भारतातील विविध प्रकारचे पिकांची माहिती
भारताला ” कृषिप्रधान” देश म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी चे भारतातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळते.
भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान असल्याने त्या त्या हवामानाला पूरक ठरणारी पिके घेतली जातात.
भारतातील विविध प्रकारचे पिकांची माहिती
Table of Contents
याच हवामानानुसार भारतामधील पीक पद्धती दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. ती म्हणजे,
- रब्बी हंगामातील पिके.
- खरीप हंगामातील पिके.
1. रब्बी हंगामातील पिके :-
पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात थंडी असते व द्रवबिंदूंचे ही प्रमाण वाढलेले दिसते याच ऋतू काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये काही पिके घेतली जातात. त्यांना रब्बी हंगामातील पिके असे संबोधले जाते. रब्बी हंगामध्ये अधिक उत्पन्न व्हावे या उद्देशाने आंतरपीक पद्धती वापरली जाते.
अंतरपीक पद्धती म्हणजेच दोन पिके किंवा दोन पेक्षा जास्त पिके एकाच वेळी व एका जमिनीवर पेरली जातात, त्याला ” अंतरपीक पद्धती” असे म्हणले जाते. त्यात दोन पिकांमध्ये एक पीक हे मुख्य पीक असते तर दुसरे पीक आहे दुय्यम पीक असते. या पद्धतीमुळे उत्पादनामध्ये वाढ होते. आर्थिक खर्च वाचतो म्हणजेच मशागत करणे वाचते तसेच तणांचा/ गवतांचा प्रादुर्भावा पासून बचत होते.
रब्बी हंगामामध्ये मुख्यतः खालीलप्रमाणे पिकांचे उत्पन्न घेतले जाते,
हरभरा :-
अंतरपीक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे तसेच रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून हरभरा या पिकाला ओळखले जाते. मानवी आहारामध्ये देखील हरभराला महत्त्वाचे स्थान आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस हरभरा चे पिक, उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसत आहे. व एक महत्त्वाचे कडधान्य म्हणून हरभरा पिकाचे उत्पन्न वाढताना दिसत आहे.
हरभऱ्याचे बियांमध्ये प्रथिने व कार्बोहायड्रेट्स व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात व भिजलेल्या हरभरा हा टॉनिक सारखा गुणकारी असतो व मोड असलेल्या हरभरा मध्ये बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व आढळते म्हणून बाजारात देखील हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ज्वारी :-
रब्बी हंगामातील महत्वाचे घेतले जाणारे ज्वारी हे पीक. ज्वारी हे तृणधान्यातील महत्त्वाचे पीक आहे. व भारतामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. व स्थानिक भागातील व ज्या भागामध्ये ज्वारी पेरली जाते त्या भागातील लोकांच्या आहारातील ज्वारी हे मुख्य पीक मानले जाते.
महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. ज्वारीमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात.
व ज्वारीचे वाळलेले पीक हे जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोगात येते.
बटाटा :-
रोजच्या आहारातील मुख्य पदार्थ म्हणजेच बटाटा. बटाट्याचे पीक हे रब्बी हंगामामध्ये घेतले जाते. व या पिकाची लागवड, नागपूर, बीड, औरंगाबाद, पुणे, सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतली जाते.
उद्योग-धंद्यात देखील बटाट्याचे उपयोग केले जाते. म्हणजे बटाटा वापरून अनेक उद्योगधंदे उभारले आहेत.
बटाटा मध्ये पोटॅशियम, फायबर, लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते म्हणून बाजारामध्ये बटाट्याला विशिष्ट मागणी मिळते.
गहू :-
रब्बी हंगामातील महत्वपूर्ण पीक म्हणजे गहू. भारतामध्ये एकूण उत्पादनांपैकी ३% उत्पादन गहू पिकामुळे होते. म्हणूनच जगामध्ये भारताचा गहू उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे.
गहू पिकासाठी थंड, कोरडे हवामान लागते म्हणून भारतातील पंजाब राज्याला गव्हाचे कोठार म्हणले जाते. गहू पिकाची पेरणी साठी मध्यम ते भारी व पाण्याचा लवकर निचरा होणारी जमीन लागते. गहू पिकाची पेरणी ही दोन ओळीत २२.५ सेमी अंतर ठेवून करावी.
गहू मध्ये जीवनसत्व ‘ अ’ चे प्रमाण जास्त आढळते. म्हणून भारतामध्ये सर्वत्र गहूची चपाती आहारामध्ये खाल्ली जाते. म्हणून बाजारामध्ये गव्हाला जास्त मागणी असल्याचे दिसते.
कांदा :-
आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरला जाणारा कांदा हा रब्बी हंगामामध्ये पिकविला जातो. मुख्यतः व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा कांदा भाजीपाला पीक आहे.
भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. व आहारामध्ये कांदा वापरला जातो. पाण्याचा निजरा होणारी जमीन व सेंद्रिय खते वापरून कांद्याची लागवड केली जाते. सोम्य हवामान कांद्याच्या पिकाला पूरक ठरते.
2. खरीप हंगामातील पिके :-
खरीप हंगामातील पिके म्हणजेच जी पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, किंवा पावसाच्या पाण्यावर पीक घेतली जातात त्यांना खरीप हंगामातील पिके म्हणतात.
म्हणजेच जी पिके जून- जुलै महिन्यामध्ये पेरली जातात व नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यामध्ये काढणीला येतात. खरीप हंगामामध्ये मुख्यतः खालील प्रमाणे पिकांचे केले जाते.
मका :-
खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे महत्वाचे तृणधान्य पीक म्हणजेच मका. जगात मक्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात म्हणजेच मका उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो.
मकाच्या पिकासाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी, मध्यम व अधिक जलधारणा शक्ती असलेली असावी तसेच उष्ण आणि थंड हवामानाची ही गरज मक्याच्या पिकाला लागते.
मक्याचा उपयोग हा ब्रेड, लाह्या, अल्कोहोल, सायरप बनवण्यासाठी होतो. भारतामध्ये ओला मका भाजून खाण्यासाठी मोठी मागणी असल्याचे दिसते.
ऊस :-
वार्षिक पीक म्हणून ओळखले जाणारे उसाचे पीक हे खरीप हंगामामध्ये घेतले जाते. उसाला तृणवर्गीय वनस्पती म्हणून ओळखले जाते.
भारतामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते व महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये उसाच्या उत्पादनांमध्ये प्रमुख आहेत. ऊस पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागते व आद्रता असलेले हवामान उसाच्या पिकाला पूरक ठरते.
मुख्यतः उसाची लागवड ही साखर व गुरु उत्पादनांसाठी केली जाते. आर्थिक दृष्ट्या उसाच्या पिकाला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून बाजार पेठ मध्ये ऊसाला मोठी मागणी आहे.
कापूस :-
नगदी पीक म्हणून ओळखला जाणाऱ्या कापसाची लागवड खरीप हंगामामध्ये होते. सुती कपडे तयार करण्यासाठी कापसाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.
जमाच्या क्षेत्राच्या दृष्टीने एक चतुर्थांश क्षेत्रामध्ये भारतात कापूस पिकविला जातो.
भारतात महाराष्ट्र व विदर्भामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. कारण इथे कापसाचे पीक घेतले जाते तसेच कापसापासून सुट्टी कपड्याची निर्मिती केली जाते.
कापसाच्या बिया म्हणजेच सरकी पासून खाद्य तेल केले जाते व गुरांचे खाद्य म्हणून देखील वापर केला जातो. तसेच देवाकडे दिव्याला वाती बनवण्यासाठी देखील कापूस वापरला जातो म्हणून बाजारपेठांमध्ये कापसाला मोठी मागणी आहे.
तूर :-
दविदल धान्य म्हणून ओळखले जाणारे तूर हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकासाठी मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरली जाते.
भारतामध्ये तूर पिकाला मोठी मागणी आहे. कारण या कडधान्यांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात वापरतात व भारतीय लोक तूर दाळीचा वापर रोजच्या आहारामध्ये करतात. या पिकांसाठी दमट व आद्रतेचे हवामान पूरक ठरते, आर्थिक दृष्ट्या महत्वाचे व फायदा चे पीक मानले जाते.
तांदूळ :-
एक महत्त्वाचे धान्य म्हणून तांदुळाला ओळखले जाते. खरीप हंगामा मध्ये तांदळाचे पीक घेतले जाते. भारतामध्ये ६५% लोक रोजच्या जीवनात तांदळाचा उपयोग आहारात भात म्हणून करतात. म्हणून तांदूळ हे मुख्यतः भारतीय आहे असे संबोधले जाते.
भारतामध्ये कोकण, केरळा, आंध्र प्रदेश या भागांमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. तांदळाच्या पिकाला पाणी भरपूर लागल्याने भात शेती मुख्यतः पाण्याचे ठिकाणी केले जाते.
अशा प्रकारे भारतामध्ये वर्षांमध्ये दोन हंगा मध्ये शेती केली जाते व रब्बी हंगाम व खरीप हंगाम असे मिळून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन वेगवेगळ्या पद्धतीने करून भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळख करून देण्यास मोठे योगदान ठरले आहे. वर्षांमध्ये नगदी पिक, तृणधान्ये, कडधान्ये यांचे उत्पादन घेतले जाते.
विविध पिकांमधून कमी जास्त प्रमाणात उत्पन्न होऊन आर्थिक व्यवस्थेला मदत होते. भारतामध्ये विविध भागात प्रदेशात वेगवेगळे म्हणजे कुठे थंड तर कुठे उष्ण. असे वातावरण बघायला मिळते तसेच जमिनीमध्ये ही वेगवेगळे प्रकार असल्याने प्रत्येक भागात वेगवेगळे उत्पन्ना कमी- अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते