फुले बोलू लागली तर मराठी निबंध । Fule Bolu Lagli Tar Marathi Nibandh

फुले बोलू लागली तर मराठी निबंध । Fule Bolu Lagli Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” फुले बोलू लागली तर । Fule Bolu Lagli Tar Marathi Nibandh “ या विषयावर मराठी निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

फुले बोलू लागली तर मराठी निबंध । Fule Bolu Lagli Tar Marathi Nibandh

नेहमी प्रमाणे आज मी घरा- समोर असलेल्या फुलांच्या बागेत फिरण्यासाठी गेले असता बागेतील रंगीबेरंगी फुले रोज पेक्षा आज जरा जास्तच उमलली होती आणि आनंदाने डोलत होती. तेव्हा ते लहान- लहान मुले आली व झाडावर लागलेली ही रंगी- बिरंगी फुले तोडू लागली.

ते पाहून मला दुःख वाटलं व तेवढ्यातच माझ्या कानावर एक आवाज आला,

आई गं ! तोडलंस ना मला ! किती बरं दुखलं ! पण तुला काय त्याचं । आम्ही मुखी बिचारी ! आम्हाला तोडा, मोडा ओरबडा किंवा पायी तुडवा त्याने तुम्हाला काही इजा होणार नाही.

आम्ही आपली मुकी बिचारी ! तुम्ही मनुष्याने कितीही आम्हाला त्रास दिला तरीसुद्धा आम्ही मात्र आपले सुगंध देण्याचे काम करीतच राहणार !

तेवढ्यात मी ओरडलो कोण आहे ? काय म्हणलास ? कोण बोलतंय ? पुन्हा एक आवाज आला अरे आम्ही फुलं बोलतोय, फुलं !

कधी मी कल्पना केलीली ” फुले बोलू लागली तर ” आणि फुले खरंच बोलू लागली तर काय होईल ? तेवढ्यात पुन्हा फुलांच्या बोलण्याचा आवाज आला, आम्ही फुले नेहमी सुगंध देण्यासाठी उमलतो.

दिवसभर सर्वत्र सुगंध देऊन संध्याकाळी कोमलतो. तुम्ही तुमच्या स्वार्था साठी आम्हाला तोडता. कधी आमच्या पासून पुष्पगुच्छ बनवितात. तर कधी आमच्या पासून हार तयार होतो, तर बायका आमचा गजरा करून केसांत घालतात. सकाळी दिवस सुरू होतानाच प्रत्येकाच्या घरात देव पूजेसाठी आम्हाला मान मिळतो.

आम्ही धर्म- जाती असा भेद- भाव कधीच करत नाही. सर्वांना समान समजतो. कोण गरीब किंवा श्रीमंत असो. आम्ही प्रत्येकाला एक सारखा सुगंध देतो.

आम्ही बोलू शकत नाही म्हणून कोणीही आम्हाला कसेही तोडतात, चुरगळतात. आज आम्ही बोलू शकतो. म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोय. ” कधी फुलांच्या बागा पाहिल्यात का ? ”

कोणी नसतील पाहिल्या तर जरूर पाहा. आमचे विविध आकार, वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या सुगंध तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येतील. कोणी दु:खी असेल किंवा कोणाचे मन तुटले असेल अश्या व्यक्तींनी जरूर आमच्या फुल बागांत यावे.

आम्हा फुलांना मन भरुन पहावे. आमचा सुगंध अनुभवावा त्यामुळे तुमच्या जीवनातील थोडे फार दुःख नक्कीच कमी होतील. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. कधी ही कुठलेही आनंदाचे शुभ काम, लग्न समारंभ, प्रत्येक सणा सुदीला, मोठ- मोठ्या मंदिरात, शुसोभणी करताना, डेकोरेशन मध्ये आम्हाला खास महत्त्व मिळते.

आज आम्ही फुले बोलू लागलो तर सर्वात जास्त बोलायला आवडेल ते म्हणजे आमची निगा करणाऱ्या, आमची व्यवस्थित जोपासना करणाऱ्या, खत- पाणी पुरविणाऱ्या त्या माळी दादांशी कारण सर्वात जास्त आमची काळजी माळी दादाच घेतात.

आम्हाला सूर्य प्रकाश मिळावा म्हणून आमच्या वेलींची हळुवारपणे जोपासना करतात. त्यामुळे माळी दादांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आमचे आयुष्य फार तर एक ते दोन दिवसांचे असते. त्या एक- दोन दिवसातच आम्ही सर्व पक्षी, भुंगा, मधमाशी यांना आनंद देतो. मधमाशा आमच्या फुलांतील गंध शोषूनच मधाचे पोळे बनवितात.

त्यामुळे आम्हाला उगाचीच तोडून फेकण्या पेक्षा वेली वरतीच ठेवा त्यामुळे आमच्या वर अवलंबून असणाऱ्या पक्षींना, भुंग्यांना आणि मधमाशांना आमच्या पासून गरज भागेल. आम्हा फुलांमुळे परिसराची शोभा वाढते. त्यामुळे आम्हाला वेलीं वर बहरु द्या, आमची काळजी घ्या ही नम्र विनंती !

तर मित्रांनो ! ” फुले बोलू लागली तर मराठी निबंध “ वाचून आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” फुले बोलू लागली तर मराठी निबंध “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment