निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | ” Essay on Earthquake In Marathi “

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | ” Essay on Earthquake In Marathi “

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट वर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” निसर्गाचा प्रकोप भूकंप ( Essay on Earthquake In Marathi ) “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | ” Essay on Earthquake In Marathi “

अचानक पणे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावर थरथर कापणे किंवा अचानक हालचाली होणे म्हणजेच भूकंप. अलीकडे या भूकंपाचे प्रमाण वाढत चालले आहे. कुठेही कश्या ही प्रकारे या भूकंपाचे धक्के दिसताना दिसत आहे.

भूकंप हा एका प्रकाराचा निसर्गाचा प्रकोपच आहे.

ज्याप्रमाणे त्सुनामी लाटा, चक्रीवादळ आहे त्याप्रमाणेच हा भूकंप सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे.

भूकंप म्हणजे काय ?

भूकंप हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. पहिला ‘ भू ‘ म्हणजे ‘ जमीन ‘ आणि दुसरा शब्द म्हणजे ” कंप ” म्हणजेच ‘ थरथरणे ‘ याचा अर्थ जमीन थरथरणे होय.

भूगर्भातील हालचालींमुळे ऊर्जेचे प्रचंड प्रमाणात उत्सर्जन होते आणि परिणामी ” भुकंप लहरी ” तयार होतात. त्यामुळे पृथ्वीच्या भूपृष्ठभागाची हालचाल होते. त्याचा परिणाम जमीन थरथरणे, जमिनीला भेगा पडणे, कंपन होणे असा दिसून येतो आणि यालाच ” भूकंप ” असे म्हणतात.

जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगम स्थानास भूकंपनाभी म्हणतात आणि या भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात.

जेव्हा भूकंप येतो सर्वप्रथम भूकंपाच्या हालचाली या केंद्रा लगत जाणवतात आणि याच ठिकाणी भूकंपाचे परिणाम सुद्धा दिसून येतात. भूकंप ही सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे.

 भूकंपाची कारणे :

भूकंप येण्यामागे मुख्यतः दोन कारणे आहेत .

1. नैसर्गिक भूकंप.

2. मानवनिर्मित भूकंप.

1. नैसर्गिक भूकंप.

निसर्गाचा प्रकोप भूकंप होण्यामागे अनेक कारणे आहेत.

जेव्हा पृथ्वीच्या आवरणाच्या वरच्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचाली होतात तेव्हा नैसर्गिक भूकंप होतात. अश्या भूकंपामुळे पृथ्वी वरील तापमान वाढ होते. त्यामुळे ज्वालामुखी फुटतात व यातूनच पर्वत, डोंगर, यांचा जन्म होतो. खडकाळ सरकल्याने सुद्धा भूकंप होतात.

खडकाळ किंवा डोंगराळ भागात भूकंप होण्याची जास्त शक्यता असते.

2. मानवनिर्मित भूकंप / कृत्रिम भूकंप :

अधिकृतपणे, मानव निर्मित भूकंपांना समर्पित संशोधनाचा एक परिसर आहे. भूगर्भ शास्त्रज्ञ आणि भूकंप शास्त्रज्ञ असे म्हणतात की, भूकंपाचे मुख्य पाच मार्गांनी केले जाऊ शकते, ते म्हणजे असे.

1. पृथ्वीमध्ये द्रव इंजेक्शन.

2. पृथ्वीवरील द्रव उतारा.

3. खाणकाम किंवा उत्खनन.

4. परमाणु चाचणी.

5. धरणे किंवा जलाशयांच्या बांधण्या.

यांमुळे मानवनिर्मिती भूकंप होतात.

भूकंप मापन :

भूकंप मोजण्याच्या म्हणजेच भूकंपाची तीव्रता रिश्टर या मापनाने मोजली जाते आणि त्या यंत्राला सीझोमीटर म्हणतात.

सीझोमीटरमध्ये मोजलेले सामान्य मापन हे 2- 3 असते. भूकंपाच्या तीव्रतेच्या 7 रिश्टर पेक्षा जास्त प्रमाणित मापनामुळे नुकसान होते आणि 7 रिश्टर पेक्षा जास्तीचा भूकंप हा अतिशय धोकादायक असतो आणि यामुळे खूप नुकसान होण्याची शक्यता असते.

भूकंपाचे प्रतिबंधन :

आपण पूर्णता भूकंप थांबवू तर शकत नाही, आणि पृथ्वीच्या आतील थरावरील परिणाम रोखू शकत नाही. परंतु मानव निर्मित भुकंप थांबवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.

तसे आपण योग्य दिशेने प्रयत्न केले तर भूकंपाचे परिणाम कमी होऊ शकतात. भूकंप येण्यापूर्वी चेतावनी देणाऱ्या यंत्राचा वापर करून आपण होणारे नुकसान थांबवू शकतो.

निष्कर्ष :

भूकंप ही एक सर्वात विनाशकारी आणि धोकादायक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. जी नसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन कारणांमुळे उद्‍भवते.

भूकंप ज्या नैसर्गिक कारणांमुळे होतो ते रोखने आपल्याला शक्य नाही. परंतु काही उपाय- योजना करून आपण मानव निर्मिती भूकंप रोखु शकतो.

तर मित्रांनो ! ” निसर्गाचा प्रकोप- भूकंप निबंध मराठी ” वाचून तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” निसर्गाचा प्रकोप- भूकंप निबंध मराठी ” त्यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment