सूर्य मावळला नाही तर | Surya Mavala Nahi Tar Nibandh In Marathi

सूर्य मावळला नाही तर | Surya Mavala Nahi Tar Nibandh In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” सूर्य मावळला नाही तर…” या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

सूर्य मावळला नाही तर | Surya Mavala Nahi Tar Nibandh In Marathi

उन्हाळ्याचे दिवस नुकतेच चालू झाले होते. तोपर्यंतच पडणाऱ्या कडक उन्हाच्या उकाड्यामुळे जीव नकोसा झाला होता. घरा बाहेर किंवा आकाशातील सूर्याकडे नुकते पाहण्याचे सुद्धा धैर्य होत नव्हते.

अशा परिस्थितीत मनात एक प्रश्नाने जन्म घेतला. येवढे कडाक्याचे ऊन देणारा हा सूर्य आहे. मग हा ” सूर्य मावळला नाही तर… ”

आपल्या पृथ्वीवर सूर्य हा एकमेव नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. या ऊर्जेचा उपयोग आपण अनेक प्रकारे करून घेऊ शकतो. मानवजातीच्या अस्तित्वा साठी सूर्य मोठी भूमिका बजावते. मग अशा वेळेला हा ” सूर्य मावळला नाही तर… ? ”

जर हा सूर्य मावळला नाही, तर सूर्य उगवणार नाही. रात्री ही होणार नाही, ना दिवस होणार नाही. सगळीकडे फक्त प्रकाश पसरलेला दिसेल. त्यामुळे आपले नेहमीचे कालचक्र आणि निसर्ग चक्र थांबेल.

पहाटेचे रम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, थंड हावेच्या झुळुका अनुभवता येणार नाहीत. सूर्य मावळला नाही तर, रात्र होणार नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात चंद्र आणि तारे यांची मौज अनुभवता येणार नाही.

जेव्हा सूर्य मावळतो, त्या वेळेला सर्व पशु- पक्षी, गुरे- ढोरे आपापल्या घराच्या दिशेने जातात मग हा सूर्य मावळलाच नाही, तर पक्षी आपल्या घरट्यांकडे कसे परतणार ? गुरे- ढोरे आपापल्या घरी कसे जाणार ? संध्याकाळच्या वेळी कामावर गेलेली माणसे परत आपापल्या घरी कशी परत येणार ?

सूर्य मावळला नाही म्हणजे रात्र होणार नाही मग रात्र झाली नाही तर आपण झोपणार कसे. दिवसा झोपले तर पण ती झोप रात्री सारखी शांत आणि गाढ नसणार त्यामुळे झोप पूर्ण होणार नाही व आपल्या मध्ये चिडचिडपणा येणार तसेच सकाळ होणार नाही सकाळचे शुद्ध चैतन्यही प्राप्त होणार नाही.

दिवसभर सुरू असल्याने आणि सूर्य न मावळल्याने पृथ्वी वरील तापमान वाढेल, उष्णता वाढेल त्यामुळे झाडे झुडपे नष्ट होऊ लागतील. शेती उन्हाने करपेल त्यामुळे शेती करणे कठीण होईल. परिणामी मनुष्य आणि प्राण्यांना खाण्यासाठी अन्न उरणार नाही.

सूर्य मावळला नाही तर उष्णता वाढेल त्यामुळे नदी, नाले, तलाव यांमधील पाण्याची वाफ होईल व पिण्यासाठी पाणी सुद्धा राहणार नाही. सूर्य न मावळल्याने हिमनद्या आणि बर्फांचे डोंगर वितळतील ते पाणी मनुष्य वस्तीत शिरेल त्यामुळे महापूर येण्याची शक्यता आहे.

उष्णामुळे झाडे- झुडुपे वाळून जातील त्यामुळे झाडांचे प्रमाण कमी होऊन आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही.

तसेच सूर्य मावळला नाही तर अंधार होणारच नाही. मग विजेची आणि दिवे लावण्याची गरज भासणार नाही. मात्र सर्वांना हवीशी वाटणारी रात्र कधीच होणार नाही त्यामुळे दिव्यांच्या रोषणाईची मजा कशी येणार ? सर्वात जास्त हाल होणार ते म्हणजे घरातील गृहिणींचे कारण त्यांना घरातील सर्व मंडळींसाठी राबावे लागते. मग सूर्य न मावळल्याने 24 तास दिवसच राहील ज्यामुळे घरातील गृहिणींना विश्रांतीला वेळच मिळणार नाही.

सूर्य सतत तापत राहीला, तर उष्णतामान वाढत जाईल. थंडावा येणार नाही. सर्व वातावरण निराशतेचे होईल.

थोडक्यात सांगायचे म्हणजे सूर्य मावळला नाही तर पृथ्वीवरील संपूर्ण सृष्टी चक्र बिघडून जाईल. मनुष्य जीवन आज जसे सुरळीत आहे. त्याच पद्धतीने अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने जे जीवन चक्र चालू आहे ते योग्य आहे.

सूर्य जसा उगवतो तसा त्याला मवळावाच लागतो. त्यामुळे आपली सर्व कामे सुरळीत चालतात व आपले निसर्ग चक्र सुद्धा व्यवस्थित चालते. फक्त विचार आला की, सूर्य मावळला नाही तर… आपल्याला येवढ्या समस्यांना पार करावे लागेल व शेवटी सृष्टी नष्ट होईल.

परंतु आपल्याला चिंता करायची मुळीच आवश्यकता नाही कारण आपली पृथ्वी वरील सूर्य मावळणे आणि उगवणे हा क्रम कधीही चुकला नाही आणि पुढेही तो चुकणार नाही. या चक्राचे अस्तित्व हे मनुष्य जन्माच्या हजारो वर्ष आधी पासूनच होते आणि मनुष्य जीवन नष्ट होईपर्यंत हे असेच राहील.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment