वासोटा किल्ल्याची माहिती । Vasota Fort Information In Marathi
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक इतिहास प्रसिद्ध वनदुर्ग म्हणजेच हा वासोटा किल्ला.
आज आपण याच वासोटा किल्ल्याची माहिती बघणार आहोत.
वासोटा किल्ल्याची माहिती । Vasota Fort Information In Marathi
Table of Contents
चला तर मग बघुया काय आहे वासोटा किल्ल्याची माहिती.
वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. निसर्गाच्या खाणीमध्ये वसलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्ग रत्न आहे. दुर्गयात्रींचा आवडता किल्ला म्हणजे हाच वासोटा किल्ला होय.
-
वासोटा किल्ल्याची रचना :
सातारा जिल्ह्या पासून पश्चिम दिशेला सुमारे 40 किलो मीटरच्या अंतरावरील जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगला मध्ये हा किल्ला उभारला आहे.
समुद्र सपाटी पासूनची उंची ही साधारणता 1,172 मीटर येवढी आहे. घनदाट डोंगरावर असलेला हा किल्ला वनदुर्ग प्रकारच्या किल्ल्यां मध्ये येतो. या किल्ल्याची चढाई ही अवघड आहे. उंचावर असल्याने ह्या वासोटा किल्ल्याची सध्याची परिस्थिती बर्यापैकी चांगली बघायला मिळते.
सह्याद्री पर्वताच्या मुख्य रांगेवर असलेला हा वासोटा किल्ला आणि शिवसागर जलाशयाचे पाणी लाभल्याने या किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात घनदाट आरण्य आहे.
पश्चिम दिशेला कोकणातील कोसळणारे बेलाग कडे आणि पूर्व दिशेला घनदाट आरण्य असल्याने वासोटा किल्ल्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
-
वासोटा किल्ल्याचा इतिहास :
उंच डोंगर रांगावर असलेला हा वासोटा किल्ला आहे. ह्या किल्ल्याला वासोटा नाव देण्यामागे ही काही इतिहास कालीन कथा आहेत.
अशी आख्यायिका आहे की, वासोटा किल्ला ज्या डोंगरावर स्थित आहे तेथे ” वसिष्ठ ” ऋषींचा एक शिष्य राहत होता. म्हणून त्या शिष्याने या किल्ल्याला आपल्या गुरूंचे नाव दिले असावे. व पुढे चालून वसिष्ठ चे वासोटा हे नाव झाले.
जांभ्या रंगाच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला शिलाहकालीन राज्यांनी म्हणजेच शिलाहार वंशीय दुसऱ्या भोज राजाने या वासोटा किल्ल्याची बांधणी केली असा उल्लेख आढळतो.
शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचे नाव बदलून व्याघ्रगड असे ठेवले. महाराजांच्या काळात वासोटा किल्ल्याचा वापर ” तुरुंग ” म्हणून करण्यात आला होता त्यामागचे कारण म्हणजे येथे असणारा घनदाट जंगलाचा परिसर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी जिंकली तेव्हा त्याच्या आसपासचे अनेक किल्ले सुद्धा जिंकले होते. परंतु वासोटा किल्ला थोडा दूर असल्याने तेव्हा तो किल्ला जिंकता आला नाही. परंतु 6 जून 1660 रोजी शिवाजी महाराजांनी मावळे पाठवून हा किल्ला जिंकून घेतला.
अफझलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी नावाच्या सरदाराने राजापुरा वर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफजलखाना बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केले व वासोटा किल्ल्यावर तुरुंगात ठेवले.
सन 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते.
पुढे 1706 च्या सुमारास वासोटा किल्ला ताई तेलिणी यांच्या ताब्यात गेला. व पुढे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले आणि ताई तेलिणी यांच्यामध्ये लढाई झाली या लढाईत ताई तेलिणीचा पराभव होऊन हा वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या ताब्यात गेला.
-
वासोटा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
वासोटा किल्ला घनदाट जंगलात असल्याने या किल्ल्यावर बरीच ठिकाणे बघण्यासारखी आहेत. वासोटा किल्ल्याच्या प्रवेश द्वारा जवळून डावी कडच्या बाजूस गेल्यावर तटबंदी लागते. आणि या तटबंदी वरुन पुढे गेल्यास शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा परिसर आपले मंत्रमुग्ध करतो.
याच बाजूला पाण्याचे टाके आहेत. हे टाके मध्ये असलेल्या भिंतीमुळे दोन भागात विभागले आहेत. वाटेवर मारुती मंदिर आहे. तसेच मोठ्या
वाड्याचे अवशेष तसेच महादेवाचे मंदिर आहे. किल्ल्या वरून नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते.
वासोटा हा किल्ला गिरीदुर्ग बरोबरच वनदुर्ग सुद्धा आहे. म्हणून या किल्ल्याला मिश्रदुर्ग असे म्हणतात.
-
वासोटा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :
वासोटा किल्ल्याला जाण्यासाठी मुख्य दोन मार्ग आहेत. एक कोकण मधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन.
कोकणा मधून जाण्यासाठी चिपळूण कडून वासोट्याला जाण्यासाठी चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून राज्य परिवहन मंडळाच्या बस गाड्या आहेत.
* ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- लिंगाणा किल्ल्याची माहिती
- काटेपूर्णा अभयारण्य माहिती
- रोहिडा किल्ला माहिती मराठी
- मायणी अभयारण्य माहिती
- विशाळगड किल्ला माहिती मराठी