राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी मध्ये । Essay On Peacock

राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी मध्ये । Essay On Peacock

प्रस्तावना,

भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून आपली वेगळीच ओळख ठेवणारा पक्षी म्हणजेच ” मोर”. लहान मुलांपासून ते वडिलधाऱ्यां पर्यंत जर विचारले तुमचा आवडता पक्षी कोणता ? तर प्रत्येकाचे उत्तर हे ” मोर” च असेल.

दिसायला अतिशय सुंदर असल्याने मोर हा सर्वांचा आवडता पक्षी बनला आहे व राष्ट्रीय पक्षांचा मान मिळवला आहे. मोर मुख्यतः पानझडी जंगल, दाट झाडी मध्ये पाहायला मिळतो व ते आसऱ्यासाठी रात्रीच्या वेळी झाडांवर राहतात.

राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी मध्ये । Essay On Peacock

आपण जरी ‘ मोर’ म्हणून ओळखत असलो तरी या सुंदर व रंगीबेरंगी पक्ष्याला शास्त्रीय भाषेत Pavo Cristatus (पावो क्रिस्टेटस ) या नावाने ओळखला जातो. जसे की म्यांमार हा देशाचा राष्ट्रीय पक्षी हा मोरच आहे.

मोराचे वर्णन :-

शरीराची लांबी चोचीपासून ते शेवटीपर्यंत १०० ते ११५ सेमी असते व पूर्ण वाढ झालेल्या मोराची लांबी म्हणजेच पिसाऱ्यासहित २०० ते २५० सेमी असते. अशा या सुंदर पक्ष्यांचे वजन हे ४-६ किलोपर्यंत असते.

इतर पक्ष्यांप्रमाणेच मोर व नर रूपात आढळतो. नराला मोर तर मादी लांडोर मानले जाते. दोघेही म्हणजेच नर व मादी मध्ये जराही साम्य नसते.

‘ लांडोर’ या पक्षाची लांबी साधारणता: ९०-९५ सेमी असते वजन २.५ – ४ किलो पर्यंत असते. मोराला सुंदर रंगीबिरंगी, सप्तरंगी पिसारा असतो तोच लांडोर ला किंचितही पिसारा नसतो.

मोराला पाऊस हा खूप आवडतो अशी कल्पना आहे व मोर पावसामध्ये आपला पिसारा फुलवून नाचतो. कधी कधी लांडोर आकर्षित करण्यासाठी ही मोर पिसारा फुलहून नाचत असतो.

मोर कुक्कुडवर्गीय पक्षी आहे. भारतातील गुजरात, राजस्थान या भागात मोर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. श्रावण महिन्यामध्ये रिमझिम पावसामध्ये आपला पिसारा फुलवून नाचताना दिसतो, तसेच म्याव SS म्याव हा आवाजात देखील ओरडतांना दिसेल.

भारतामध्ये शक्यतो मोर पाळायला कायद्याने गुन्हा मानला जातो व मोर पाळल्यास परवानगी काढावी लागते.

मोराचे खाद्य :-

मोर किडे, उंदीर, साप यांना खातो म्हणून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी मोराला आपला मित्र समजतात. मोर पिकांचे नुकसान करणारे उंदीर, साप यांचे भक्षण करतो त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होते.

पण अलीकडे आदिवासी जमाती मधील मोर खाण्यासाठी म्हणजेच मोराचे मांस खातात. यामुळे अलीकडे मोराचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.

मोराचे आणखी एक प्रकार मध्ये पांढरा मोर पण हा अतिशय दुर्मिळ प्रमाणांत आढळतो, मुख्यतः मोकळ्या जंगलात व शेतामध्ये मोर पाहिला जातो. आसपास कोणाची चाहूल लागताच मोर आपला पिसारा फुलवितो.

प्राचीन तथ्य :-

प्राचीन व धार्मिक काळापासून मोराला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. विद्येची देवता सरस्वती ते वाहन ही मोर असल्याचे दिसते तसेच कार्तिकेय स्वामी चे ही वाहन मोर च आहे.

तसेच मोराचा डौलदार पिसारा सप्तरंगी रंग व मानेवर असलेला तुरा या कारणांसह मोराला ” पैठणी” या मराठी महवस्त्रावर स्थान देण्यात आलेले आहे. तसेच लेखक, कवी यांनीही मोराबद्दल बरेचसे लेख लिहिलेले दिसतील.

लहान मुलांना देखील ” नाच रे मोरा” या कवितेतून मोराच्या सौंदर्याची कल्पना करून देण्यात येते मोराच्या सौंदर्यामुळे मोराला प्राणिसंग्रहालयात ही ठेवले आहे.

लग्न असो या अजून कुठला कार्यक्रम असो सजावटी साठी मोराच्या छायाचित्र बघायला मिळतील च चित्रकार असो वा कवी यांनी ही मोरावर लिहायला चित्र काढायला आवडतेच.

म्हणूनच ‘ श्रीकृष्ण’ च्या डोक्यावर असलेला रंगीबिरंगी पिस हा या मोराचेंच आहे. राजा महाराजांच्या राजवाड्यांनी मध्ये देखील मोर पहायला मिळते. सजावटीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यामध्ये देखील मोराच्या आकृत्या बघायला दिसतात.

म्हणूनच चित्रपटामध्ये गाणे देखील मोरांच्या नावावर असल्याचे आपल्याला बघायला मिळेल तसेच सम्राट अशोक, चंद्रगुप्त मोरया राजांच्या नाण्यांवर देखील मोर कोरलेले दिसतील. व प्राचीन राजा महाराजे मयूर म्हणजे मोराच्या सिंहासनावर बसत असल्याचे दिसते.

मोर हा पक्षी विणीच्या हंगामध्ये लांडोर पक्षी अंडी घालते व एका वेळी ३ ते ५ अंडी घालते. पण अलीकडे राजस्थान हायकोर्टचे न्यायाधीश महेशचंद्र शर्मा यांनी मोर हा ब्रह्मचारी असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या मते मोराचे अश्रू टिपल्यामुळे लांडोर गर्भवती होते असे सांगितले व त्यांच्या या मताला अनेक पक्षीतद्यांनी ही पाठिंबा दिलेला आहे. व आयुर्वेदामध्ये मोराच्या पिसांचा उपयोग औषधांमध्ये होतो असे सांगितले आहे.

भारतीय संस्कृतीला गायला जेवढे पवित्र स्थान आहे. तेवढेच मोरला ही आहे. व मोराला निळकंठ या नावाने देखील ओळखले जाते.

मोराचे पाय बारीक सडपातळ व शरीराचे वजन जास्त असल्याने मोर जास्त वेगाने उंचावर उडू शकत नाही. पण मोराचे सौंदर्य कलाकारांना एक उत्तम प्रेरणा देणारे आहे.


ये देखील अवश्य वाचा :-