शिक्षक दिवस मराठी निबंध । Essay On Teachers Day in Marathi

शिक्षक दिवस मराठी निबंध । Essay On Teachers Day in Marathi

आयुष्य जगण्यासाठी लागते चांगले व्यक्तिमत्व संस्कार आणि ते आपल्याला मिळतात घरात. आपल्या सभोवताली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि याच शिक्षकांनी दिलेले संस्कार, शिक्षण हे आयुष्याचा पाया असतो. आणि दिलेला मार्गदर्शनाखाली आपण आपले जीवन जगत असतो. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे.

तरी आज आपण याच शिक्षकांचे आभार मानण्यासाठी साजरा करतो. ते ‘ शिक्षक दिन’ यावर निबंध बघणार आहोत.

शिक्षक दिवस मराठी निबंध । Essay On Teachers Day in Marathi

शिक्षक दिवस ‘५ सप्टेंबर’ हा दिवस जवळ येताच शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच कुजबुज पहायला मिळते त्यामागचे कारण म्हणजे ‘५ सप्टेंबर’ ला ‘ शिक्षक दिन’ साजरा करतो.

शिक्षकांना समर्पित करणारा तो दिवस त्यांच्या विशेष योगदानाची प्रशंसा करून देण्याचा तो दिवस, शिक्षकांची कर्तुत्व व्यक्त करून देण्याचा हा दिवस म्हणजेच ‘ शिक्षक दिवस’

५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजेच आमचे पूर्वीचे आध्यक्ष, ” डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण” यांचा जन्मदिवस हा ५ सप्टेंबर ला असतो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे शिक्षणाचे एक महान व्यक्तिमत्त्व होते, विद्वान व एक शिक्षक आहे भारताचे राष्ट्रपती म्हणून नामांकित होते म्हणून त्यांच्या जन्मदिवशी संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिवस घोषित करण्यात आला. शिक्षकांचे सन्मान करण्यासाठी त्यांच्या कार्याची मान ठेवण्यासाठी हा उत्सव पूर्ण भारत देशांमध्ये साजरा केला जातो.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या उत्साहाने व आनंदाने शिक्षक दिवस साजरा केला जातो.

आजच्या आधुनिक काळात शिक्षक दिवसाची महत्वकांक्षा मानक ठरली आहे. भारत संस्कृती मध्ये गुरु- आणि शिष्याचे नाते हे एक पवित्र संबंध मानले जाते. गुरु म्हणजेच शिक्षक. प्रत्येकाच्या आयुष्याचा पहिला शिक्षक हे आई- वडील असतात.

आई- वडिलांमुळे हे सुंदर सृष्टी आपल्याला पहायला मिळते. व आई- वडिलांनंतर जीवनात येतो ती गुरु म्हणजे शिक्षकचं. आयुष्य जगतं असताना योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करतात ते हे शिक्षकचं. म्हणून शिक्षकांचे महत्त्व हे खूप महत्त्वाचे आहे. देशाचे भविष्य हे या शिक्षकांच्या हातात असतं असे म्हणतात ते बरोबरच कारण याच शिक्षकांच्या ज्ञानामुळे भविष्यकाळाला

एक डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक, लेखक व देशाचे नाव उंच करणारे चांगले व्यक्तिमत्व असणारी पिढी तयार करण्यामागे याच शिक्षकांचे योगदान आहे. म्हणून या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी शिक्षक दिवस साजरा केला जातो तसेच फक्त भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिवस साजरा करतात. म्हणून ५ ऑक्टोबर हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन’ म्हणून जाहीर केलाय. परंतु भारतामध्येच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्म दिवशी साजरा करतात.

आयुष्य जगण्यासाठी लागणारे महत्त्वाचे असते म्हणजेच शिक्षण नेल्सन मंडेला म्हणतात की,

” शिक्षण हे एक प्रभावी शास्त्र आहे ज्याचा वापर

करून तुम्ही जग बदलू शकता. “

याचाच अर्थ असा की शिक्षणाच्या बळावर आपण हे संर्ण जग बदलू शकतो. एवढे प्रभाव एका शिक्षणामुळे होऊ शकतात. आणि हे सर्व बदल घडवून आणण्याचे काम हे शिक्षक करत असतात. म्हणून म्हटले जाते की,

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु;

गुरु याचा अर्थ असा कीर्देवो महेश्वर: ।

गुरु: साक्षात परब्रम्ह

तस्मै श्री गुरुवे नमः ।।

याचा अर्थ असा हि गुरु ( शिक्षक) हे ब्रम्ह, विष्णू व शिव आहेत. अर्थात गुरूला त्रिदेवांचा यांचा दर्जा दिलेला आहे व अशा गुरूंना माझा नमस्कार आहे.

शिक्षक हे आपल्याला आज्ञानाच्या मार्गातून ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जात असतात. सत्याचा मार्ग दाखवितात. चांगले- वाईट काय त्याची शिकवण देतात.

शालेय, महाविद्यालयीन, पुस्तकी शिक्षणा व्यतिरिक्त एक आदर्श व्यक्तिमत्व घडविण्याचे ज्ञान ते अर्पण करीत असतात. त्यांनी दिलेल्या या ज्ञानाचा कंदील घेऊन आपण आपले आयुष्य जगत असतो. म्हणून विद्यार्थी शिक्षक दिना दिवशी आपल्याला आवडत्या शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात.

काही विद्यार्थी शिक्षकांना भेट वस्तू, ग्रीटिंग कार्ड, पेन, डायरी व इत्यादी वस्तू आपल्या इच्छेनुसार देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात. तर काही विद्यार्थी ई-मेल, व्हिडिओ, संदेश, ऑडिओ, ऑनलाइन चॅट द्वारे ही आपापल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. त्यांनी दिलेला चांगल्या गोष्टींचा आचार आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये केली पाहिजे. म्हणजे शिक्षकांनाही विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी वाटेल व शिक्षक ही विद्यार्थ्यांना आणखी ज्ञान देण्यासाठी उत्सुक होतील.

अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये तर शिक्षकांचा सन्मानांसाठी कार्यक्रम ही आयोजित केला जातो त्या मध्ये विद्यार्थी शिक्षकांवर भाषण करतात आपल्या आवडत्या शिक्षकांचे व्यक्तिमत्व सांगतात.

अनेक गप्पा- गोष्टी, कॉमेडी, गाणे, संगीत, डान्स इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून सर्व विद्यार्थी- शिक्षकांसाठी स्वादिष्ट असा अल्पाहार ही ठेवला जातो. अशा प्रकारे पूर्ण दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी या दिवशी शिक्षकांबद्दल चे प्रेम व्यक्त करतात व आपुलकी हे दाखवितात.

शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना समान नजरेने बघत असतात. कोणी कुठल्याही जातीचा असला, अथवा गरीब किंवा श्रीमंत जरी असला तरी शिक्षक त्याला सर्व विद्यार्थ्या समानच बघतात व सर्वांना एक सारखी वागणूक देतात.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात म्हणून शिक्षकांना मुलांचे दुसरे पालक असेही म्हणतात.

चांगले व्यक्तिमत्व कसे घडवावे याचे परिपूर्ण शिक्षण शिक्षक हे विद्यार्थ्यांना देतात. जगासमोर उभे राहण्याची ताकत समस्यांना सामोरे जाण्याचे धाडस शिक्षक विद्यार्थ्यांना देत असतात.

प्रत्येक विद्यार्थ्यातील चांगल्या गुंणांना ओळखून त्या गुणांद्वारे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडावे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना देतात.

म्हणजे एखादा विद्यार्थी हा खेळामध्ये परिपूर्ण असेल तर त्याला खेळाचे आणखी प्रशिक्षण देऊन त्या विद्यार्थ्याला उत्तम खेळाडू होण्याची ताकद प्रदान करतात.

चांगले शिक्षण तर देतातच शिक्षक पण त्या बरोबर सर्वांगीण गुणाचा विकास कसा होईल याकडे ही अगदी बारीकतेचे लक्ष देण्याचे काम शिक्षक करतात.

कारागीर जसे दगडाला ठोके देऊन त्याची सुंदर मूर्ती तयार करतात, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांमधील अवगुण ओळखून त्यांना दुर करून चांगला आदर्श विद्यार्थी बनवण्याचे काम शिक्षक करतात.

शाळेमध्ये अनेक लहान- मोठ्या उपक्रम घेऊन जसे की, ‘ झाडे लावा, झाडे जगवा’, ‘ स्वच्छ भारत अभियान’, ‘ पाणी आडवा, पाणी जिरवा’ या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना चालू समस्यांची जाणीव करून देऊन त्यावर उपाय काढायला प्रेरित करतात.

आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या महान व्यक्तींची जाणीव पिढ्या न पिढ्या विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शिक्षक धडपडत असतात व त्या महान लोकांच्या जन्मदिवसाला / जयंतीला त्यांचे महान कार्य सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात.

आधुनिक काळात विद्यार्थी हे मोबाईल, संगणक त्यांचे अधिन जात असल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्याचे फायदे- तोटे यांचे शिक्षण शिक्षक वेळेवर देतात. मैत्री संबंध काय असते त्याचे आयुष्यातील महत्त्व शिक्षकांकडून शिकायला मिळते.

२६ जानेवारी ( प्रजासत्ताक दिन) व १५ ऑगस्ट ( स्वतंत्र्य दिन) या दिवसाचे महत्त्व काय याचे शिक्षण शिक्षकांकडूनच शिकायला मिळालेले दिसते. मोठ्यांचे आदर, आपल्या देशा बद्दल आपुलकी याची जाणीव ही शिक्षकच करून देतात.

म्हणजेच आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांची पूर्ती शिक्षकच करतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षक हे एक महान व्यक्ती आहेत. व विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व कळावे, त्यांच्या ज्ञानाची पूर्ती व्हावी.

आयुष्यात शिक्षक म्हणजे काय ? शिक्षकांचे महत्त्व काय ? हे सर्व कळावे म्हणून भारत सरकारने ५ ते १५ वर्षीय मुलांना शिक्षण हा महत्वाचा हक्क सांगून या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अनिवार्य शिक्षण घेण्याची अट टाकली आहे. व ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस घोषित केला आहे. या दिवसाच्या निमित्ताने तरी विद्यार्थ्यांना शिक्षकांमधील प्रेम संबंध वाढतील व विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व कळेल.

आपल्या आयुष्यात आपल्या शिक्षकांची आवश्यकता किती महत्त्वाची आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांना दर वर्षी आदरने, सन्मानाने व श्रद्धेने शिक्षक दिवस साजरे केले पाहिजेत. व त्यांनी दिलेल्या, शिकवलेल्या चांगल्या गोष्टींचे पालन करून त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये आचरण केले पाहिजे. म्हणून माझ्या कडून माझ्या आयुष्यातील सर्व शिक्षकांना

‘ शिक्षक दिवसाच्या’ खूप खूप शुभेच्छा !

धन्यवाद मित्रांनो !


ये देखील अवश्य वाचा :-