झाडे बोलू लागली तर मराठी निबंध । Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हांला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” झाडे बोलू लागली तर “ या विषयावर मराठी निबंध घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
झाडे बोलू लागली तर मराठी निबंध । Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कडाक्याचे ऊन पडले होत. उन्हाच्या झळा सहन होत नव्हता. तेवढ्यात दादा म्हणाला छे बुवा ! खूपच गरम होत आहे. सावली साठी फारशी झाडेही दिसेनाशी झालेत.
त्यामुळे थंड वारा सुद्धा नाही. कोठे बरी गेली सगळी झाडे ? जेव्हा खूप उष्णता वाढते ; चटके- बसू लागतात, तेव्हा सर्वांना झाडांच्या सावलीची आठवण येते. पावसाचे प्रमाण कमी झाले की आपल्याला झाडांची आठवण येते.
तेव्हा मला कल्पना आली की, ” झाडे बोलू लागली तर ” ? जर ही झाडे बोलू लागली तर काय म्हणतील – झाडे बोलू लागली तर म्हणतील की, जेव्हा मनुष्याला झाडांची गरज भासते तेव्हाच ती आमचा शोध घ्यायला लागतात. पण स्वतःच्या गरजा पूर्ण करताना आम्हाला तोडले जाते, तेव्हा कोणी करतं का आमचा विचार ? मग आम्ही असे पटकन कसे काय तुमच्या साठी उपलब्ध होणार ?
तुम्ही मनुष्य आमची दरवर्षी लागवड करा. आमचे संगोपन करा, आमची काळजी घ्या. मग बघा काही वर्षातच आम्ही झाली तुमची सेवा करायला उभे राहू. आमच्या अंगा- खांद्यावर अनेक पक्षी, कीटक आनंदाने राहतात.
आमची फळे, फुले, कोवळी पाने खाण्यासाठी अनेक शाकाहारी प्राणी आमच्या कडे धाव घेतात. अनेक माणसे आमच्या सावलीत बसून गप्पा- गोष्टी करतात. आमचे कौतुक करतात ते पाहून आम्हा झाडांना आनंद वाटतो.
आम्ही आमची फळे, फुले तुम्हाला देतो. आमच्या पैकी काही झाडे औषधी गुणधर्म असलेली आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही मोठ- मोठ्या आजारांवर मात करण्यासाठी सक्षम झालात. आम्ही झाडे या पृथ्वी वर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
सर्व सजीवांना जगण्यासाठी लागणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन आमच्या मुळे तुम्हाला मिळतो. तसेच पाऊस सुद्धा आमच्या मुळेच पडतो. या सृष्टीवर असलेली हिरवळ आणि सुंदर निसर्ग आम्हा झाडांमुळेच अस्तित्वात आहे. आम्ही वातावरण शुद्ध आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.
आमच्या मुळा जेव्हा जमिनीत जातात तेव्हा आम्ही माती घट्ट धरून ओलावा ठेवतो. त्यामुळे जमिनीची धूप थांबते. आमचे प्रमाण जास्त करुन म्हणजेच तुम्ही मनुष्यांनी आमची लागवड करून आमचे संगोपन केले तर आज सर्वात मोठी असलेली समस्या प्रदूषण याला ही कमी करण्यासाठी आम्ही तुमची मदत करू.
पण आज वाढते शहरी करण, उद्योगधंदे यांमुळे आमची बेसुमार तोड करत आहेत आमची जंगले च्या जंगले नष्ट करून त्या जागी मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे आमची संख्या कमी होऊन. प्रदूषण, अल्प पाऊस, बदलत चालेले निसर्ग चक्र अशा समस्यांना तोंड द्यायची वेळ तुमच्यावर आली आहे.
आमची कत्तल करण्या अगोदर आमच्या पासून मिळणाऱ्या गोष्टींचा तर विचार करायला हवा ना ? आम्ही तुम्हाला सर्व काही पुरवितो, त्या बदल्यात तुमच्या कडून आम्हाला कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नाही.
या पृथ्वीवर जोपर्यंत आम्हा झाडांचे अस्तित्व असणार तोपर्यंत तुम्ही सुखी जीवन जगू शकणार ज्या दिवशी आमचे अस्तित्व नष्ट होईल. त्या दिवशी येथे असणाऱ्या सजीवांचेही अस्तित्व नष्ट होईल. त्यामुळे ” तुम्हाला सुखाने जगायचे असेल, तर आम्हाला वाचवा ! ” तुमचे आणि आमचे मैत्रीचे हे नाते अनेक वर्षे असेच सुरळीत राहो हीच इच्छा !
तर मित्रांनो ! ” झाडे बोलू लागली तर मराठी निबंध । Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
” झाडे बोलू लागली तर मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी
- जर वीज नसती तर मराठी निबंध
- ममते शिवाय समता नाही मराठी निबंध
- सर्व धर्म समभाव मराठी निबंध
- माझा आवडता शास्त्रज्ञ मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !
Good