स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी । Swachh Bharat Abhiyan Nibandh in Marathi

स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी । Swachh Bharat Abhiyan Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी । Swachh Bharat Abhiyan Nibandh in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी । Swachh Bharat Abhiyan Nibandh in Marathi

स्वच्छतेचे महत्व तर आपण सर्वांना माहितीच आहे.. निरोगी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी स्वच्छ राहणे तितकेच गरजेचे आहे जितके वैद्यकीय सल्ला घेणे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वच्छ त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

स्वच्छतेचे महत्त्व देशातल्या प्रत्येक नागरिकाला करून देण्यासाठी भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. स्वच्छता हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. स्वच्छते बद्दल माहिती असणे सर्वांना गरजेचे आहे.

स्वच्छ भारत अभियानाला “स्वच्छता अभियान” असेसुद्धा म्हटले जाते. माणसाने स्वच्छता ही फक्त वैयक्तिक न ठेवता स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशाचा सुद्धा विचार केला पाहिजे. जर आपला वैयक्तिक जीवन आणि समाज स्वच्छ राहायला तर देश सुद्धा आपोआप स्वच्छ राहील.

त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही गावापासून शहरापर्यंत आणि शहरापासून संपूर्ण देशामध्ये केली पाहिजे.

स्वच्छतेचे महत्व लक्षात ठेवून भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर 1914 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

नरेंद्र मोदी यांनी भारत देशाच्या प्रतिमेला बदलण्यासाठी देशातील सर्व नागरिकांना एकत्र करून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आणि आज अभियानाचा परिणाम म्हणजे देशातील अनेक ठिकाणं मध्ये स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी रित्या पार पडलेल्या दिसत आहे.

खरंतर! स्वच्छ भारत अभियान हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. देशातील सर्व नागरिकांना एकत्र करून देशांमध्ये स्वच्छता निर्माण करणे आणि स्वच्छ भारत अभियानाची स्थापना करणे हे महात्मा गांधीचे असलेले स्वप्नात 2 ऑक्टोबर 2014 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाले.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा गांधी स्वतः स्वच्छ राहून स्वच्छतेला ईश्‍वराच्या पूज्य प्रमाणे मानत. महात्मा गांधींनी सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

महात्मा गांधी यांनी त्यांच्या संपूर्ण जीवन काळामध्ये स्वच्छता ला अनन्यसाधारण महत्त्व दिले. ते पहाटे चारला उठून स्वतःची साफसफाई स्वतः ‌ करीत. तसेच महात्मा गांधी यांनी भारत देशामध्ये स्वातंत्र्याच्या महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यामध्ये त्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांना भारत छोडो असा नारा दिला याप्रमाणे त्यांनी देशातील नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र देखील दिला.

देवाच्या काळामध्ये महात्मा गांधी यांना लोक देव समजून महात्मा गांधीजींचे सर्वमान्य ऐकत त्यामुळे गांधीजींनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियाना चा संदेश दिला. तसेच नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सर्वप्रथम वाराणसी येथे राबवली. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गंगा नदीच्या अस्सी घाटावर  या अभियानाची सुरुवात केली.

म्हणून महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यामागचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारत देशातील सर्व गाव आणि शहरे हागणदारीमुक्त करून देशातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे होय. तसेच स्वच्छ भारत अभियान द्वारे देशातील सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालय यांकडे लक्ष केंद्रित करणे हा देखील स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश होता.

खरंच! प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवा वातावरण आणि घर आवश्यक असते. स्वच्छतेमुळे आपल्या आसपासच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार, रोग आणि महामारी पसरत नाही. त्याच बरोबर माणसाची जीवनशैली सुद्धा बदलून जाते. स्वच्छ  राहिल्या मुळे आपल्या शरीराला अनेक चांगल्या सवयी ची लागण सुद्धा होते.

आणि चांगल्या सवयी आपल्या जीवनावर चांगला परिणाम करतात. तरीपण आपल्या समाजातील काही लोक हे परिसराकडे दुर्लक्ष करतात. आपण वैयक्तिक रित्या स्वच्छ राहतो आपला घर आणि आंगण स्वच्छ ठेवतो, पण आपल्या जवळच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर हे आपले असते आणि परिसर हा दुसऱ्याचा असतो या विचाराने मानवाने आज निसर्गासोबत स्वतःचा देखील र्हास करून घेतला आहे.

स्वच्छता ठेवणे हे सरकारचे काम नसून प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक कर्तव्य आहे.  तरीसुद्धा आपल्या देशातील सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करून देशातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने  स्वच्छतेचे महत्व समजून आपल्या परिसरामध्ये आणि वैयक्तिक रित्या स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

 निष्कर्ष :

स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक जबाबदारी आहे. म्हणून देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मनामध्ये स्वच्छतेचे आवड निर्माण केली पाहिजे. आपल्या देशाला आणि समाजाला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक  व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.

देशामध्ये स्वच्छता करण्याचे हे काम फक्त सरकारच करू शकत नाही त्या सोबत देशातील लोकांनी देखील प्रयत्न केला पाहिजे. भारत देशाला स्वच्छ भारत बनवण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.

भारत देशातील प्रत्येक नागरिकाला असे वाटले पाहिजे की, आपल्या प्रयत्नातून आपण एक दिवस नक्कीच भारत देशाला “स्वच्छ भारत, सुंदर भारत” बनवू शकतो.

तर मित्रांनो ! वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment