मराठी मधील बारा महिन्यांचे माहिती। Twelve Marathi Months Essay in Marathi

मराठी मधील बारा महिन्यांचे माहिती। Twelve Marathi Months Essay in Marathi

प्रस्तावना :

आजच्या युगात युग डिजिटल होत चालले आहे. त्यात सगळे इंग्रजी भाषेच्या जास्त हावी जात आहे. त्यामुळे मराठी भाषेवर दुर्लक्ष होत आहे.

आज कोणालाही मराठी महिन्याची नावे सांगा म्हणजे तो व्यक्ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च………….. असे सांगेल. पण मराठी महिने सांगता येणार नाहीत.

तर आज आपण संपूर्ण मराठी महिन्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी मधील बारा महिन्यांचे माहिती। Twelve Marathi Months Essay in Marathi

इंग्रजी प्रमाणेच मराठी मध्येही बारा महिने असतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीष, पौष, माघ व फाल्गुन व प्रत्येक महिन्यांचे आपले वेगवेगळे वैशिष्ट्य असतो.

चैत्र महिना महिती :-

हिंदू कालगणनेनुसार / पंचांगानुसार चैत्र महिन्या पासून नववर्षाची सुरुवात होते. वर्षातील पहिला महिना म्हणून ही चैत्र महिन्याला ओळखले जाते.

चैत्र महिना म्हणजे अंगाला थोडीसी चाहूल येते. चैत्र म्हणजे कडक उन्हाचे दिवस सोबतच मनाला मोहीविनारे म्हणजेच चैत्र महिन्यात झाडाला नवीन पालवी आलेली असते.

फळांमध्ये गोडावा येण्याचे ते दिवस. मुलांसाठी तर अगदी आनंदाचा महिना मुलांना आवडते व फळं, फळांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या आंब्याची सुरुवात चैत्र महिन्या मध्येच होते.

तसेच वसंत ऋतु आज चैत्र महिन्यामध्येच चालू होतो. नवीन वर्षाची सुरुवात ” गुढीपाडवा” या मराठी सणापासून होते. ” गुढीपाडव्याला” घरोघरी गुढी उभारली जातील व पुरणपोळी चा नैवेद्य केला जातो. अशाप्रकारे चैत्र महिन्याचे वेगळेच महत्व आहे.

वैशाख महिना माहिती :-

हिंदू कालगणनेतील दुसरा महिना म्हणजेच ‘ वैशाख’ या महिन्यांमध्ये अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्राद्ध, दान, जप केल्याने पुण्य मिळते अशी समजूत आहे.

काही लोक या दिवसाला अशुभ मानतात कारण पितरांचे श्राद्ध केले जाते.

जेष्ठ महिना माहिती :-

चैत्र, वैशाख नंतर येणारा महिना म्हणजेच ज्येष्ठ महिना.भारतीय संस्कृती मध्ये सण- वार, परंपरा, चालीरीती त्यांना वेगळेच स्थान आहे. या महिन्यांमध्ये स्त्रियांचा महत्त्वपूर्ण सण ” वटपौर्णिमा” वन नवविवाहित स्त्रियांचा ” मंगळागौरी” हे सण येतात.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ” वटपौर्णिमा” म्हंटले जाते.

या दिवशी बायका नवीन वस्त्रे घालून घरात पुरणपोळीचा स्वयंपाक करून वडाच्या झाडाची पूजा करतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला दोरा बांधून सातवेळा प्रदिक्षणा घालतात.

मंगळागौरीची पूजा करून या व्रताचे महत्व म्हणजेच अखंड सौभाग्य मिळावे म्हणून हा व्रत केला जातो अशी प्राचीन काळापासूनची समजूत आहे.

आषाढ महिना माहिती :-

हिंदू कालगणनेनुसार वर्षाचा चौथा महिना ” आषाढ” असतो. पावसाळाचे आगमन आषाढ महिन्यातच होते. या महिन्यातील महत्वपूर्ण सण म्हणजे ” गुरु पौर्णिमा” व ” आषाढी एकादशी”.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला महत्वाचे स्थान आहे. अशा या गुरुंसाठी साजरा केला जाणारा सण ” गुरु पौर्णिमा” आषाढ मध्ये असते.

” आषाढी एकादशी” वर्षातील येणाऱ्या सर्व एकादशींपेक्षा आषाढी एकादशी खूप मोठी समजली जाते. महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर मध्ये या दिवशी खूप मोठी वारी असते.

विठ्ठलाचे भक्त लाखोंच्या संख्येने जमलेले असतात. आषाढ महिन्यामध्ये केळी मोठ्या प्रमाणात बाजार मध्ये विकली जाते.

श्रावण महिना माहिती :-

श्रावण महीना म्हणताच चेहऱ्यावर वेगळाच भाव येतो त्यामागचे कारण म्हणजे श्रावणात होणारा रिमझिम होणारा पाऊस, आकाशात दिसणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य, कुठून तरीहा हळूवार येणारा कोकीळेचा “कुऊ कुऊ” आवाज यामुळे श्रावण महिना सर्वांचा आवडता महिना आहे.

अगदी सुखावणारा, मनाला मोहीवनारा, डोळ्याला वेगळाच हा म्हणजेआनंद देणारा महिना सोबतच आवती- भवतीचे वातावरण निसर्गमयी व हिरवेगार बघायला मिळणार ते म्हणजे श्रावणातच श्रावण महिन्यात येतो

तो सण म्हणजे नागपंचमी या सणाला बायका नागाची पूजा करतात नागाला दूध व लाह्याचा प्रसाद देऊन नमस्कार करतात. तसेच “नारळीपौर्णिमा ” हा सण श्रावण मध्येच येतो.

या दिवशी समुद्राची पूजा केली जाते, कोळी लोक समुद्राला सोनाच्या नारळ अर्पण करतात.

” गोकुळाष्टमी” हा सण श्रावणामध्ये येतो. श्रीकृष्णाची भक्तीभावाने पूजा केली जाते. जन्माष्टमी ला दहीहंडी खेळून हा सण साजरा करतात. श्रावण संपायला येणार तोच जगाला पोशिंदा असलेल्या

शेतकऱ्याचा जिवलग मित्र म्हणजेच बळीराजाचं सण बैलपोळा” येतो. या सणाला शेतकरी बैलाची पूजा करता, त्याला झूल घालून सजवतात त्याचे आभार मानून प्रेमाने पुरणपोळ्या घास भरवितात.

भाद्रपद महिना माहिती :-

हिंदू कालगणनेतील सहाव्या क्रमांकाचे महिना म्हणजेच भाद्रपद महिना.

लहान- मुलांपासून ते वडीलधाऱ्या लोकांपर्यंत हा महिना कधी येईल अशी आतुरता असते त्यामागचे कारण म्हणजे भाद्रपद महिन्यात ” गणेश चतुर्थी” येतो.

सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचे आगमन भाद्रपद महिन्यात होते. दहा दिवसांचा हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. गौरी विसर्जन व गणपती विसर्जन असे सण साजरे करत हा सण केला जातो.

अश्विन महिना माहिती :-

हिंदू कालगणनेतील अत्यंत महत्त्वाचा महिना अशी आपली वेगळी ओळख ठेवणारा हा अश्विन महिना.

या महिन्यात सणांची जणू लागोपाठ, एका मागे एक अशी रांग लागलेली असते. हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे धार्मिक प्राचीन सण या महिन्यात येतात.

या महिन्यात सणांची सुरुवात होते ती म्हणजे ” नवरात्र” पासून या सणात दुर्गा देवीची नऊ दिवस पूजा केली जाते. बायका नऊ दिवस देवीचा उपवास करतात. नऊ दिवस देवीला नऊ रूपामध्ये भक्ताच्या दर्शनासाठी तयार केले जाते.

देवीचे मंदिर सजविले जातात व नऊ धान्ये टाकून देवीचा ” घट” बसविला जातो, व दहाव्या दिवशी ” दसरा” येतो.

दसऱ्याला मंदिरात पूजा केली जाते, व रात्री रावण जाळला जातो. व आपट्याची पाने या पानांना दसऱ्यामध्ये विशेष महत्त्व आहे. आपट्याची पाने एकमेकांना देत दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण असा मान घेतलेला ” दिवाळी” / ” दीपावली” हा सण भाद्रपद महिन्यातच येतो. दिवाळीमध्ये सर्वत्र रोषनाई बघायला मिळते.

कार्तिक महिना माहिती :-

हिंदू कालगणनेनुसार वर्षातील आठवा महिना हा कार्तिक महिना आहे. या महिन्यांमध्ये ” भाऊबीज” हा सण येतो या दिवशी बहिण- आपल्या भावाला ओवाळते ये भाव आपल्या बहिणीला ओवाळणी देतो.

आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे ” कार्तिक एकादशी”

” कार्तिक एकादशी” ही वर्षातील सर्वात मोठ्या एकादशी पैकी आहे.

मार्गशीर्ष महिना माहिती :-

हिंदू कालगणनेनुसार वर्षातील नववा महिना मार्गशीष महिना आहे. त्या महिन्यात ” दत्त जयंती” उत्सव असतो.

चतुर्दशी किंवा मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. तसे मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीदेवी ची पूजा केली जाते.

पौष महिना माहिती :-

हिंदू कालगणनेनुसार वर्षातील दहावा महिना पौष महिना आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ” मकर संक्रांति” हा सण असतो. या सणाला लोक ” तिळ- गुळ” देऊन मकर- संक्रांतीच्या शुभेच्छा देतात व

या सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जाते. पूर्वीपासून असा समज आहे की पौष महिन्यात लग्न करून या.

माघ महिना माहिती :-

हिंदू कालगणनेतील अकरावा क्रमांकाचा महिना म्हणजेच माघ महिना. या महिन्यात ” महाशिवरात्री” हा सण येतो. या दिवशी सगळे उपवास करतात. व महादेवाची पुजा- अर्चना करतेत. महादेवाच्या मंदिरात महादेवाचे अर्चना करते.

फाल्गुन महिना माहिती :-

हिंदू कालगणनेतील शेवटचा म्हणजेच बाराव्या क्रमांकाचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना. या महिन्यात कडाक्याची थंडी असते. व ” होळी” हा सण फाल्गुन महिन्यात येतो


ये देखील अवश्य वाचा :-