झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी । Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी । Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

जीवन जगण्यासाठी लागतो तो ‘प्राणवायू’ म्हणजेच ऑक्सिजन आणि तो मिळतो या झाडापासून यावरूनच कळते कि आपल्या आयुष्यात झाडांच्या किती महत्व आहे.

झाडे लावा झाडे जगावा” हा नारा आपण लहानपणा-पासून ऐकत आलेलो आहे.

अगदी प्राचीन काळापासून झाडांना अतूट नाते आहे, झाडे नसतील तर आपणही नसू या रूढीमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान झाडांना दिले आहे.

झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध । Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

माणसाला रोजच्या जीवनात १५ किलो पर्यन्त प्राणवायू म्हणजे च ऑक्सिजन लागतो. आणि सात झाडे जेव्हा ऑक्सिजन सोडतील तेव्हा १५ किलो ऑक्सिजन होतो, यावरून कळेल हि आपल्याला झाडे किती मोठ्या प्रमाणात लागतील.

झाडे हि आपल्याला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी व सुंदर देणगी आहे.

ज्या परिसरातमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे असतील त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त बगायला मिळेल व तिकडचा परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ वातावरणाचा दिसेल हवा हि शुद्ध असेल.

अनेक संत, कवी, लेखक,  यांनी आपल्या लेखनातून झाडाचे महत्व सांगितले आहे.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” झाडे आपली मित्र आहेत हे या वाक्यातून बगायला मिळेल.

झाडे ऑक्सिजन देतातच पण सोबत झाडाचे विविध फायदे आपल्याला बगायला मिळतील, म्हणजेच आपण श्वसनाद्वारे ऑक्सिजन घेत, व कार्बन डायॉक्सिएड बाहेर सोडतो आणि झाडे हा कार्बन डायॉक्सिएड शोषून घेतात. झाडाचे असेच बरेचसे फायदे आपल्याला बगायला मिळतील.

आंब्याचे झाड :-

” आंबा ” हा सर्वांनाच माहिती आहे. तसेच आंब्याच्या झाडाचे विशिष्ट महत्व व फायदेही देखील आहेत.

ते म्हणजे आंब्याचे संपूर्ण झाडाचं कुठल्या न कुठल्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडते. आंब्याचे झाडाच्या पानाचा उपयोग हा घरामध्ये दरवाजाला तोरण बांधण्यासाठी होतो व विविध सजावटीमध्ये होतो.

आंब्याचे बुधा, फांद्या यापासून टेबल, खुर्ची फर्निचरचे सामान बनविण्यासाठी आंब्याचे लाकूड वापरतात व आंब्याचे फळं “आंबा ” हे तर सर्वांचे आवडते व फळांचा राजा म्हणून ओळखले जाते.

तुळशीचे झाड :-

भारतीय संस्कृतीतील अतिशय धार्मिक महत्व असलेले तुळशीचे झाड वातावरणातील हवेला शुद्ध करण्याचे काम करते, तसेच पुराणानुसार तुळशीचे झाडाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढली जाते.

नारळाचे झाड :-

धार्मिक, व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाणारे नारळाचे झाड माणसाला विविध प्रकारे मानले जाते. “नारळ ” या फळाला पवित्र मानले जाते व धार्मिकतेचे तर नारळ हे फळ प्रतीकच आहे.

कडुलिंबाचे झाड :-

कडुलिंबाच्या झाडाला बहुपयोगी झाड म्हणून ओळखले जाते. या झाडाची पाने, फळे, बिया, साल मुळे सर्वच अतिशय कडू असतात. या झाडाचे पानाचा रस पिल्याने लट्टपणा कमी होतो व या

झाडाचे काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत तसेच मूळव्याध या रोगावर गुणकारी आहे.

कढीपत्त्याचे झाड :-

रोजचे स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा कढीपत्ता शरीरसाठी अत्यंत गुणकारी आहे. कढीपत्ताच्या पानाने रस रोज पिल्याने पचनशक्ती वाढली जाते, तसे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते व

कढीपत्ता तारुण्य टिकून ठेवण्यास मदत करतो तसेच कढीपत्ता पानाचा रस केसांमध्ये लावल्याने केलं गाळणे थांबून जाते.

चंदनाचे झाड :-

सुगंधी वृक्ष म्हूणन आपली वेगळीच ओळख ठेवत असलेले चंदनाचे झाड. हे झाड माणसाला अत्यंत उपयोगी ठरते. या झाडाच्या लाकडापासून सौदंर्य प्रसाधने बनविले जातात.

पळसाचे झाड :-

विशिष्ट औषधी गुणधर्म ठेवणारे हे पळसाचे झाड या झाडाच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी बनविले जाते व पळसाची फुले पाण्यात ठेवून ते पाणी पिल्याने पोटाचे विकार कमी होतात.

पिंपळाचे झाड :-

अतिशय पवित्र मानले जाणारे हे पिंपळाचे झाड अनेक धार्मिक गोष्टी आहेत पिंपळाचे झाडाच्या मागे व या झाडाचे लाकूड मजबूत असते ते दरवाजे, खिडकी बनवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

अशा प्रकारे वरील आपण काही प्रकारच्या झाडाचे महत्व व त्यांचे उपयोग बघितले आहे आपल्याला व आपल्या वातावरणाला शुद्ध निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. वातावरण थंड ठेवण्यामागेही झाडांचे योगदान आहे.

अशा प्रकारे झाडे मानवाला बहुपयोगी ठरतात. व आर्थिकदृष्ट्या हि देखील मदत करतात.

वातावरणामध्ये होणाऱ्या प्रदूषण रोखण्यासाठी  अतिशय उपयुक्त मानले जातात. शरीरासाठी पोषक व आवश्यक असणारे अन्न हि झाडांपासून प्राप्त होते.

आपण आपल्या येणाऱ्या पिढीची कल्याणासाठी पैसेची बचत करतो पण याचा या बहुउपयोगी असणाऱ्या झाडाची बचत करतो का ? आजचे जग हे वैज्ञानिक युगाकडे वाटचाल करत चालायचे आपल्याला दिसत आहे

या त्यासाठी वृक्षतोडीचे प्रमाण आहे. झाडे तोडून आपण आपल्या गरजा तर पूर्ण करू शकतो पण त्यामुळे होणारे प्रदूषण कसे थांबवायचे ? हा प्रश्न आपल्यासमोर आहे.

कारखाने, उद्योगाकडे, औद्योगिकरणामुळे व वाढत्या शहरीकरणामुळे झाडे मोट्या प्रमाणात तोडली जात आहेत. व वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनात व आजच्या काळात झाडांची आणखी भासत आहे.

झाड तोडायला ५ मिनटे लागतात पण तेच झाड लहानाचे मोठे होण्यासाठी कित्येक वर्षाचे कालावधी ओलांडावा लागतो.

‘वृक्षतोड ‘ मोठ्या प्रमाणात झाल्याने सूर्यापासून येणाऱ्या घातक किरणांचे रक्षण करणाऱ्या ओझोन थराला घट लागली आहे व छिद्रे पडलेली दिसत आहेत यामुळे सूर्यापासून येणारे UV (Ultra Violet) किरण पृथ्वीवर डायरेक्ट अटॅक करत

आहेत त्यामुळे त्वचेचे रोग यांसारखे रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे व याच वृक्षतोडीचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे दुष्काळ अशा समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

तर अश्या समस्यांना थांबायचे असेल तर वृक्षलागवड केलीच पाहिजे तसेच प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीला आवश्यक ऑक्सिजन व झाडामुळे मिळणाऱ्या वेगवेगळ्या उपयोगांना लाभ भोगायला मिळेल व

वातावरण निरोगी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल ते म्हणजे वृक्षलागवडीने. व निसर्गामध्ये पावसाचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल ते या झाडामुळेच त्यामुळे “झाडे लावा झाडे जागवा ” या धोरणांचे सर्वानी पालन करणे कर्तव्याचे आहे.

तर मित्रांनो, ” झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी । Zade Lava Zade Jagva Essay in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-