श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये | Shravnatla Pahila Paus Vaishishtya

श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये | Shravnatla Pahila Paus Vaishishtya

मित्रांनो! आपल्या तील बहुतांश जणांना पाऊस आवडतो परंतु श्रावणातला पाऊस चाहाल सर्वांनाच आवडत असेल कारण श्रावणातला पाऊस म्हटलं की सर्वांच्या तोंडावरती आनंदाचा भाव आणि स्मितहास्य येतं आणि सर्वजण श्रावणाच्या पावसाचे वर्णन करायला लागतात. खरोखरच श्रावणातला पाऊस हा खूपच खास असतो.

कारण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण निसर्गाचे चित्र बदलून जाते. हिरवागार निसर्ग, वाहणाऱ्या नद्या, त्यात रिमझिम पावसाच्या धारा, आणि मधुनच येणारी वार्‍याची झुळुक व कोकीळ पक्षाचा येणारा मधुर आवाज आणि जंगल केव्हा डोंगर-दऱ्या च्या भागामध्ये नाचत असलेला मोर हे दृश्य पाहून जणू आपण आपल्या कल्पनेच्या दुनियेमध्ये गेलो असे वाटते.

आजच्या लेखामध्ये आपण या श्रावण महिन्यातील पहिल्या पावसाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये | Shravnatla Pahila Paus Vaishishtya.

श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये | Shravnatla Pahila Paus Vaishishtya

हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्यामध्ये सण, उत्सव आणि व्रते एकापाठोपाठ एक आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. त्याबरोबर श्रावण महिन्यातला पाऊस देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो.

श्रावण महिन्यातील पावसाचा हा सर्वांच्या मनाला भुलवणारा ठरतो. रिमझिम पावसाच्या धारा आणि त्यासोबतच निसर्गा मध्ये झालेले बदल हे सर्व दृश्य अतिशय निसर्गमय आणि सौंदर्याने भरलेले असते. आता आमचा श्रावणातल्या पहिल्या पावसाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत.

1. श्रावण महिन्यातील पहिल्या पावसाची विविध रूपे :

श्रावण महिन्याला हिंदीमध्ये सावन म्हटले जाते आणि संस्कृत मध्ये नभ असे म्हणतात. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पावसाची विविध रूपे पाहायला मिळतात. जसं की,

1. रिमझिम पाऊस :

रिमझिम पावसा मध्ये पावसाच्या धारा अगदी हलक्या असतात. हा पाऊस खूप वेळ येतो परंतु या पावसाचा जोर अधिक कमी असतं हलके हलके पावसाचे थेंब असतात. लहान मुलांना या पावसामध्ये भिजायला खूप आवडते. या पावसाचा आनंद हा इतर पावसा पेक्षा खूपच वेगळा असतो.

2. वाऱ्यासह येणारा पाऊस :

श्रावण मध्ये येणाऱ्या दुसऱ्या प्रकारचा पाऊस म्हणजे वाऱ्यासह येणारा पाऊस यामध्ये वाऱ्याचा जोर हा खूप असतो त्यामुळे पावसाची दिशा कशी ही बदलत असते.

3. ऊन- पाऊस :

श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन पडते. दिवसभर हा ऊन पावसाचा खेळ चालूच असतो. श्रावण महिन्यामध्ये पडणारे नेहमीच कोवळे असते. त्यामुळेच श्रावण महिन्यातील कोवळ्या उन्हाचे वर्णन हे स्त्रियांसोबत केलेली आहे ज्याप्रमाणे स्त्री नाजूक असते त्याप्रमाणे श्रावण महिन्यातले ऊन हे कोवळे आसते.

4. मुसळधार पाऊस :

श्रावण महिन्यामध्ये येणारा अचानक पाणीचा मुसळधार पाऊस हा खूप जोराचा आसतो. काही मिनिटांसाठी येणारा हा पाऊस अतिशय मोठा आणि मुसळधार असतो. या पावसाचे थेंब देखील अगदी टपोरे असतात त्यामुळे काही मिनिटांमध्ये या पावसामध्ये आपण भिजून जातात.

2. श्रावण महिन्यामध्ये निसर्गात झालेले बदल :

श्रावण महिन्यामध्ये झालेल्या पहिल्या पावसामुळे संपूर्ण निसर्गाचे चित्रच बदलून जाते. श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवेगार गवत, हिरवीगार झाडी पहायला मिळते. त्यासोबतच संपूर्ण डोंगर-दर्‍यांमधे कोवळी गवत उगलेली पाहायला मिळतात. त्यामुळे संपूर्ण डोंगर-दऱ्या यांनी जणू हिरवा शालू प्रदान केला आहे असे दिसते. तसेच डोंगरावरून वाहणाऱ्या नद्या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर घालतात.

तसेच श्रावण महिन्यातील पावसामुळे मध्ये मोर देखील अतिशय आनंदाने नाचत असतो आणि ते चित्र देखील सौंदर्य प्रदान करण्यास मदत करते.

श्रावण महिन्या मध्ये वाऱ्याच्या झुळूक मध्ये देखील वेगलाच थंडावा निर्माण झालेला पाहायला मिळतो. वाऱ्याची ही झुळूक अंगाला लागताच मन प्रसन्न होते.

अशाप्रकारे श्रावण महिन्याचे दृश्य आहे मनाला बनवणारे आणि निसर्गाच्या प्रेमामध्ये पडायला लावण्यासाठी भाग पाडते.

तर मित्रांनो ! ” श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये | Shravnatla Pahila Paus Vaishishtya “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना माझ्याशी शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment