विशाळगड किल्ला माहिती मराठी । Vishalgad Fort Information In Marathi

विशाळगड किल्ला माहिती मराठी । Vishalgad Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक असलेला हा विशाळगड किल्ला.

कोल्हापूरच्या वायव्य दिशेस सुमारे 76 किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या सह्याद्री डोंगररांगा आणि कोकण घाट तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर हा विशाळगड किल्ला वसलेला आहे.

आज आपण याच विशाळगड किल्ला माहिती मराठी मध्ये सविस्तर मध्ये बघणार आहोत.

विशाळगड किल्ला माहिती मराठी । Vishalgad Fort Information In Marathi

चला तर मग बघुया ” विशाळगड किल्ला माहिती “.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. विशाळगड हा किल्ला नावाप्रमाणेच विशाल आहे.

असे म्हणतात की, विशाळगड किल्ला हा अनुस्कुरा घाट व आंबा घाट या कोकणातील बंदरे आणि कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्‍या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. विशाळगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे खेळणा किल्ला असे होतो.

  • विशाळगड किल्ल्याचा इतिहास :

विशाळगड किल्ला हा आकाराने विशाल, मजबूत आणि बुलंद आहे. ह्या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारे 1130 मीटर येवढी आहे. विशाळगड हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो.

विशाळगड या किल्ल्याची बांधणी ही इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. पुढे इ.स. 1453 मध्ये बहामनी राज्याचा एक सुभेदार हा विशाळगडाचा परिसर आणि विशाळगडावर कब्जा करण्यासाठी आला होता.

या सुभेदार चे नाव मालिक उत्तुजार असे होते. या मालिक उत्तुजार ने पन्हाळगड किल्ल्यावरील शिर्क्यांना मात केले. त्यावेळी या शिर्क्यांनी मलिक उत्तुजार याला विशाळगड किल्ल्याचे आमिष दाखवले. व पुढे मालिक उत्तुजार याने शिर्के यांच्या सोबत मिळून विशाळगड किल्ल्यावर आक्रमण केले.

त्यावेळी विशाळगड वर उपस्थित असलेल्या शंकरराव मोरे यांनी मालिक उत्तुजार यांच्यावर हल्ला चढविला. या लढाईत मालिक उत्तुजारचा पराभव झाला.

पुढे इ.स. 1659 च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड किल्ला जिंकला. व विशाळगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव खेळणा किल्ला असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाव बदलून विशाळगड असे नाव दिले.

विशाळगड किल्ला हा मराठ्यांच्या इतिहासाच्या पराक्रमाचा एक साक्षीदार आहे. आदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहर यांनी टाकलेला पन्हाळ गडाच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतल्यामुळे या किल्ल्याचे नाव आजपर्यंत अजरामर आहे.

  • विशाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक निर्देश :

विशाळगड किल्ल्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात आणि मराठा साम्राज्यात विशेष महत्त्व आहे. गजापूर या गावापासून सुमारे चार किलो मीटरच्या अंतरावर एक इतिहास प्रसिद्ध पावनखिंड आहे. याच पावनखिंडीत नववीर बाजीप्रभू देशपांडे यांनी फक्त 300 मावळ्यांच्या साह्याने पराक्रम मिळविला होता.

सिद्धी जौहरच्या सैन्याला बाजी प्रभू देशपांडे यांनी मोठ्या धीराने आणि शौर्याने थोपवून धरले होते. तोफांचा आवाज कानी पडताच वीर बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. व त्यांच्या वीर मरणा नंतर त्यांच्या देहाचे विशाळगड वर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या देहाचा अंत्य संस्कार केला.

इ.स. 1869 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी मराठ्यांची कोंडी झाली परिणामी त्या वेळेस मराठ्यांनी विशाळगड किल्ला सोडला. कोल्हापूरकर स्त्रपतींनी हा विशाळगड किल्ला पंतप्रतिनिधींना दिला.

  • विशाळगड किल्ल्यावरील पाहाण्यासारखी ठिकाणे :

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या किल्ल्यांपैकी एक असलेला हा विशाळगड किल्ला आहे. विशाळगड किल्ल्याकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवर एक लोखंडी पूल लागतो. हा लोखंडी पूल ओलांडल्या नंतर पायऱ्यांची चढण चालू होते.

पायऱ्या चढत असताना आपल्याला एक ढासळलेला बुरुज दिसतो. साधारणता 30 मिनिटे चालत गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. विशाळगड किल्ल्यावर ” हजरत मलिक रिहान ” यांचे दर्गा आहे. या दर्गा वर दरवर्षी हजारो भाविक येतात. विशाळगडा वर बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे.

तसेच विशाळगड किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची स्मारक आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो नागरिक विशाळगड किल्ल्याला भेट देत असतात.

  • विशाळगड किल्ल्यावर कसे जावे :

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. हा प्रवास आपण बस च्या साह्याने किंवा खाजगी वाहनाने जाऊ शकतो.

तसेच कोल्हापूर मधून कर्नाटक परिवहन मंडळाच्या चार बसेस विशाळगडा पर्यंत जातात.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment