माझा आवडता खेळ मराठी निबंध । Essay On Favorite Game

माझा आवडता खेळ मराठी निबंध । Essay On Favorite Game

आपल्या आजूबाजूला अनेक खेळ खेळले जातात. काही बैठे स्वरूपात तर काही खेळ मैदानी स्वरूपामध्ये खेळले जातात. भारत देशामध्ये तर खेळाला खूप महत्व दिले जाते.

काही लोकांनी तर खेळायला करिअरच केले आहे. जसे की सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट खेळाला आपले आयुष्य मानले आणि क्रिकेट मध्येच आपले करिअर करून आयुष्य घडविले.

तरी आज आपण माझा आवडता खेळ यावर निबंधा बघणार आहोत.

माझा आवडता खेळ मराठी निबंध । Essay On Favorite Game

प्रत्येक व्यक्तीच्या आवडी- निवडी, स्वभाव हा वेगळा असतो. कोणाला हा लिहायला आवडते तर कुणाला डान्स करायला, वाचायला, फिरायला आवडते.

प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तिप्रमाणे त्यांच्या आवडी ही वेगळ्याच असतात, तसेच प्रत्येकांच्या आवडीचा खेळ ही वेगळाच असू शकतो. तरी आज आपण माझा आवडता खेळ क्रिकेट बद्दल निबंध बघणार आहोत.

माझा आवडता खेळ मराठी निबंध

संपूर्ण जगात आणि भारत देशाचा लोकप्रिय खेळ म्हणून मान मिळविणारा एकमेव खेळ म्हणजेच क्रिकेट. असे म्हणतात की मनुष्याला तंदुरुस्त राहण्यासाठी व आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते.

आणि क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या मध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच क्रिकेट खेळामध्ये बुद्धी देखील वापरावे लागते त्यामुळे बुद्धीचाही विकास होतो,

मी लहानपणापासून घरांमध्ये आजोबा व वडिलांना T.V. मध्ये क्रिकेट बघताना बघत आलेलो आहोत. सुरुवातीला मला देखील क्रिकेट आवडत नसे पण मी घरामध्ये आजोबां सोबत बसून क्रिकेट बघण्यास सुरुवात केली. व बाहेर गल्लीमधील मुली नेहमी क्रिकेट खेळत

त्यांना ही बघत असत त्यामुळे मला क्रिकेट खेळाबद्दल हळू- हळू माहिती होऊ लागली. बॅट काय असते व त्याचा आकार कसे असते. बॉल कसे टाकतात व त्यांचे प्रकार हि देखील कळाले.

बॅटिंग म्हणजे काय, बॉलिंग म्हणजे काय, फिल्डिंग काय असते, हे जसं- जसं मी क्रिकेट बघत गेलो मला कळायला सुरुवात झाली. व क्रिकेट कडे माझा रस वाढू लागला

मी ही क्रिकेट बघण्यास सुरू केले व गल्लीतील मुलांच्या संघामध्ये माझी देखील भर पडली व क्रिकेट हा माझा सर्वात आवडता खेळ झाला.

व मला कळाले की क्रिकेट हा असा एक मात्र खेळ आहे, ज्याला लहान- मोठे, वयस्कर, महिला आणि मुली सुद्धा पसंत करतात. क्रिकेट ह्या खेळाला मैदानी खेळ म्हणून देखील ओळखले जाते.

तरी सुद्धा क्रिकेट ची लोकप्रियता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतात साधारणता प्रत्येक गल्ली- बोळात लहान मुलांपासून वडीलधाऱ्या लोकांपर्यंत सर्वजण क्रिकेट खेळतात.

T.V. ला क्रिकेटचे सामने आहेत असे म्हणताच सगळेजण आपापली कामे सोडून T.V. समोर येऊन बसतात. काही क्रिकेट प्रेमी तर कामाला सुट्टी घेऊन खेळ बघत असतात. काहीजण क्रिकेटच्या सामानांवर पैसे देखील लावतात.

त्यात आणखी भर म्हणजेच अलीकडे होणाऱ्या IPL मॅचेस मुळे, आंत-राष्ट्रीय मॅचेस मुळे क्रिकेटचे आणखी जास्त वेड लागले आहे.

मुले तर IPL कधी चालू होईल त्याची आतुरतेने वाट बघतात आणि भारतामध्ये IPL चे सामने सुरु झाल्याने ते भारतातील लोकांसाठी उत्सवा पेक्षा कमी समजले जात नाही.

IPL च्या सामने सुरु असताना प्रत्येकांच्या घरातील T.V. मध्ये IPL च चालू असतांना दिसेल. व त्यामुळे क्रिकेटचे आणखी जास्त वेड लागले आहे.

भारत देशातील क्रिकेट खेळाचे भगवान म्हणून ओळखले जाते ते सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट खेळामध्ये आपले करिअर करून सगळ्यांसमोर आदर्श म्हणून उभारले आहे.

महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा त्या खेळाडूंना मैदानामध्ये क्रिकेट खेळताना बघून आपणही असेच खेळावे. हा विचार मनात येतो. व क्रिकेट बद्दल आणखी रोमांचिकता वाढते.

मुख्यतः क्रिकेट खेळामध्ये दोन संघ असतात प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू असतात. त्या प्रत्येक संघात १ कर्णधार असतो व ७ बॅटस्मन व ४ बॉलर असतात. व बॉल आणि बॅटचा खेळ म्हणून देखील क्रिकेटला ओळखले जाते.

क्रिकेटचे सामने मुख्यतः एक दिवसीय सामना तर काही पाच दिवसीय सामना असतात. तरी आपण क्रिकेट खेळाला लागणाऱ्या साहित्याची वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत.

मुख्यतः क्रिकेट हा मैदानी खेळ असल्याने क्रिकेटला मैदानी आवश्यकता आहे.

१) क्रिकेट खेळाचे मैदान :-

क्रिकेट खेळाचे मैदान हे आकाराने गोलाकार असते. मैदानाच्या मध्यभागी एक पट्टी असते, तिची लांबी २०.१२ मी. व रूंदी ३.०४ मी. येवढी असते व या पट्टीच्या भागापासून ते ६८.५७ मी.

पर्यंतच्या अंतरावर एक रेषा असते व त्या रेषेच्या आतील सर्व क्षेत्र क्रिकेटचे मैदान म्हणून वापरले जाते.

२) क्रिकेट खेळाच्या नियम व अटी :-

प्रत्येक खेळामध्ये काही न काही नियम व अटी असतात. क्रिकेटच्या खेळांमध्ये सुरुवातीला टॉस केला जातो. जी टीम टॉस जिंकेल त्यात टीमचा कर्णधार सुरुवातीला

बॅटिंग करणार का बॉलिंग करणार हे ठरविले जाते. व त्यानुसार निर्णय घेऊन मॅचला सुरुवात होते. व खेळाडू खेळाच्या बाहेर जातो म्हणजे बाद होतो हा निर्णय अंपायर कडे असतो.

भारत सरकारने शाळा, महाविद्यालयां मधून जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय क्रिकेटच्या स्पर्धा घेण्याचा निर्णय करून, ‘ रणजी ट्रॉफी’ ‘ दिलीप करंडक’ व ‘ इराणी ट्रॉफी’ सामनां मध्ये

चमकणाऱ्या खेळाडूंपैकी उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे प्रतिनिधित्व दिले आहे. त्यामुळे मुलांना क्रिकेट बद्दल आणखी आवड निर्माण व्हावी.

या सर्व क्रिकेटच्या माहितीमुळे मला देखील कधी- कधी वाटत असतं आपण पण क्रिकेटर व्हावं व सचिन तेंडुलकर यांच्या सारखं आपलं नाव उंच करावं म्हणून मी शाळा, महाविद्यालयां मध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात त्यामध्ये सहभागी होत असतो.

पण माझं एक उत्कृष्ट क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण झालं नाही. तरीसुद्धा क्रिकेट हा माझा सर्वात आवडता खेळ राहिल. कारण आपल्या समाजामध्ये मुलं- मुली मोठी झाली की त्यांच्यावर अभ्यासाचा तणाव टाकला जातो व सर्व खेळ बंद होतात.

त्यामुळे खेळ माझे करियर तर नाही होऊ शकत. तरी सुद्धा मी माझ्या जीवनात मी जे काही करेन मी माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी सारखं अतिशय उत्कृष्ट करेन एवढा मात्र नक्की व क्रिकेटला माझ्या आयुष्यात न जाऊ देता क्रिकेट हा माझा सदैव आवडता खेळ राहील.


ये देखील अवश्य वाचा :-