ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम निबंध मराठी । The Effects of Global Warming Essay Marathi

ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम निबंध मराठी । The Effects of Global Warming Essay Marathi

आपल्या पृथ्वीवर अनेक समस्या बघायला मिळत आहेत. त्यातील सर्वात मोठ्या समस्या म्हणजे प्रदूषण आणि दुसरी म्हणजे ” ग्लोबल वार्मिंग” ( Global Warming).

ग्लोबल वार्मिंग म्हणजे पृथ्वीवरील तापमानात होणारी सातत्याने वाढ. आज पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिवसें दिवस तापमान वाढत आहे. आणि आजच्या निबंधा मध्ये आपण हाच विषय सर्वांसमोर घेऊन येत आहोत तो म्हणजेच ” ग्लोबल वार्मिंग”.

ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम निबंध मराठी । The Effects of Global Warming Essay Marathi

ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय ? 

” ग्लोबल वार्मिंग” म्हणजे पृथ्वीच्या वातावरणीय तापमान अचंबितपणे होणारी वाढ. प्रदूषण हा ग्लोबल वॉर्मिंग वाढविण्या मागील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

जेव्हा पृथ्वीवरील सरासरी तापमान मर्यादीत पातळीपेक्षा जास्त वाढते तेव्हा ग्लोबल वार्मिंग ही समस्या उद्भवते. आणि याचा मुख्य परिणाम होतो म्हणजेच ग्रीनहाऊस वर आणि याला ” ग्रीनहाऊस” इफेक्ट म्हणून ओळखले जाते. पाण्याची वाफ, मिथेन आणि नायट्रोस ऑक्साईड हे काही प्रमुख ग्रीनहाउस वायू आहेत.

ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय ?

जेव्हा आपण जीवाश्म इंधने वातावरणामध्ये प्रज्वलित करतो म्हणजे जाळतो. तेव्हा कार्बन डायऑक्साईड, मिथेन या सारखे वायू वातावरणात पसरतात.

ज्यामुळे सूर्या पासून येणारे घातक किरणे आणि अति उष्णता यांपासून आपले बचाव करणारे काही तर विरघळतात याला ” ग्रीनहाऊस इफेक्ट” असे म्हणतात. व परिणामी ग्रीनहाऊस च्या इफेक्ट मुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते आणि या तापमान वाढीला ग्लोबल वार्मिंग असे म्हटले जाते. अशा प्रकारे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते.

आणि पृथ्वीवरील हवामान आणि जैवविविधतेतील बर्‍याचश्या बदलांना ग्लोबल वार्मिंग कारणीभूत ठरते. ग्लोबल वार्मिंग चे परिणाम जगातील अंटार्टिका खंडाचा स्पष्टपणे दिसत आहेत. आपल्या आजूबाजूला ग्लोबल वार्मिंग मुळे अत्यंत दुष्काळाच्या घटना घडताना आपण बघत असतो.

वातावरणातील ऋतुचक्र बदलत चाले आहे. ज्या प्रदेशात पावसाची गरज भासते तेथे पाऊस न पडता अन्य भागात पडत आहे. अति उष्णतेमुळे हिमनद्या वितळत आहे.

त्यामुळे समुद्राची पातळीत वाढ होऊन परिणामी पूर येतो. तसेच वाढत्या ग्लोबल वार्मिंग मुळे जंगल प्रजातींवर परिणाम होत आहे. अतिरिक्त ग्लोबल वार्मिंग मुळे जंगलात लागणारी आग यामुळे जंगले नष्ट होऊन अनेक पक्षी आणि प्राणी नष्ट होत आहेत.

समुद्रातील जलचर प्राण्यांचे प्रमाण कमी होण्या मागे ग्लोबल वार्मिंग एकमेव कारण आहे. तापमानात होणाऱ्या बदलांसाठी कोरल रीफ्स अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असतात. पण अलीकडे वाढत्या तापमाना मुळे रीफ्सी संख्या कमी होत आहे.

ग्लोबल वार्मिंग चे कारणे :

आज आपल्या सर्वांच्या जीवनासाठी ग्लोबल वॉर्मिंग हे खूप मोठी समस्या बनली आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आणि हे ग्लोबल वार्मिंग वाढवण्याची काही मुख्य कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे,

जंगल तोड :

ग्लोबल वार्मिंग वाढवण्यासाठी जंगलतोड ही एक मुख्य कारण बनत आहे. झाडे ही नैसर्गिकरित्या हवा स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. झाडांमध्ये co2 गॅस शोषून घेण्याची क्षमता असते.

झाडे आपल्याला ऑक्सिजन पुरवितात व वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेऊन वातावरण शुद्ध करतात. पृथ्वीवरील मानव प्राणी आणि सर्व सजीवांसाठी ऑक्सिजनची किती गरज आहे ही सांगण्याची आवश्यकता नाही.

पण आज औद्योगीकरणासाठी, शहरी करण्यासाठी आणि व्यवसायासाठी जंगले तोडली जात आहेत. त्यामुळे वातावरणात co2 गॅसचे प्रमाण वाढून ग्लोबल वार्मिंग चे प्रमाण वाढत आहे.

आपण जेवढे जास्त जंगले तोडून तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात वातावरणात co2 गॅस पसरेल व हा गॅस ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

जीवाश्म इंधन जाळणे :

जेव्हा आपण वातावरणामध्ये जीवाश्म इंधन जाळतो तेव्हा ग्लोबल वार्मिंग चे प्रमाण वाढले जाते. मनुष्याने केलेल्या ग्रीनहाऊस वायूंचे उत्पादन विविध जीवाश्म इंधनांच्या निर्मिती व वापरासाठी केला जातो परिणामी ग्लोबल वार्मिंग होते.

वाहनामध्ये वापरले जाणारे इंधन म्हणजे पेट्रोल जळून जेव्हा वातावरणात धूर फेकला जातो तेव्हा त्यातून सी co2 गॅस बाहेर सोडला जातो. अनेक वाहने, व वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोसळ वापरला जाते. व त्यामधून co2 वायू वातावरणात पसरतो व त्याचा परिणाम ग्लोबल वार्मिंग अशा समस्यांद्वारे उद्भवतो.

प्रदूषण :

ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रदूषण आहे. वातावरणामध्ये होणारे वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग वर होत आहे.

वायु प्रदूषण आतून निघणारे घातक वायू तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. आपण घरातून अथवा आपल्या परिसरातून निघणारा कचरा उघड्यावर जाळतो त्यातून निघणारा धूरातून ग्लोबल वार्मिंगच्या समस्यांमध्ये रुपांतर होत आहे.

घातक खते आणि रासायने :

कृषी क्षेत्र सुद्धा जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. आज कृषी उद्योग रासायनिक खते आणि जंतुनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यातील बहुतेक विघटना नंतर हानिकारक हरितग्रह वायू करतात.

रासायनिक खते आणि जंतुनाशके ग्रीन हाउस वायूंच्या पैकी NO2 हा वायू ( नायट्रस ऑक्साईड ) तयार करतात परिणामी ग्लोबल वार्मिंग वाढते. तसेच आपल्या सभोवती गाई, म्हशी आणि इतर जनावरे ( CH4 ) मिथेन वायू तयार करतात व त्यामुळे ही ग्लोबल वार्मिंग वाढते.

ग्लोबल वार्मिंग चे परिणाम :

आज आपल्या पृथ्वीवर ग्लोबल वार्मिंग चे महान संकट असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टी व पर्यावरणावर होत आहे. त्यातील काही परिणाम पुढील प्रमाणे आहेत.

तापमान वाढ :

ग्लोबल वार्मिंग मुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत आहेत. संपूर्ण विसाव्या शतकात सर्वाधिक तापमान वाढ नोंदली गेली आहे. या तापमानाचे प्रमाण संपूर्ण जगात कमी- अधिक प्रमाणात आढळते. व या तापमान वाढीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. आणि अचानक जंगलांमध्ये लागणाऱ्या आग यांमागे अति उष्ण तापमान हेच कारण आहे.

हिमनग घट :

ग्लोबल वार्मिंग मुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अति उष्ण तापमानामुळे हिमनग ( बर्फाचे डोंगर ) हळूहळू वितळत आहे. अमेरिका आणि अशिया खंडात गेल्या 50 वर्षेत या हिमनग घटीमध्ये वाढ झाली आहे. उत्तर गोलार्धातील प्रदेशातील बर्फ वितळण्यामध्ये 10 टक्के वाढ झाले आहे. या ग्लोबल वॉर्निंग मुळे जगभरातील सर्व हिमनग वितळत आहेत.

समुद्र पातळीत वाढ :

अति उष्णते मुळे बर्फाचे डोंगर वितळत आहेत व ते पाणी समुद्राला जात आहे. परिणामी समुद्र पातळी वाढत आहे. गेल्या काही वर्षा पासून असे लक्षात आले की, समुद्रातील पातळी सुमारे 8 इंच ने वाढली आहे. अंटार्टिका मध्ये मोठ्या प्रमाणात हिमनद्या वितळत आहेत.

महासागर अम्लीकरण :

ग्रीनहाऊस इफेक्ट मुळे वातावरणात वाढणारे कार्बन-डाय-ऑक्‍साईड ( co2 ) च्या पातळीमध्ये वाढ होत आहे. co2 गॅस हा समुद्राच्या पाण्यात विरघळतो व समुद्राच्या पाण्यात अम्लात येते. आणि या अम्लाता मध्ये जलचर प्राणी जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे समुद्रातील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत.

ग्लोबल वार्मिंग थांबवण्यासाठी काय करावे :

मुख्यता ग्लोबल वार्मिंग वाढण्यामागे प्रदूषण हे महत्त्वाचे कारण आहे. मग आपण प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करू. ग्रीनहाऊस वायू ज्या पदार्थां मधून बाहेर पडतात ते पदार्थ आपण उघड्यावर न जाळता त्यांचा वापर कमी प्रमाणात करावा. असे केल्यास ग्लोबल वार्मिंग कमी होण्यामध्ये मदत होईल.

तसेच वृक्षतोड ही सुद्धा ग्लोबल वार्मिंग वाढविण्यास कारणीभूत आहे. म्हणून आपण वृक्षतोड कमी करून ग्लोबल वार्मिंग थांबवण्यासाठी हातभार लावावा.

कारखाने आणि औद्योगिकरणा मधून निघणाऱ्या घातक वायूं मुळे ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. मग हे थांबविणे आपले कर्तव्य आहे. रासायनिक खते आणि जंतु नाशकामुळे घातक वायू बाहेर पडतात मग आपण या रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खते वापरावी.

वाहनांमध्ये वापरणारे पेट्रोल-डिझेल आणि वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये वापरणारा कोळसा ह्या जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा. जीवाश्म इंधनामधून घातक co2 सारखे वायू बाहेर पडतात व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढते म्हणून या जीवाश्म इंधनांचा वापर गरजेपुरता व मर्यादितच करावा.

निष्कर्ष :

ग्लोबल वार्मिंग ही मुख्यतः मानवी कार्यामुळे वाढत आहे. औद्योगीकरण आणि वाहतूक ही कारणे ग्लोबल वार्मिंग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ग्रीनहाउस वायूंचे उत्पादन कमी करणे आहे. जीवाश्म इंधना ऐवजी इतर इंधन स्त्रोत्र वापरणे फायदेशीर ठरेल.

ग्लोबल वार्मिंग कमी करण्याची जबाबदारी ही मानवावर आहे. ही समस्या एक जागतिक समस्या झाली आहे. म्हणून ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी जागतिक समुदायाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहेत.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment