आजचे चित्रपट निबंध मराठी । Aajche Chitrapat Essay In Marathi

आजचे चित्रपट निबंध मराठी । Aajche Chitrapat Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आजचे चित्रपट Marathi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आजचे चित्रपट निबंध मराठी । Aajche Chitrapat Essay In Marathi

आजच्या तरुण पिढीला क्रिकेट, मोबाईल, इंटरनेट आणि चित्रपट यांचे अतोनात वेड लागलेले बघायला मिळते. प्रत्येक जण आज कर्तव्य, आणि आपले ध्येय याचे भान न ठेवता चित्रपटाच्या प्रवाहामध्ये वाहत आहेत. आज आपल्याला विविध प्रकारचे चित्रपट पाहायला मिळतील.

1. वैविध्यपूर्ण चित्रपट :

आपल्याला आज अनेक चित्रपट प्रदर्शित होत असताना दिसत आहेत. काही चित्रपट हे समाज परिवर्तन करतात तर काही चित्रपटांमुळे समाज बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

चित्रपटांमध्ये हिंसा, भडक, शृंगार, दणदणाट संगीत, विविध गाणे, आलिशान घरे, महाग गाड्या, विविध प्रकारचे पोशाख आणि वेगवेगळ्या देशांतील दृश्य बघायला मिळतात आणि हेच कारण आहे, ज्यामुळे लोक आणि आपला समाज चित्रपटाकडे ओढला जात आहे.

या वैविध्यपूर्ण चित्रपटांमुळे लोकांना आजचे चित्रपट बघण्याची आवड निर्माण झाली.

मात्र, अलीकडे भारतीय चित्रपटांनी मोठी प्रगती केली आहे. एकापाठोपाठ एक असे उत्तम दर्जाचे चित्रपट आज प्रदर्शित होताना दिसत आहेत. आणि भारतीय चित्रपटांच्या प्रगती करण्यामागचे कारण म्हणजे या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होय.

2. दर्जेदार चित्रपट :

आजचे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात दर्जेदार ठरत आहेत. आणि यामुळेच प्रेक्षकांना चित्रपटांचे वेड लागत आहे. अलीकडे भारतात ” ब्लॉक “,  ” पिकु “,  ” लगान “,  ” तारे जमीन पे “,  ” एम. एस. धोनी “,  ” तानाजी “,  ” मणिकर्णिका ” यांसारख्या विविध सामाजिक परिस्थिती हाताळणाऱ्या आणि इतिहासाची माहिती करून देणार्‍या चित्रपटांमुळे चित्रपटांचा दर्जा वाढत आहे.

” हेराफेरी “,  ” हंगामा ” यांसारख्या निखळ मनोरंजनात्मक चित्रपटामुळेही भारतीय चित्रपट दर्जेदार बनत आहेत. पूर्वी मराठी भाषेत ग्रामीण तमाशा प्रधान किंवा सामान्य पातळीवरील एकाच छापाचे मनोरंजन वर चित्रपट निघत आसत.

पण आज मराठी चित्रपटांनी देखील उंच भरारी घेतली आहे. हिंदी चित्रपटांप्रमाणेच समाज जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट मराठीत सुद्धा येऊ लागले आहेत. अनेक वैविध्यपूर्ण विषय दर्जेदार चित्रपटांमधून हाताळले जात आहेत.

श्वास ‘,  ‘ वळू ‘,  ‘ देऊळ ‘,  ‘ मुंबई- पुणे- मुंबई ‘,  ‘ मितवा ‘,  ‘ क्लासमेट्स ‘,  ‘ दुनियादारी ‘,  ‘ चेकमेट ‘,  ‘ देऊळ बंद ‘,  ‘ व्हेंटिलेटर ‘ यांसारख्या मराठी चित्रपटांनी उत्तम दर्जा प्राप्त केला आहे. ” श्वास ” यांसारख्या मराठी चित्रपटांनी ” ऑस्कर ” पारितोषिकांच्या स्पर्धेत बाजी मारली आहे.

चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे साधन :

आजच्या पिढीने मनोरंजनाच्या साधनांमध्ये मोबाईल, इंटरनेट यांच्या सोबत चित्रपटांनाही मनोरंजनाच्या साधना मध्ये समाविष्ट केले आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपट ग्रहांमध्ये तो चित्रपट पाहण्यासाठी गर्दी बघायला मिळत आहे. वैविध्यपूर्ण चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचे परिणाम :

प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही चांगले- वाईट परिणाम असतात. त्याप्रमाणेच या चित्रपटांचे ही काही चांगले- वाईट परिणाम बघायला मिळतात.

चित्रपटांमधील आलिशान घर, गाड्या ते बघून तरुण पिढी गैर मार्गाने त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करते. चित्रपटांतून येणाऱ्या वागण्याची नक्कल आजची पिढी करत आहे. पोशाखातील वेगळेपणा तरुण वर्गाकडून चटकन उचलला जातो.

चित्रपटांमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांचे आकर्षण वाटल्यामुळे आजचे तरुण- तरुणी आपले घरदार सोडून चित्रपटात काम करण्याच्या उद्देशाने थेट पळून जातात आणि तेथेच त्यांची फसवणूक होते.

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्हेगाराचे समाजात अनेकदा नक्कल होताना दिसते. व त्यातून वाईट परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे चित्रपट जेवढे मनोरंजनासाठी योग्य आहेत त्याचे वाईट परिणाम सुद्धा आहेत.

चित्रपट निर्मितीत येणारा पैसा व त्यांचे परिणाम :

आज चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात भारत देश आग्रेसर आहे. दरवर्षी फक्त भारतात विविध भाषेतून शेकडो चित्रपट तयार होतात. आणि या चित्रपट निर्मिती मध्ये कोट्यावधी रुपये या उद्योगामध्ये गुंतलेले असतात. त्यामध्ये चित्रपटामुळे समाजाचे ही काही प्रमाणात फायदे होतात.

चित्रपटाच्या या क्षेत्रात दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे चित्रपट क्षेत्रा मध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment