स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध । Importance of Cleanliness Essay In Marathi

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध । Importance of Cleanliness Essay In Marathi

आपण सुंदर दिसावे, नीटनीटके राहावे, बाहेर कुठे गेल्यावर प्रत्येकाने आपल्याला बघावे अर्थात आपण स्वच्छ व टीप टॉप दिसावे असे प्रत्येकाला वाटते म्हणून प्रत्येकजण स्वतःची वैयक्तिक काळजी घेत असतो,

स्वच्छ ठेवण्याची धडपड करतो, तसेच आपले घर आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो व स्वच्छता ही ठेवत असतो.

आणि आपली व आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. व ते सर्वजण योग्य रीतीने पार ही पाडतात, पण समाजाचे काय? आपल्या देशाचे काय? याचा विचार कोणी करत नाही.

पण स्वतःला समाजाचा महत्वपूर्ण घटक समजतो. याच समाजामध्ये स्वतः स्वच्छ दिसावे म्हणून धडपड करतो पण त्या समाजाची स्वच्छता करणार तरी कोण?

आपण आपले घर परिसर स्वच्छ ठेवतो पण आपल्या घराच्या परिसराच्या बाहेर निकिता सगळे कडे कचरा, छान, अस्वच्छतेने घातलेले थैमान बघायला मिळेल. त्या अस्वच्छतेचा परिणाम शेवटी आपल्याच जीवनावर होणार असतो.

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध । Importance of Cleanliness Essay In Marathi

अस्वच्छतेमुळे परिसरात समाजामध्ये आपल्या देशामध्ये दुर्गंधीचा पसरते, बघावे तिकडे कचऱ्याचे मोठ-मोठी दिसतील. कुठेही फेकलेल्या प्लास्टिक पिशव्या यामुळे नाले – गटारे तुम तुंबतात दुर्गंधी पसरते व डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

आपले आयुष्य सुखात जावे म्हणून पैसा कमवित असतो. परंतु या अस्वच्छतेमुळे रोगराई पसारते व कष्टाने कमवलेले पैसा दवाखाना, औषध-पाणी खर्च होतो. म्हणजेच अस्वच्छतेचा परिणाम आपल्या रोजच्या जनजीवनावर होती.

अन्न, पाणी व निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे आपण लहानपणापासून हे बरोबर आहे पण

या मूलभूत गरजांसोबत स्वच्छतेला ही जोडणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. कारण आपल्या परिसरामध्ये अस्वच्छतेचे मोठे संकट आलेले आहे म्हणून प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व कळणे ही गरजेचे बाब झाली आहे.

भारत देश हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन ती योग्य रीतीने पार पाडल्यास हे अस्वच्छतेचे संकट नक्की दूर होईल.

ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात अशिक्षित असल्याने त्यांना स्वच्छतेचे पाहिजे तेवढे ज्ञान नसल्याने ग्रामीण भागामध्ये अस्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात दिसेल.

येथील लोक उघड्यावर विष्टा करते. संडासाची सोय नसल्याने दुर्गंधी झालेली दिसेल, गटारीची व्यवस्थापन नीट नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही व डासांचे प्रमाण वाढते व डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगाची लागण होते व येथील लोक या आजारांना बळी पडतात.

समाजामध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती व्हावी म्हणून अनेक थोर नेत्यांनी, संतांनी, समाजसुधारकांनी प्रयत्न केले. ” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांनी ही स्वच्छतेसाठी लढा दिला ते ग्राम स्वच्छतेसाठी लढले.

त्यांनी लोकांमध्ये स्वच्छतेसाठी आपुलकी वाढवली आपलं पूर्ण दिवस ते स्वच्छता करीत. तुकडोजी महाराजांनी स्वतः हातात झाडू घेऊन जावा स्वच्छ करायला निघाले. त्यांनी आपले जीवन स्वच्छतेला अर्पण केले.

” राष्ट्रपिता ” म्हणून ओळखतो ते ” महात्मा गांधी” हे ही स्वच्छतेचे पुजारी होते. ते स्वतःची कामे स्वतः करत बोलू का नाही तसाच संदेश देत. महात्मा गांधी नेहमी स्वच्छते बद्दल काही वाक्य बोलायचे ती म्हणजे अशी………………

१) प्रत्येकाने स्वतः केलेला कचरा स्वतः साफ केला पाहिजे.

२) स्वच्छता ला आपल्या जीवनामध्ये असं स्वीकारला पाहिजे की स्वच्छता करणे आपली सवय झाली पाहिजे.

३) चांगली साफ- सफाई ही भारतातली गावांना आदर्श बनवू शकेल.

४) महात्मा गांधी म्हणतात राजनीतिक स्वतंत्र पेक्षा स्वच्छता अधिक महत्त्वाचे आहे.

५) जर कोणा व्यक्ती स्वच्छ नसेल तर त्याचं स्वास्थ ही चांगली राहू शकत नाही.

वरील प्रत्येक वाक्यातून गांधीजींनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे. माणसाने चांगले आयुष्य जगण्याची असेल तर तेला स्वच्छ राहणे बंधनकारक आहेत.

थोर समाज सेवक ” सेनापती बापट” हे स्वच्छतेचे आदर्श मूर्ती होते. स्वच्छते बद्दल ची लोकांच्या वृत्तीच बदल घडवून आणण्यासाठी ते स्वतः गाव स्वच्छ करीत व लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करत.

अशा तऱ्हेने अनेक पुरुषांनी देखील स्वच्छता ला महत्वाचे स्थान देऊन त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.

आपण आणि ठिकाणी लिहिलेले वाचतो की, ‘ स्वच्छता’ हा ” समृद्धीचा पाया आहे” समृद्धी म्हणजेच प्रगती आणि आपली प्रगती व्हावी हे प्रत्येकालाच वाटत असते मग त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे आपण स्वच्छ असेल तर प्रसन्न वाटते,

कामामध्ये मन लागते तसेच परिसर स्वच्छ असला तर वातावरण समृद्ध, शीतल व शुद्ध राहते त्याचा फायदा आपल्याला मानसिकतेवर होत. आळस, ताण येण्यापासून मुक्ती मिळते. यासाठी स्वतःला स्वच्छतेची सवय, शिस्त लावणे अत्यंत गरजेचा आहे.

आपण दैनंदिन जीवनामध्ये उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे बस स्थानके, रेल्वे स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणी दिवसातून एकदा तरी जातो. बसने, रेल्वेने प्रवास करतो. त्या वाहनांमध्ये लिहिलेले असते ‘ येथे थुंकू नका ‘,

‘ कचरा टाकू नका’, ‘ कचरा फक्त कचरा कुंडलीमध्ये टाकावा’

अशा सूचना आपण वाचतो, परंतु तसे वागत नाही. अशी ही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे.

आपण बागेत जाऊन तिथे काहीतरी खाद्यपदार्थ खातो; परंतु केलेला कचरा आपण कचराकुंडीत न टाकता इकडे तिकडे फेकत असतो पण आपण तसे न करता कचरा हा कचरा कुंडी मध्येच भेटला पाहिजे.

आपण स्वतःच्या शरीराची, घराची जशी काळजी घेत असतो, तशीच काळजी या सार्वजनिक गोष्टींचीही घ्यायला हवी. लहानपणापासून आपल्याला घरात, शाळेत, महाविद्यालयामध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाते.

शाळेमध्ये कार्यानुभव या विषया मार्फत स्वच्छता किती महत्त्वाचे आहे याचे ज्ञान मुलांना दिले जाते, तर महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रमांच्या मार्फत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. ‘२६ जानेवारी’ किंवा ‘१५ ऑगस्ट’ रोजी लहान- मुलांना काही घोषवाक्य दिली जातात, जसे की………

  • सांडपाणी नको रस्त्यावर,

       डासांचे पैदाईशीला घाला वर.


  • स्वच्छता पाळा,

       रोगराई टाळा.


  •  परिसराची करू सफाई,

       आरोग्याची होईल कमाई.


  •  जिथे तिथे टाकल घाण,

        आरोग्याला होईल ताण.

अशाप्रकारे शाळा, महाविद्यालया मधूनही मुलांच्या मनामध्ये स्वच्छते बद्दल बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जातो.

याच स्वच्छतेसाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न “स्वच्छ भारत” याला पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबर २०१४ ला ” स्वच्छ भारत अभियान” चालू केले.

व त्यांच्या या अभियानाला 10 मधील ४ घरामध्ये शौचालय होते पण जस जसं हे अभियान संपूर्ण देशामध्ये पसरले लोकांना स्वच्छतेचे महत्व कळाले तसे देशामध्ये स्वच्छतेला सुरुवात झाली व अनेक लोकांनी योगदानही दिले.

सिनेमा, नाटक, मालिका यामार्फत देखील लोकांना स्वच्छतेची महत्व पटवून देण्यास सुरुवात झाली, व आज खेड्या- पाड्यात महत्व सर्वांनी कळाले तर एक दिवस आपण सर्व गर्वाने म्हणू शकतो,

” माझा भारत, स्वच्छ भारत” व सगळीकडची दुर्गांधी, अस्वच्छता दूर होऊन स्वच्छतेचे साम्राज्य बघायला मिळेल.

रोगराई, साथीचे रोग यांचे प्रमाण कमी होऊन एक निरोगी आयुष्य जगण्यास मदत होईल म्हणूनच स्वच्छताही महत्त्वाची आहे व निरोगी आयुष्य जगण्याचा पाया आहे.

स्वच्छता हे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य आहे व सर्वांनी पार करायलाच हवे प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेला सुरुवात करावी म्हणजे सुरुवातीला स्वतःला स्वच्छ, नीटनेटके ठेवून घर आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.

व आपले शेजारी- पाजारी लोकांना, नातेवाईकांनाही स्वच्छतेचे महत्व सांगून स्वच्छ राहण्यास सांगावे म्हणजे एक ना एक दिवस संपूर्ण देशामध्ये स्वच्छता झालेली दिसेल व ” स्वच्छता हाच समृद्धीचा पाया आहे” हे वाक्य सत्य होईल.


ये देखील अवश्य वाचा :-