शिवनेरी किल्ल्याची माहिती । Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ल्याची माहिती । Shivneri Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्यातील शिव छत्रपती महाराजांचे जन्म स्थान असलेला हा शिवनेरी किल्ला महत्त्वाचे स्थान बजावतो.

आज आपण याच ” शिवनेरी किल्ल्याची माहिती “ बघणार आहोत.

चला तर मग बघुया ” शिवनेरी किल्ल्याची माहिती “.

शिवनेरी किल्ल्याची माहिती । Shivneri Fort Information In Marathi

महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला म्हणजेच हा शिवनेरी किल्ला जुन्न शहराजवळील वसलेला आहे. पुणे शहरापासून साधारणता 105 किलो मीटरवर ह्या किल्ल्याचे स्थान आहे.

19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ह्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे.

  • शिवनेरी किल्ल्याची रचना आणि स्थान :

महाराष्ट्रातील जुन्नर जवळ वसलेला हा शिवनेरी किल्ला. या किल्ल्याच्या चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यासाठी अवघड असा बालेकिल्ला आहे. जुन्नर मध्ये प्रवेश करताच आपल्याला ह्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन होते.

शिवनेरी किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची ही साधारणता 3,500 फूट येवढी आहे व हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारच्या किल्ल्यांमध्ये मोडतो.

किल्ल्याची चढाई ही मध्यम आहे आपण सहजरीत्या किल्ल्यावर चढू शकतो तर किल्ल्याची सध्याची स्थिती ही सर्व दृष्ट्या अधिक चांगले बघायला मिळते. भारत सरकारने 26 मे इ.स. 1909 रोजी ह्या किल्ल्याला ” महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे.

इ.स. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी तील डॉ. जॉन फ्रायर याने या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली व त्याने त्याच्या ग्रंथात असा उल्लेख केला की या शिवनेरी किल्ल्यावर हजार कुटुंबे सात वर्षे राहतील येवढी शिधासामुग्री आहे.

  • शिवनेरी किल्ल्याचा इतिहास :

इसवीसना पूर्वीच्या काळापासून प्रसिद्ध असणारे जुन्नर हे शहर आहे. शकराजा नहपानाची राजधानी ही हेच जुन्नर शहर होते. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला व जुन्नर शहरावर आपले वर्चस्व स्थापित केले.

नाणेघाट हा त्या काळातील व्यापारी मार्ग असल्याने ह्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी इ.स. 1170 मध्ये या शिवनेरी किल्ल्याची स्थापना केली होती.

सातवाहनांच्या साम्राज्यानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. पुढे 1170 ते 1308 च्या सुमारास शिवनेरी वर यादवांनी आपले राज्य स्थापित केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.

त्यानंतर इ.स. 1443 मध्ये मलिक- उल- तूजार याने यादवांचा पराभव करून हा किल्ला सर केला. अशा प्रकारे शिवनेरी किल्ला बहमनी राजवटीखाली आला. व पुढे इ.स. 1470 मध्ये मलिक- उल- तुजारचा प्रतिनिधी मलिक महंदन याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा जिंकला.

व पुढे 1446 मध्ये निजामशाहीची स्थापना झाली. त्यानंतर पुढे 1595 मध्ये किल्ला जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला.

जेव्हा राजमाता जिजाबाई गरोदर असताना जाधव राव जिजाबाईंना घेऊन शिवनेरी वर गेले. व 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. व पुढे इ.स. 1636 मध्ये शिवरायांनी शिवनेरी गड सोडला.

पुढे 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे मराठ्यांनी शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले. पुढे 40 वर्षानंतर म्हणजे 1716 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा शिवनेरी किल्ला मराठा साम्राज्यात आणला.

  • शिवनेरी किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

शिवनेरी किल्ला चढताना सात दरवाज्यां मधून प्रवेश करावा लागतो. या सात दरवाजांपैकी पाचवा दरवाजा हा शिवाई दरवाजा आहे. या दरवाजातून आत गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे व मंदिराच्या मागच्या बाजूच्या कड्यात सहा ते सात गुहा आहेत.

सातव्या दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच अंबरखाना आहे. आज या अंबरखान्याची पडछड झालेली दिसेल. पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी होत असत या अंबरखान्यापासून दोन वाटा जातात त्यातली एक वाट टेकडावर जाते.

या वाटेवर गंगा, जमुना या शिवाय पाण्याची टाकी आढळते. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पुढे असलेला बालशिवाजींचा पुतळा बघायला मिळतो.

समोर शिवकुंज आहे आणि या शिवकुंजा समोर चालत गेल्यावर हमामखाना लागतो. व येथून थोड पुढे गेल्यास शिवजन्मस्थानाची इमारत लागते ही इमारत दोन मजली असून खालच्या खोलीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.

  • शिवनेरी किल्ल्यावर कसे जाल :

मुंबई पासून माळशेज मार्गे जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यावर आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरून गणेश खिंड लागते. या खिंडीतून शिवनेरी किल्ल्या पर्यंत जाता येते. या मार्गानी शिवनेरी वर पोहोचण्यासाठी एक दिवस लागतो.

पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणता 75 किलो मीटरच्या अंतरावर शिवनेरी आहे. तसेच शिवनेरी वर जाण्यासाठी पुणे- नाशिक मार्ग सुद्धा आहे त्यानंतर नारायणगाव ते जुन्नर मार्गे शिवनेरी 15 किलो मीटर वर आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment