राजगड किल्ल्याची माहिती | Rajgad Fort Information in Marathi

राजगड किल्ल्याची माहिती | Rajgad Fort Information in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी भाषेतून मिळेल.

आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही ” राजगड किल्ल्याची माहिती | Rajgad Fort Information in Marathi “ घेऊन आलोत.

या वेबसाईटवर महाराष्ट्रातील सर्व किल्ले व त्यांची माहिती दिलेली आहे.

राजगड किल्ल्याची माहिती | Rajgad Fort Information in Marathi

शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे हा राजगड किल्ला. छत्रपती शिवाजींची सुरुवातीची राजधानी येथेच होती.

राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या आग्नेयेस सुमारे 16 किलो मीटरवर आहे. समुद्र सपाटी पासूनची किल्ल्याची उंची ही सुमारे 1,376 मीटर येवढी आहे.

या राजगडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयेस सुवेळा आणि नैऋत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे.

राजगड किल्ल्याची रचना / स्थान :

सर्व गडांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा राजगड किल्ला आहे. सातवाहनपूर्व म्हणजे सुमारे 2000 वर्षां पूर्वी पासून हा राजगड डोंगर प्रसिद्ध आहे. एका ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या किल्ल्यावर आढळते. राजगडाचे पूर्वीचे नाव मुरंबदेव असे होते. 1394 मीटर उंचीचा हा राजगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारच्या किल्ल्यांमध्ये मोडतो.

तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या राजगड किल्ल्याची रचना आहे.

पुण्याच्या नैऋत्य दिशेला 45 किलो मीटरच्या अंतरावर आणि भोरच्या वायेव्येस 24 किलो मीटर वर नीरा- वेळवंडी- कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये मुरुंबदेवाचा डोंगर म्हणजेच राजगड उभा आहे.

राजगड किल्ल्याचा इतिहास :

इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून असे लक्षात येते की, सातवाहनपूर्व म्हणजे सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी पासूनच हा मुरुंबदेव डोंगर अस्तित्वात आहे. व याच डोंगरावर ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य आहे. ब्राह्मनी राजवटीच्या काळात या किल्ल्याला मुरुंबदेव या नावाने ओळखले जात होते.

इ.स. 1490 च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळको काळातील अनेक किल्ले जिंकून मुरुंबदेव हा किल्ला जिंकला.

पुढे या किल्ल्यावर 125 वर्षे निजामशाहीची सत्ता प्रस्थापित होती. इ.स. 1625 च्या सुमारास हा मुरुंबदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशाही कडे गेला. व पुढे इ.स. 1630 मध्ये हा राजगड किल्ला परत आदिलशाही कडून निजामशाहीत गेला.

शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी हा या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूरचा आदिलशाही सैन्या मधील काही जणांनी या किल्ल्यावर हल्ला केला या हल्ल्यात सेनाजी हे जखमी झाले.

पुढे शिवरायांनी मुरुंबदेवाचा हा किल्ला कधी घेतला या लिखीत पुरावा आजवर उपलब्ध नाही त्यामुळे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात कधी गेला हे सांगणे अनिश्चितच आहे.

मात्र सन 1646 ते 1647 च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ला सोबत हा राजगड किल्लाही जिंकून घेतला व हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी सुरू केले. इ.स. 1660 मध्ये औरंगजेबाच्या आज्ञे वरून शाहिस्तखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली.

शाहिस्त खानाने राजगडाकडे पाठवलेल्या सैन्यानी राजगडाच्या जवळपासची काही खेडेगावे जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड जिंकण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.

6 एप्रिल 1663 मध्ये शाहिस्त खानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. पुढे सन 1665 मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली व त्याने दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने किल्ले जिंकण्यासाठी पाठवले.

30 एप्रिल 1667 रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांच्या परत आक्रमणाने मुगलांना माघार घ्यावी लागली.

पुढे शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये तह झाला व या तहामध्ये 23 किल्ले जयसिंगला देण्याचे ठरले व शिवाजी महाराजांकडे 12 किल्ले राहिले या 12 किल्ल्यांमध्ये राजगड किल्ल्याचा समावेश होतो.

राजगड किल्ल्यावरील पाहाण्यासारखी ठिकाणे :

राजगड किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत त्यापैकी खालील प्रमाणे :

1. सुवेळा माची :

पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आहे. आणि तेथेच पुढे पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता हा बालेकिल्ल्याकडे जातो आणि एक रस्ता सुवेळा माची कडे जातो.

2. राजवाडा :

रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्या पासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना आहे.

3. गुंजवणे दरवाजा :

राजगडावर एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची रांग आहे यालाच गुंजवणे दरवाजा म्हणतात.

4. संजीवनी माची :

सुवेळा माचीच्या बांधणी नंतर शिवाजी महाराजांनी या संजीवनी माचीचे बांधकाम केले. या संजीवनी माचीवर घरांचे अवशेष आजही बघायला मिळतात.

5. बालेकिल्ला :

राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आहे आणि रुंद आहे.

याबरोबरच राजगड किल्ल्यावर कोटाचे चिलखन, गणेश देऊळ, आळू दरवाजा, दारूखाना, दिवाणघर, पागा, चिखलती बुरुज, मारुती देऊळ, ब्रह्मर्षि मंदिर, पाली दरवाजा, बालेकिल्ला दरवाजा, ढालकाठची जागा, दिंडी, चुनेगचा हौद अशी अनेक ठिकाणे बघायला मिळतात.

राजगडावर जाण्याचा मार्ग :

पुण्यापासून 45 किलो मीटरवर असलेला हा राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी एस.टी. बसेसची सेवा उपलब्ध आहे तसेच खाजगी वाहने सुद्धा आहेत.

वेल्हे या गावापासून 16 किलो मीटरवर राजगड किल्ला वसलेला आहे वेल्हे- राजगड या मार्गाने आपण किल्ल्यावर जाऊ शकतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment