तानसा अभयारण्य माहिती । Tansa Wildlife Sanctuary Information In Marathi

तानसा अभयारण्य माहिती । Tansa Wildlife Sanctuary Information In Marathi

महाराष्ट्रातील उत्तम जलाशयाच्या क्षेत्रात वसलेले हे तानसा अभयारण्य आहे.

या तानसा अभयारण्याच्या जलाशय क्षेत्रातून मुंबई सारख्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा केला जातो.

आज आपण या तानसा अभयारण्य माहिती बघणार आहोत.

तानसा अभयारण्य माहिती । Tansa Wildlife Sanctuary Information In Marathi

चला तर मग बघुया ” तानसा अभयारण्य माहिती “ मराठी मध्ये सविस्तर मध्ये बघूया.

ठाणे जिल्ह्या पासून सुमारे 320 किलो मीटरच्या विस्तीर्ण परिसरात तानसा हे अभयारण्य स्थिर आहे. शहापूर, वैतरणा आणि खर्डी या तालुक्‍यांच्या परिसरातील हिरव्यागार झाडींसोबतच तानसा ह्या तळ्याच्या जलाशयम परिसरात तानसा अभयारण्य आहे.

तानसा अभयारण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 304.81 चौरस किलो मीटर येवढे मोठे आहे. जैवविविधतेने नटलेल्या या तानसा अभयारण्याची स्थापना 1970 साली झाली.

विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यामुळे तानसा हे अभ्यारण्य पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. ह्या अभयारण्या पासून जवळ असलेले सूर्यमाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

तानसा अभयारण्यातील वनसंपदा :

तानसा अभयारण्य हे तानसा तळ्याच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले असल्याने या अभयारण्यात विविध प्रकारची झाडे आणि झुडपे आढळतात व सोबतच जैवविविधता या अभयारण्यात आपल्याला बघायला मिळेल.

इथल्या जंगलात हिरडा, साग, बाभूळ, बेहडा, साग, ऐन, आंबा, पिंपळ, बहावा, कदंब अशा प्रकारची झाडे आढळतात. तसेच तानसा अभयारण्यात बांबूची बेटही आहेत. औषधी वनस्पती सुद्धा या अभयारण्यात बघायला मिळतात.

तसेच कळंब, खैर, कदंब, बीला, साल, आणि काकड अश्या प्रकारचे वृक्ष तानसा अभयारण्यात बघायला मिळतील.

तानसा अभयारण्यातील प्राणी जीवन / वन्य जीवन :

तानसा अभयारण्य हे जलाशयाच्या क्षेत्रात असल्याने या अभयारण्यात घनदाट जंगले आहेत त्यामुळे येथे वन्यजीवन अस्तित्वात आहे.

येथे वाघ, बिबट्या, सांबळ, चौशिंगा, टीपके वाली हरणे, रान डुक्कर, चितळ, काकर, माकड, तरस, कोल्हा, उंदीर, वटवाघुळ अश्या 54 जातींचे पाणी तानसा अभयारण्यात आढळतात.

तसेच सरपटणा-या प्राण्यांमध्ये विविध प्रकारच्या पाली, सरडे, रान सरडे, साप, नाग, घोरपड, अजगर, घोणस आणि फुरसे इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो.

तानसा अभयारण्यातील पक्षी जीवन :

तानसा अभयारण्याच्या जलाशयाच्या क्षेत्रांमध्ये व अभयारण्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी येथे बघायला मिळतात. सुमारे 250 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी तानसा अभयारण्यात आढळतात.

त्यामध्ये हळद्या, नवरंग, तितर, मुनिया, खाटीक, बुलबुल, टकचोर इत्यादी पक्षी आढळतात. तानसा अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा, पाणकावळा, राखी बगळा, जांभळी पाणकोंबडी आणि लाजरी पाणकोंबडी या तानसा अभयारण्यात इत्यादी पक्षी बघायला मिळतात.

पर्यटन :

तानसा अभयारण्या जवळील तानसा तळ्याचा जलाशय पर्यटकांना तानसा अभयारण्याच्या प्रेमात पाडतो. अभयारण्यात आढळणारे विविध पक्षी, प्राणी यामुळे येथील परिसर अधिकच सुंदर दिसतो. पक्षी आणि निसर्ग निरीक्षणासाठी येणारे निसर्गप्रेमी आणि पक्षी प्रेमींसाठी हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.

म्हणून मुंबई, ठाणे अश्या शहरांमधून निसर्ग प्रेमींचे आवडीचे ठिकाण म्हणजे तानसा अभयारण्य होय. या अभयारण्यात बाबूंची बेटे आढळतात. या तानसा अभयारण्यातील वैभव हे पाहताना डोळे भरून जातात.

तानसा अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते. पण नोव्हेंबर ते मे या महिन्यांदरम्यानचा काळ हा या अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. या अभयारण्याची विशेष आकर्षण म्हणजे येथे आढळणारे विविध पक्षी. त्यामुळे तानसा अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.

तानसा अभयारण्यास कसे जावे :

तानसा अभयारण्यास जाण्यासाठी विमान, रेल्वे ,रस्ता मार्गांनी येथे पोहोचण्याची सुविधा आहेत. तानसा अभयारण्यापासून जवळचे विमानतळ हे मुंबई येथे आहे व ते सुमारे 90 किलो मीटरच्या अंतरावर आहे.

तानसा अभयारण्यापासून 13 किलो मीटरच्या अंतरावर आटगाव रेल्वे स्टेशन आहे. तानसा अभयारण्य मुंबई पासून 90 किलो मीटरवर असून मुंबई- आग्रा महामार्गावरील शहापूर शहरापासून येथे पोहोचण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment