सर्व धर्म समभाव मराठी निबंध । Sarva Dharma Sambhav Nibandh in Marathi

सर्व धर्म समाभाव मराठी निबंध | Sarva Dharma Sambhav Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” सर्व धर्म समभाव मराठी निबंध । Sarv Dharm Sambhav Nibandh in Marathi “ घेऊन आलो.

या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

सर्व धर्म समभाव मराठी निबंध । Sarva Dharma Sambhav Nibandh in Marathi

आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. आपल्या देशाला सांस्कृतिक परंपरा आहे खूप छान लागलेली आहे आपल्या देशाची परंपरा यावरून असे कळून येते की ” देव हा एकच आहे ” परंतु, त्याचे नावे वेगवेगळे आहेत .

परंतु आपल्या मधील काही रुपाने जात-धर्म आणि त्याला वेगळे करून देवाची विभागणी केली आहे. मी उच्च जातीचा तु कनिष्ठ मी सर्वश्रेष्ठ असे म्हणून आपापसात भेद निर्माण केला.

जाती धर्माची परंपरा ही प्राचीन काळापासून आली हे खरे? पण यामागील कारण म्हणजे पूर्वी मनुष्याने पैसे कमावण्यासाठी वेगवेगळा वेगवेगळे व्यवसाय करायला सुरुवात केली. जीवन जगण्यासाठी एक साधन म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसाय करू लागला. हळूहळू या व्यवसायातून जात धर्म असा भेदभाव निर्माण झाला.

कोणी शिंप्याचा व्यवसाय कोणी कुंभार चा कोणी चांभार तर कोणी कोळी विविध विविध व्यवसाय करू लागले. काहीजण उच्च दर्जाचे व्यवसाय करू लागले यावरून उच्च मध्यमवर्गी अशी विभागणी झाली व या समाजामध्ये भेदभाव निर्माण झाला.

परंतु सानेगुरुजी म्हणतात,

“खरा तो एकची धर्म,

जगाला प्रेम अर्पावे  ||”

याचा अर्थ असा की, या जगामध्ये एकच धर्म आहे, तो म्हणजे ” माणुसकीचा धर्म. ” जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मदत करतो, दीनदुबळ्यांची सेवा करतो, आर्थात जगाला प्रेम देतो. तो व्यक्ती खऱ्या अर्थाने धर्माचा अर्थ जाणतो व माणुसकी धर्माची जोपासना करतो.

आजचे जग हे आधुनिक जग आणि प्रगतशील जग म्हणून ओळखले जाते. आपल्या देशाची प्रगती झाली हे बरोबर ! पण या प्रगती सोबत माणूस माणसाला विसरून गेला आहे. त्यांच्यामध्ये जात-धर्म याची भिंत उभारली आहे. सर्व धर्म समभाव ही भावना विसरलेली आहे. त्यामुळे आजच्या पिढीमध्ये जात-पात असा भेदभाव जाणवतो. मुख्यता ग्रामीण भागा मधील लोक जात , पत,धर्म भेद याला घेऊन खूप अशिक्षित असलेली दिसतात.

आम्ही सर्व श्रेष्ठ, तु कनिष्ठ ,मध्यमवर्गी लोक असे म्हणून एकमेकांची अवहेलना करतात. यातून भांडण-तंटे ,मारहाण अशा घटना घडतात. काही शिक्षित लोकसुद्धा जात धर्म यामध्ये भेदभाव करतात. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजायला हवी.

धर्मभेद या आपल्या देशाला लागलेली एक प्रकारची कीड म्हणता येईल, कारण आपला भारत देशा संस्कृतीने नटलेला देश आहे, आपल्या देशात विविध जातीचे धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.

सर्वजण मिळून सण-उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतात.मग आपल्या या अशा पवित्र आणि संस्कृतीने नटलेल्या देशांमध्ये जात- धर्मा वरून एकमेकांची तुला होते हे कितपत बरोबर आहे. त्यामुळे आपल्या देशातील भेदभाव दूर होउन सर्व धर्म समानता ही भावना निर्माण व्हायला हवी.

सर्वधर्मसमभाव याची सुरुवात आपण वैयक्तिकरित्या करायला हवी, जेव्हा आपण जात-पात विसरून सर्वजण भाऊ -बंधु प्रमाणे राहतो तेव्हा आपल्या देशाची खरी प्रगती होईल. कारण आपल्या भारताची प्रतिज्ञा ही आपल्या सर्वांना माहिती असेलच, आपल्या प्रतिज्ञा चे पहिले वाक्य असे-

” भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे. “

त्यामुळे आपण सर्व धर्म समभाव ही भावना निर्माण करायला पाहिजे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत, जसे की हिंदू, मुस्लिम, सिख ,ईसाई, ख्रिचन. अशा विविध धर्माचे बंधू-भगिनी आपल्या समाजात आपल्या सोबत राहत असतात. त्यामुळे त्या प्रत्येक धर्माला समान दर्जा देणे हे आपले कर्तव्य आहे. एक धर्माच्या देवाला नाव जरी वेगवेगळे असले तरी देव हा एकच आहे. आणि हा देव आपल्याला बघायचं असेल, तर आपण गरीब लोकांना मदत,दिनबळ्यांचा सहारा बनायला हवा.

कारण खरा देव हा दगडात नसून तो माणसांत च्या मनामध्ये आहे. आपल्या देशातील अनेक महान पुरुषाने हेच सांगण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी आपले जीवन सुद्धा अर्पण केले. तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये धर्म भेद दिसून येतो, प्रत्येक जण सुताचा धर्म श्रेष्ठ असं सांगून आपल्या धर्माचा प्रसार करीत आहे, स्वधर्माचा अभिमान असावा.

स्वधर्म सांगता सांगता प्रत्येक धर्मात जाणून घेण्याची गरज नाही, कारण धर्म म्हणजे कर्मकांड अंधश्रद्धा भेदभाव मुळीच नाही, धर्म म्हणजे एक असा मार्ग  जो प्रत्येक व्यक्तीला एकमेकांवर प्रेम करायला आणि माणुसकी जपायला शकतो.

आज पर्यंत आपल्या समाजामध्ये खुप्  दंगली, मरहानी झाल्यात ते पण फक्त जाती धर्माच्या नावाखाली, त्यातील विधवांस आपण सर्वांनी पाहिलाच आहे, आता फक्त गरज आहे, ती म्हणजे या अनुभवातून शिकण्याची, मानवताधर्म जोपासण्याची, सर्व धर्म एकच  आहेत ही भावना बाळगण्याची.

आपल्या समाजामध्ये जाती धर्मावरून राजकारण चालू आहे ते थांबवण्याची आता गरज आहे. कारण खरे नेते हे सर्व धर्म समभाव यावर विश्वास करतात. परंतु आपल्या समाजामध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावणारे वृत्तीचे लोक दिसून येतात.

जो व्यक्ती सर्व धर्म समभाव या मध्ये विश्वास ठेवतो ,त्याला सर्व धर्म एक सामानच दिसतात. सर्व धर्मावर प्रेम करून ,सर्वजण एकत्र मिळून मिसळून  राहणे मनुष्याची खरी ओळख आहे. आपल्या धर्माला मानून दुसऱ्या धर्माचा आदर करणे, ती खरी सर्व धर्म समाभाव आहे.

त्यामुळे आज आपल्या समाजा तील सर्व लोकांना सर्व धर्म समाभाव हे तत्व बाळगून याचा आदर करणे खूप गरजेचे आहे. जेव्हा आपला समाज सर्व धर्म समाभाव होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास होईल. आणि सर्व धर्म समाभाव हाच संपूर्ण विश्वाचा समृद्धीचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्म समाभाव पाळणे, हे आपले पहिले कर्तव्य मानून  सर्व धर्म समाभाव याचा आदर केला पाहिजे.

तर मित्रांनो ! ” सर्व धर्म समाभाव मराठी निबंध । Sarva Dharma Sambhav Nibandh in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल ,तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” सर्व धर्म समाभाव मराठी निबंध । Sarva Dharma Sambhav Nibandh in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही Points आसतील तर, कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment