संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Sanganak Shap Ki Vardan Nibandh In Marathi

संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Sanganak Shap Ki Vardan Nibandh In Marathi

विज्ञानाने अनेक नवनवीन शोध लावले त्याचे सर्वात मोठा शोध म्हणजे संगणकाचा शोध होय. संगणकाचा चमत्कार तर आपण सर्वांना माहितीच आहे. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी संगणकाचा वापर करतो संगणकाशिवाय आपले जीवन अपूर्णच आहे.

संगणकाचे विविध फायदा आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो किंवा विविध कामासाठी संगणकाचा वापर करू शकतो. तसेच संगणकाचे दुष्परिणाम देखील आहेत. म्हणूनच आज सर्वांसमोर हा प्रश्न पडला आहे संगणक शाप की वरदान?

संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Sanganak Shap Ki Vardan Nibandh In Marathi

अत्याधुनिक संगणक हा विज्ञानाचा एक सर्वात मोठा चमत्कार समजला तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु हा संगणक आपल्या साठी लाभदायी ठरणार का हानिकारक?

संगणक हे वरदान आहे असा विचार केला तर खरोखरच संगणक आपल्यासाठी एक वरदान ठरू शकते कारण एक संगणक साधारणता पंधरा माणसाचे काम करतो त्यामुळे वेळ वाचतो त्या सोबत मजुरांची संख्या देखील कमी होते त्यामुळे पैशाची बचत होते. संगणकाच्या साहाय्याने कामे करणारा यंत्रमानव तर एकावेळी 50 माणसाचे काम करू शकतो. तेही अगदी कमी वेळामध्ये.

संगणक किंवा कम्प्युटर चा शोध हा आपल्यासाठी सर्वात मोठा शोध सुद्धा ठरू शकतो. संगणकाच्या शोधांमुळे मानवी कार्यक्षमतेची वृद्धी झाली. पूर्वी एखाद्या कामाला लागणारा तासन्तास वेळ आता संगणकामुळे काही मिनिटांमध्येच शक्य झाला आहे. संगणकाच्या कार्यक्षम त्यामुळे आज संगणकाला माणसाचा सर्वात जास्त कामात येणारा मित्र देखील म्हटले जाते.

कॉम्प्युटर मध्ये इंटरनेटच्या साह्याने आपण घर बसल्या विविध कार्य करू शकतो. संगणकाने आपल्या जगाला अतिशय जवळ आणले आहेत. घर बसल्या संगणक चा वापर करून आपण जगभरातील कुठलेही ठिकाण, वस्तू पाहू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीस बोलू शकतो. आवश्यक असेल तेवढी सगळी माहिती संगणकामध्ये सामाविष्ट केलेली आहे.

तसेच संगणकामध्ये विविध फंक्शन सुद्धा पाहायला मिळतात त्याच्या मध्ये तिने आपले सर्व व्यवसाय करू शकतो. म्हणून व्यवसाय क्षेत्र किंवा कंपन्यांमध्ये संगणक ला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. मोठमोठ्या कंपन्यांमधील काम तर संगणकाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. संगणकाच्या मदतीमुळे जगभरात माहितीची देवाण-घेवाण करणे, सूचना, फाइल्स पाठवणे शक्य झाले आहे.

संगणक मनोरंजन, सोशल नेटवर्किंग, सेवा प्राप्त करणे आणि माहिती मिळवणे इत्यादी कामासाठी वापरले जाते. संगणकामुळे घरबसल्या कोणतेही व्यवसाय किंवा काम करणे शक्य झाले आहे. भारतामध्ये मागील काही वर्षांमध्ये इंटरनेट स्वस्त झालेले संगणकाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला.

आज संगणक प्रत्येक शहरामध्ये तसेच खेडेगावांमध्ये देखील पाहायला मिळते तसेच संगणक आणि शिक्षण प्रणालीमध्ये देखील आपले महत्त्वाचे कामगिरी बजावली आहे. आज संगणकाच्या मदतीने आपण वेगवेगळे व्हिडिओ किंवा ब्लॉग पोस्ट करून जगासमोर आपले विचार मांडू शकतो त्यातून आर्थिक मदत देखील मिळू शकते. आज अधिक तर लोक घर बसल्या संगणकाच्या मदतीने ऑनलाईन खरेदी-विक्री सुद्धा करू शकतात.

आजच्या काळामध्ये संगणक हे प्रत्येक क्षेत्रांमध्ये वापरले जाते असे कुठलेही क्षेत्र आहे ज्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर केला जात नाही. त्यामुळे संगणक हे आजच्या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

ज्याप्रमाणे संगणकाचे फायदे आहेत याप्रमाणे संगणकाचे काही दुष्परिणाम देखील आहेत‌. संगणकाचे फायदे हे मानव व कल्याणासाठी आणि हितासाठी फायद्याचे ठरतात तर संगणकाचे तोटे हे मानवी कल्याणासाठी धोक्याचे ठरतात.

आज काही लोक संगणकाचा इतका मोठ्या प्रमाणात वापर करतात की, दिवसभर संगणकासमोर बसतात त्यामुळे डोळ्याचे आजार आणि कंबरेचा दात दुखणे यांसारखे आजार समोर येत आहेत. तसेच संगणकाच्या अतिवापरामुळे काही लोक गेम्स आणि विविध संगणकाच्या फंक्शनला आहारी गेले आहेत ज्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.

तर आणि कॉम्प्युटर हा कोर्स हे कॉम्प्युटर ला हॅक करून त्यातील माहितीचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तर कम्प्युटरच्या मदतीने ऑनलाईन खरेदी करणाऱ्या लोकांची खूप फसवणूक होत आहे.

म्हणून संगणकाचे फायदे हे संगणकाला वरदान सिद्ध करीत आहे तर संगणकाचे तोटे हे संगणकाला अभिशाप म्हणून सिद्ध करत आहे. त्यामुळे आपण संगणकाचा वापर कोणत्या प्रकारे करतो त्यावरून संगणक शाप की वरदान? ठरू शकते.

तर मित्रांनो ! ” संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Sanganak Shap Ki Vardan Nibandh In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment