वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay in Marathi

वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay in Marathi

मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात.

निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्य जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे.

झाडे आहेत मग आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

पक्षीही सुस्वरे । आळविती ।।

येणे सुख रुचे एकांताचा वास ।

नाही गुणदोष । अंगी येत ।। “

झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात‌.

आपण जर बारकाईने लक्ष दिले असता आपल्याला लक्षात येईल की, मनुष्याचे आयुष्य पृथ्वीवर टिकूनकोणवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाचे भूमिका बजावतात.

सर्वच मनुष्याला सतत निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. साधे आपण कुठेतरी फिरायला जायचा विचार केला असताना आपण निसर्गरम्य ठिकाण निवडतो. यामागचे कारण म्हणजे आपल्याला आजूबाजूचा हिरवागार आणि मनाला मोहित करणाऱा व आपल्या दृष्टीला शांत करणारा निसर्ग पाहायला खूप आवडतो.

आपल्यातील कोणी विचार करतो का हे वृक्ष नसते तर?

जर हे वृक्ष नसते तर, आपले जीवनच इतके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्याने आपल्या आजूबाजूच्या वन क्षेत्र कमी होत चालले आहे.

त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्र ही बदलत चालले आहे.

त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला  आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर  “वृक्ष रोपण” करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वृक्षारोपण काळाची गरज :

वृक्षरोपण काढण्याचे भरपूर फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे.

वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत.  आपल्या अवतीभोवती असणारी हि झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच च देता इतर अनेक गोष्टीही देतात.. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते थोडक्यात एक प्रकारचा निवाराच मिळतो.

वृक्ष एक प्रकारे आपले मित्रच आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वाह वृक्षांपासून पूर्ण होतो. म्हणजेच काही लोक झाडांची फळे विकून पैसे कमावतात व आपला उदरनिर्वाह करतात.

तसेच आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते.

त्याचप्रमाणे वृक्ष  हे पाऊस पडण्याचे महत्त्वाचे आणि सर्वात गरजेची भूमिका करतात. मातीची होणारी धूप सुद्धा वृक्षांमुळे वाचवली जाते. वृक्षांमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होते. आणि प्राणी जंगलामध्ये राहतात व आपले जीवन संरक्षण करतात. पऱ्यांच्या अलिकडे होणाऱ्या जंगलतोडीमुळे या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

इतकेच नव्हे तर अलीकडे प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या संपूर्ण जगासमोर उभे राहिले आहे. इंधनाच्या ज्वलनामुळे,  विविध उद्योगधंद्याच्या स्थापना करण्यासाठी, वृक्षतोड केली जात आहे.

त्यामुळे जागतिक तापमान यामध्ये वाढ होऊन अलीकडे तापमान वाढले आहेत. यामुळे आणि पक्षी आणि प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. वातावरणात येणारे हे बदल आपले सजीवांचे जीवन अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य  पावले उचलणे गरजेचे आहे. ती म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे होय. अलीकडच्या काळामध्ये वृक्षारोपण करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे. अनेक कार्यक्रम, लेखन कविता यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे हे सांगणे महत्त्वाचे आहे.

आज शाळा,महाविद्यालय यांच्या माध्यमातून लोकांमध्ये वृक्षारोपणाची गरज का भासली आहे, हे सांगितले जात आहे.

तरीसुद्धा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये वृक्षतोड केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. शहरीकरण, वाढत्या कंपन्या ह्या गोष्टी वृक्षतोड करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

जर ही वृक्षतोड अशीच चालत राहिली तर एक दिवस संपूर्ण झाडे नष्ट होऊन आपण ऑक्सिजन विना  मरू! त्यामुळे निसर्गचक्र नीट आणि सुव्यवस्थित चालवायचे असेल तर  वृक्षतोड थांबवून, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. आपल्याला शक्य होतील तेवढ्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे.

वृक्षरोपणाचे अनेक छान प्रकल्प अलीकडे राबवले जातात. या प्रकल्पांमध्ये आपण सहभागी होऊन वृक्षरोपण केले पाहिजे. शाळा, महाविद्यालय मुलांना वृक्षांचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे जेणेकरून हे विद्यार्थी सुद्धा वृक्षतोड न करता वृक्षरोपण करतील.

यासाठी आपण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी एखादे झाड लावून निसर्गाचे आणि त्या ठिकाणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी भर घालू शकतो.

” जागतिक पर्यावरणाच्या दिवशी “ वृक्षारोपण करून वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत केली पाहिजे. वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे.

जेणेकरून जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल. वृक्षारोपण हे आपल्या काळाची गरज आहे त्यामुळे वृक्षाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने वृक्षारोपण करणे हे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । vriksharopan kalachi garaj essay in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” वृक्षारोपण मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

3 thoughts on “वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध । Vriksharopan Kalachi Garaj Essay in Marathi”

Leave a Comment