माझी शाळा मराठी निबंध । My School Essay In Marathi

माझी शाळा मराठी निबंध । My School Essay In Marathi

शाळा म्हणजेच काय विद्यार्थ्यांना घरा व्यतिरिक्त आपुलकीचे वाटणारे आणखी एक ठिकाण जिथे शिक्षणासोबतच संस्कार चांगले वाईट गोष्टीचे ज्ञान दिले जाते मित्र मैत्रीण नवनवीन गोष्टी ज्ञानाचा सागर शिकायला मिळतो तो इथेच या शाळेतच म्हणून शाळा ही आयुष्यात खूप महत्त्वाची असते,

प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका साकारत असते कारण घरा नंतर पहिल्यांदा मुलं कुठेतरी बाहेर जाते ते म्हणजेच या शाळेतच.

माझी शाळा मराठी निबंध । My School Essay In Marathi

माझ्या शाळेचे नाव नेहरू विद्यालय अगदी माझ्या घराजवळच माझ्या शाळेची इमारत स्थित होती शाळेची स्थापना ही १९५२ झालेली म्हणून लहानपणापासून घरांमधून शाळेचा परिसर बघत असत बघत असतात.

व मला त्या शाळेत जाण्याची इच्छा ही होतं परंतु माझी शाळा ही पाचवी ते दहावीपर्यंत होती जसं मी पाचवीला गेलो / गेले तसं नेहरू विद्यालय ही माझी शाळा झाली शाळाही घराजवळच असल्याने

मी शाळेत चालत जात व बरोबर शाळेमध्ये पोहोचण्यास मला दहा मिनिटे लागत पण माझे काही मित्र मैत्रीण दूर राहत असल्याने ते बस नी येत असत पाचवी च्या वयामध्ये ते बस नी बस शाळेला येत त्यामुळे मला त्यांचं आश्चर्य वाटते.

शाळेची इमारत व आसपासचा परिसर खूप निसर्गमय व मनमोहक होता शाळेमध्ये खूप आनंददायी वातावरण होता. शाळेची इमारत ही तीन मजल्यांची होती.

व शाळेच्या भिंतीवर सुविचार लिहिलेले होते. महान नेत्यांचे चित्र व त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेखही केलेला होता. त्यामुळे जिकडे नजर पडेल तिकडन वेगळा आणि महत्त्वपूर्ण असं ज्ञान मिळत. शाळा भरायची वेळ ही १०.४५ मिनिट होती.

माझ्या शाळेमध्ये शिस्त व नीटनेटकीपणाला खूप महत्त्व आहे. शाळेची पहिली घंटा १०.४५ वाजता जोराने शिपाई काका वाजवत घंटा वाजल्यानी ५ मिनिटाच्या आत मध्ये सगळे विद्यार्थी मैदानावर हजर राहण्याचा आदेश मुख्याध्यापकां कडून आलेला होता.

जर कोणी विद्यार्थी उशिरा आला तर त्याला दंड लावत होती दंडाच्या भीतीने सगळे बरोबर वेळेला मैदान मध्ये हजर राहत. मग सगळे मैदानावर जमल्यास मुलं-मुली वेगवेगळे आपल्या इयत्तेनुसार एक रेषेत एका हाताच्या अंतराने आम्ही उभे राहत होतो.

  • सोमवार – इयत्ता पाचवी
  • मंगळवार – इयत्ता सहावी
  • बुधवार – इयत्ता सातवी
  • गुरुवार – इयत्ता आठवी
  • शुक्रवार – इयत्ता नववी
  • शनिवार- इयत्ता दहावी

अश्याप्रकारे त्यादिवशी त्या वर्गातील माझ्या शाळांमध्ये प्रत्येक इयत्तेसाठी एक वेगळा दिवस नेमून दिलेला होता त्या त्या दिवशी त्या वर्गातील दोन मुली समोर येऊन प्रार्थना म्हणत व त्याच

वर्गातील एक मुलगा आजचा वार, दिनांक व एक सुविचार सांगत, मग त्या त्या वर्गाचे वर्गशिक्षक विद्यार्थ्यांनी सांगितलेलं सुविचाराचा अर्थ सांगून, वर्तमानपत्र मधील ठळक बातम्या आम्हाला वाचून दाखवत.

नंतर मग मुख्याध्यापक सर किती विद्यार्थी उपस्थित आहेत क्रमांकाने मोजून घेत होतो. व काल गैरहजर किंवा जे विद्यार्थी गणवेश घालून आले नाहीत त्यांना दंड म्हणून शाळेचे मैदान साफ करून घेत होते.

या सर्व शिस्त व टापटीप पणामुळे माझ्या शाळेला कोल्हापूर मधील आदर्श शाळाला म्हणून पुरस्कार मिळाला होता.

प्रत्येक विषयासाठी होत असे मिळून माझ्या शाळेत 40 शिक्षक, ७ मॅडम, ६ शिपाई काका, १ मुख्याध्यापक सर व १ उपमुख्याध्यापक असे मिळून आम्हा ६५० विद्यार्थ्यांना शिकवत होते.

माझ्या शाळेला शिस्त तर होतीच तसेच माझ्या शाळेतील शिक्षक ही खूप मेहनती होते शिकवण्या मध्ये, खेळामध्ये खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवत होते,

माझ्या शाळेची इमारत खूप मोठी होती त्यामुळे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अशी लॅब उभारलेली आहे. दोन संगणक लॅब व तीन विज्ञान विषयाच्या प्रयोगशाळाही आहेत.

प्रयोगशाळेमध्ये त्या त्या वेळेला प्रयोग घेऊन आम्हाला विज्ञान विषयाचे ज्ञान दिले जात होते. व आठवड्यातून दोन तास संगणक लॅब मध्ये घेतला जात होता व संगणकाचे ही ज्ञान दिले जाते.

शनिवारी आम्हाला सकाळी ७.३० वाजता शाळा भरते. शनिवारी प्रार्थनेच्या वेळेस P.T चे शिक्षक आम्हाला व्यायाम, कवायत, सूर्यनमस्कार घेतात. बुद्धी सोबत आमच्या शारीरिक वाढीबद्दल ही अतिशय योग्य पद्धतीने लक्ष दिले जाते.

व माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. जसे कि वार्षिक क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, नृत्य, चित्रकले इत्यादीचे आयोजन केले जाते व प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय उत्सुकतेने सहभागी ही होतो.

“२६ जानेवारी” व “१५ ऑगस्ट” ह्या दिवशी शाळेमध्ये ध्वजवंदन केले जाते. व आपल्याला भारत मातेसाठी बलिदान दिलेल्या महान व्यक्तींना वंदन करून त्यांचे विचार एकमेकांना सांगितले जातात.

आपल्या संस्कृतीची जाण रहावी या विचाराने आपले मुख्याध्यापक सर शाळेमध्ये विविध सणही साजरे करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात.

रक्षाबंधन, गणपती, होळी, मकर संक्रांति, दसऱ्याला आपट्याचे पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देणे ही सण दरवर्षी माझ्या शाळेमध्ये साजरी केली जातात

समाजामध्ये एक जबाबदारी, संस्कारी माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही गुण लागतात ते माझ्या शाळेमधून माझ्यावर देण्यात आलेले आहे.

मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचारांची जन्म द्यावा यासाठी माझ्या शाळेमध्ये भव्य असे वाचनालय उभारलेले आहे. जिथे सर्व प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत.

शाळा सुटल्याने ५ वाजता शाळा सुटल्याने १ तास हा वाचायला देण्याची अट केलेली आहे. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला नवनवीन गोष्टी वाचायला मिळतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते.

दिवसभराच्या तासांमध्ये विद्यार्थी कंटाळू नये या उद्देशाने चे पहिले तीन तास झाल्याने ( एक तास चाळीस मिनिटांचा असतो.) एक लहान सुट्टी केली जाते त्यामध्ये कोणाला पाणी प्यायचा असेल किंवा बाथरूम ला जायचे असेल

तर जाऊन येऊ शकेल नंतर आणखी तीन तासानंतर मोठी सुट्टी होते. त्यामध्ये आम्ही जेवण करतो मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत असतो व नंतर तीन तास होतात व शाळा सुटते वाचनालयाची वेळ चालू होत. हा आमच्या शाळेचा नियमित चा उपक्रम होता.

माझ्या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतले जातात. जेणेकरून विद्यार्थी दहावी मध्ये चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण होऊ शकेल.

अशा आमच्या या मेहनती शिक्षकांसाठी आम्ही ५ सप्टेंबरला ” शिक्षक दिन ” साजरा करून शिक्षकांचे व माझ्या शाळेचे आभार मानतो.

माझ्या शाळेने मला ज्ञान, चांगले विचार तर दिलेच पण सोबत समाजाबद्दल हि विचार करायला शिकवले पाण्याचे महत्व काही पटवून देण्यासाठी माझ्या शाळेतील शिक्षकांनी ” झाडे लावा, झाडे जगवा”

” पाणी आडवा, पाणी जिरवा ” , ” स्वच्छ भारत अभियान” या उपक्रमा मार्फत आम्ही घरोघरी जाऊन वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून लोकांचे स्वच्छतेचे पाण्याचे व झाडाचे महत्व सांगत त्यामुळे अज्ञानी लोक माझ्या शाळेचे कौतुक करत.

शाळेमध्ये कोण विद्यार्थी गरीब असल्यास शाळेतील शिक्षक मिळून त्या विद्यार्थ्यांना मदत करत त्यामुळे माझ्या मनामध्ये एकता व समानता भावना निर्माण झाली.

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी माझ्या शाळेतून निधी जातो त्यामुळे समाजाबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली.

माझी शाळा हे माझे मंदिर आहे आणि शिक्षक हे माझे गुरू आहेत. आयुष्य जगायला जे काही ज्ञान, संस्कार लागतात ते सगळे शाळे मधूनच मिळतात.

सर्वांगीण गुणांचा विकास होतो तो म्हणजे त्या शाळेतूनच आणि माझं सर्वांगीण विकासामध्ये माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे.

म्हणून मी गर्वाने म्हणू शकतो की माझी शाळा मला खूप, खूप आवडते व येथून मिळालेले संस्कार ज्ञान मी आयुष्यभर जपणार व माझ्या शाळेचे नाव उंचावणार.

तर मित्रांनो, ” माझी शाळा मराठी निबंध । My School Essay In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-