या गुरुंसाठी ‘ गुरुपौर्णिमा’ हा दिवस या गुरुंसाठी पाळला जातो. ज्ञानाचे भांडार असलेल्या अशा या गुरूंना ‘ गुरुपौर्णिमा’ दिवशी सगळे शिष्य मिळून ‘ गुरु पौर्णिमेच्या’ शुभेच्छा देतात. काही भेट वस्तू देऊन आपल्याला गुरूंचे स्वागत केले जाते.

जुलै- ऑगस्ट महिन्याच्या पौर्णिमेला ‘ गुरु पौर्णिमा’ असते. आकाशामध्ये चंद्राचा आकार गोल झालेला असतो व चांदण्यांचा पाऊस पडलेला असतो. अशा या पौर्णिमेला ‘ गुरुपौर्णिमा’ म्हणून ओळखले जाते.

प्राचीन काळापासून ‘ गुरूंना’ अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.

शिवाजी महाराजांच्या गुरु वीर माता जिजाऊ होत्या त्यांनी शिवाजी महाराजांवर लहानपणापासून वीर- शूरवीर शिकवण दिली म्हणून शिवाजी महाराज घडले.

एकलव्याचे गुरु हे द्रोणाचार्य होते. त्यांनी आपल्या गुरूंचा म्हणजेच द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार करून धनुर्विद्याचे ज्ञान प्राप्त केले.

द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला त्यावर एकलव्यानी कशाचाही विचार न करता आपला अंगठा द्रोणाचार्यांना दिला. यावरून कळते की गुरु बद्दल एक्लव्यांना किती निष्ठा होती. तसेच,

‘ साने गुरुजी’ यांचे ही ‘ गुरु’ त्यांची आई होती. त्यांनी ‘ श्यामची आई’ या पुस्तकामध्ये आपल्या गुरूंच्या कथा लिहिल्या आहे.

आई- वडीलानंतर आपले पहिले गुरू शाळेत गेल्यावर ‘ शिक्षक’ असतात. ते आपल्याला ज्ञान देतात. शाळेमधले ‘ गुरु’ आपल्याला मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांचे ज्ञान देतात.

त्यासोबतच मैदानावर खेळणे, चांगले लेखन, वाचन चार लोकांसमोर बोलण्याचे धाडस शाळेतील गुरुंपासूनच प्राप्त होते.

कॉलेजमध्येही आपल्याला वेगवेगळे ‘ गुरु’ मिळतात. भावी पिढीचे डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक घडविण्याचे काम हे गुरु करत असतात.

तसेच, ” गुरुपौर्णिमा” ही सद्गुरूंची पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. पौर्णिमा म्हणजेच ‘ प्रकाश’ गुरु हि या प्रकाशाप्रमाणेच आहेत. ते आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतात. त्यांना असलेले ज्ञान प्रकाशाप्रमाणे सर्वत्र पसरवण्यासाठी प्रयत्न करतात.

‘ गुरुचरित्र’ या ग्रंथांमध्ये गुरूंच्या ध्यानाचे, ज्ञानाचे, सेवेचे, भावाचे, व त्यांच्या लीलांचे वर्णन केलेले दिसेल भारतीय गुरुपरंपरेत आपल्याला गुरु-शिष्याच्या अनेक जोड्या बघायला मिळतील

जसे की शुक्राचार्य- जनक, कृष्णा- सुदामा, राम- लक्ष्मण, द्रोणाचार्य- अर्जुन या गुरु- शिष्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला दिसेल की गुरु-शिष्यांच्या नात्यातील प्रेम, निष्ठा, श्रद्धा किती दृढ होती.

गुरु -आज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जातात हे सत्य आहे आणि हे सत्य पुढील कित्येक वर्षे असेच राहील.

” गुरू बिन ज्ञान कहा से लावू ” हे वाक्य अत्यंत खरं आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. परंतु गुरूजवळ शिष्याने नम्र वागल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही.

” निराकार गुरु, गुरुरे निर्गुण।

गुरू सृष्टीकर, गुरु विश्वंभर” ।।

म्हणजेच गुरु हा एकमेव मार्ग आहे, जो आपल्यातील निर्गुन ओळखून तीन नाहीसे करण्याच्या मार्गावर असतो. तसेच गुरूंना सृष्टीकर अशीही उपमा दिलेली आहे. हे जग, सृष्टी निर्माण करण्याची ताकद एका गुरु मध्ये असते.

जीवनामध्ये गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व सद्द्गुरूंनाही आहे. ‘ गुरु पौर्णिमे’ दिवशी सद्गुरुनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।

मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी ।

तेथे तुझे सद्द्गुरू पाय दोन्ही ।।

सद्गुरु म्हणजे मानवजातीला अध्यात्मिक मार्ग दाखवणारे, भक्तांना मोक्ष देणारे, परमार्थ दाखवणारे सद्गुरु यांनाही आपल्या आयुष्यामध्ये गुरु एवढेच स्थान आहे.

म्हणून अशा या सर्व गुणांनी पूर्ण असलेला गुरूंच्या मार्गावर चालल्यानी आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांवर मत देण्याचे धाडस आपल्या मध्ये येईल म्हणून माझ्याकडून माझ्या सर्व गुरूंना ‘ गुरुपौर्णिमेच्या’ खूप खूप शुभेच्छा.


ये देखील अवश्य वाचा :-