रोहिडा किल्ला माहिती मराठी । Rohida Fort Information In Marathi

रोहिडा किल्ला माहिती मराठी । Rohida Fort Information In Marathi

महाराष्ट्रातील रोहीड खोऱ्यात आढळणारा हा रोहिडा किल्ला.

आज आपण रोहिडा किल्ल्याची माहिती बघणार आहोत.

चला तर मग बगूया काय आहे रोहिडा किल्ला माहिती मराठी “ या भाषेत.

रोहिडा किल्ला माहिती मराठी । Rohida Fort Information In Marathi

सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग बघायला मिळतो. याच डोंगररांगेत 3 ते 4 किल्ले आढळतात. त्यांपैकी रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच हा ” किल्ले रोहिडेश्वर ” रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे.

रोहिडेश्वर किल्ला हा रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील म्हणतात.

  • रोहिडा किल्ल्याची रचना :

रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे 6 किलो मीटरच्या अंतरावर आहे. या किल्ल्याची उंची ही सुमारे 3660 फूट येवढी आहे तर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो व या किल्ल्याची चढाई ही मध्यम प्रकारची आहे व रोहीडा किल्ल्याची सध्याची परिस्थिती ही व्यवस्थित आहे.

रोहिडा किल्ल्याच्या पश्चिम दिशेला भैरवाचे देऊळ, पाण्याची टाके, दीपमाळ आणि काही चौरस आकाराचे दगड आहेत. या चौरस आकाराच्या दगडावर शिवलिंग किंवा पादुका असतात, परंतु या रोहिडा किल्ल्याच्या चौरसांबर लहान आकाराचे कळस आहेत सदरेच्या व देवळा समोर नगारा आणि नौबत यांची तांब्याची भांडी आहेत. रोहिडा किल्ल्याला फार मोठी सपाटी नाही.

रोहिड्यावर तळी, बूरुज, तट यांच्या व्यतिरिक्त फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. रोहिडा किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजाखाली एक एक मेट असून त्या प्रत्येक मेटास बुरुजाचेच नाव देण्यात आले होते. पण आज ही मेटे नामशेष झालेली दिसतात. हा रोहिडा किल्ला लहान असल्याने पाहण्यास फारसा वेळ लागत नाही.

  • रोहिडा किल्ल्याचा इतिहास :

रोहीडा किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन असावी. तर किल्ल्या वरील तिसऱ्या दरवाजावर असलेल्या लेखा वरून असे आढळते की, मुहम्मद आदिलशहाने ह्या किल्ल्याची दुरुस्ती केली होती.

इ.स. 1666 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार हा रोहिडा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 24 जून इ.स. 1670 रोजी शिवरायांनी हा रोहिडा किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांच्या कडून 30 होन घेत होते.

परंतु शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली की 30 च होनका, त्यावर शिवाजी महाराज म्हटले की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. त्यानंतर पुढे हा रोहिडा किल्ला मोगलांनी जिंकला. मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला.

पुढे इतर किल्ल्यांप्रमाणे हा रोहिडा किल्ला ही भोरांकडे होता.

  • रोहिडा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

रोहिडा किल्लावर प्रवेश करण्यासाठी प्रवेश द्वारातून जावे लागते. पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. त्यानंतर पुढे दहा ते वीस पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो.

या दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारे टाके बघायला मिळतात. येथून पाच- सात पायर्‍या चढून गेल्यावर किल्ल्याचा तिसरा दरवाजा लागतो.

हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. व यावर बऱ्या प्रमाणात कोरीव काम आढळते. त्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूस हत्तीचे तोंड कोरण्यात आले आहे.

किल्ल्यावर भैरवाचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. मंदिरात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडा किल्ल्याचा घेर हा लहान असल्याने हा किल्ला बघायला फारसा वेळ लागत नाही.

रोहिडा किल्ल्याच्या आग्रेय दिशेला शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघ जाईचा बुरुज, आणि पूर्वेस फत्ते बुरुज व सदरेचा बुरुज असे एकूण 6 बुरुज आहेत.

रोहिडा किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत दिसते. रोहिडा किल्ल्याच्या उत्तरे कडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी सुद्धा आहेत.

  • रोहिडा किल्ल्यावर जाण्याचा वाटा :

रोहिडा किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यता दोन मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्ग तर दुसरा चिखलावडे मार्ग.

१. बाजारवाडी मार्गे दक्षिणेस 8- 10 किलो मीटरच्या अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडी पर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहेत. बाजारवाडी पासून माळलेली वाट थेट गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचते.

२. चिखलावडे मार्गे खुर्दु इथून टप्प्याने नाकड मार्गे किंवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडासा कठीण आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment