यावल अभयारण्य ची माहिती | Information About Yawal Wildlife Sanctuary

यावल अभयारण्य ची माहिती | Information About Yawal Wildlife Sanctuary

यावल अभयारण्य ची माहिती | Information About Yawal Wildlife Sanctuary : सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले हे यावल अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्यांपैकी एक आहे.

आज आपण याच यावल अभयारण्य ची माहिती ( Yawal Wildlife Sanctuary ) सविस्तर बघणार आहोत.

चला तर मग बघुया ” यावल अभयारण्य ची माहिती ( Yawal Wildlife Sanctuary )“.

यावल अभयारण्य ची माहिती | Information About Yawal Wildlife Sanctuary

महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात वसलेले एक अभयारण्य म्हणजे हेच यावल अभयारण्य होय. हे अभयारण्य सातपुडा पर्वत रांगांमध्ये स्थित आहे. व या यावल अभयारण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 177.52 चौरस किलो मीटरवर आहे.

या अभयारण्याच्या आसपासच्या परिसरात सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या वाहत असल्याने यावल अभयारण्याचे क्षेत्र हे हिरवेगार आणि जैवविविधतेने नटलेले आहे.

विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी, पक्षी यामुळे हे अभयारण्य संपन्न बनले आहे. महाराष्ट्र शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी यावल ह्या अभयारण्याची स्थापना केली.

यावल अभयारण्याचा परिसर हा पाल आणि यावल ह्या दोन खेड्यांमध्ये येतो. या यावल अभयारण्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारे 400 मीटर येवढी आहे. यावल अभयारण्याला पाल अभयारण्य म्हणून सुद्धा ओळखले जाते.

  • यावल अभयारण्यातील वनसंपदा :

यावल हे अभयारण्य वनस्पतींनी समृद्ध असल्याने येथे विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. यावल या अभयारण्यात मौल्यवान वृक्षांच्या प्रजाती बरोबरच असंख्य औषधी वनस्पती येथे आढळतात.

दुर्मिळ प्रकारच्या वनस्पतींमध्ये लुईझिया ट्रिस्टीस, कारुण्यपुष्प आमरी, यांसारख्या दुर्मिळ वनस्पती या यावल अभयारण्यात बघायला मिळतात. त्याबरोबरच यावल अभयारण्यात साग, ऐन, अंजन, धावडा, साळई, हळद, खैल ही झाडे प्रामुख्याने येथे बघायला मिळतात.

  • यावल अभयारण्यातील प्राणी जीवन :

घनदाट जंगल आणि विविध प्रकारची झाडे यामुळे यावल अभयारण्यात प्राणीजीवन मोठ्या प्रमाणात आढळते.

यावल अभयारण्यात, बिबट्या, कोल्हे, रान मांजर, रानकुत्रे, नीलगाय, उत्तरी माकड, बानर, सांबर, तरस, वाघ, हरिण, भेकर, यांसारखी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यातला त्यात कोल्हा हा प्राणी येथे मोठ्या संख्येने बघायला मिळतो.

  • कोल्हा :

भारतामध्ये सर्व साधारणता सर्वत्रच आढळणारा हा सर्वांच्या परिचयाचा प्राणी म्हणजे कोल्हा. कोल्हा हा प्राणी यावल अभयारण्यामध्ये आढळतोच त्याप्रमाणे महाराष्ट्रातील विविध अभयारण्यात सुद्धा बघायला मिळतो.

कोल्हा हा प्राणी चातुर समजला जातो. कोल्हाची लांबी ही 60 ते 70 सेंटिमीटर असते. कोल्ह्याला लांब शेपूट असते व शेपटाची लांबी 20 ते 28 से.मी. असते.

कोल्ह्याचे वजन हे 8 ते 12 किलो पर्यंत भरते. दमट हवामान, दाट जंगल अश्या ठिकाणी कोल्हा हामखास दिसतो. कोल्हाचे खाद्य हे मुख्यता मांस असते. तो हरीण, कोंबड्या, बदक, होला अश्या प्राण्यांना पक्ष्यांना शिकार करून आपले पोट भरतो. कोल्हा हा प्राणी वर्षभरात केव्हाही पिल्ले देतात. कोल्हाचे आयुष्यकाळ हा साधारणता 12 वर्षाचा असतो.

  • पर्यटन :

यावल या अभयारण्यातून सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या वाहत असल्याने या अभयारण्याचा परिसर हा निसर्गमयी आहे. आणि या नद्यांमुळे या अभयारण्याला जिवंतपणा मिळाला आहे.

विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी निरीक्षणासाठी येथे निसर्ग प्रेमी आणि पक्षी प्रेमी अभयारण्यात पर्यटनासाठी येतात.

येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटन निवासाची सोय असल्याने येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई अशा ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक या यावल अभयारण्याला भेट देण्यासाठी येतात.

तसेच यावल अभयारण्यात दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती आढळतात. त्यामुळे हे अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र होत आहे.

  • यावल अभयारण्यात कसे जावे :

जळगाव जिल्ह्यामधील यावल आणि पाल या दोन अभयारण्याच्या परिसरात आढळणारे यावल हे अभयारण्य आपल्याला बघायला मिळते. यावल आणि पाल या दोन गावांमध्ये 20 किलो मीटरचे अंतर आहे.

या अभयारण्याला जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था उपलब्ध आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment