रायगड किल्ल्याची माहिती । Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ल्याची माहिती । Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण किल्ला म्हणून आपली स्वतंत्र ओळख ठेवणारा आहे.

आज आपण याच रायगड किल्ल्याची माहिती बघणार आहोत.

चला तर मग बगूया काय आहे रायगड किल्ला माहिती.

रायगड किल्ल्याची माहिती । Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. रायगडाचे प्राचीन नाव हे ” रायरी ” असे होते. तर युरोपचे लोक या रायगड किल्ल्याला ” पूर्वेकडील जिब्राल्टर ” या नावाने ओळखत.

जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तेवढाच हा रायगड किल्लाही अजिंक्य व दुर्गम होता. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी रायगडास गडाचे स्वरूप नव्हते तो फक्त एक डोंगर होता. व त्या डोंगरास ” रासिवटा ” आणि ” ताणस ” अशी दोन नावे होती.

तर या रायगडाच्या डोंगराचा आकार, उंची आणि सभोवतालच्या दऱ्या यावरून त्या डोंगराला ” नंदादीप ” असे नाव पडले.

 • रायगड किल्ल्याची रचना :

रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगात असून या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट येवढी मोठी आहे.

तर रायगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ल्यांमध्ये मोडतो. या किल्ल्याची चढाई सोपी आहे तर किल्ल्याची सध्याची स्थिती ही बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. या रायगड किल्ल्याची स्थापना ही साधारणता सन इ.स. 1030 मध्ये झाली असावी.

रायगड किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहेत

 • रायगड किल्ल्याचा इतिहास :

मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक विशेषत ओळख आहे. रायगड हा किल्ला समुद्र सपाटी पासून 2700 फूट येवढ्या उंचीवर आहे तर या किल्ल्यावर जाण्यासाठी जवळ- जवळ 1400- 1450 पायऱ्या आहेत.

जवळीचा प्रमुख असलेला यशवंतराव मोरे हा जवळीहुन पळून रायगडावर जाऊन राहिले तेव्हा सन इ.स. 1656 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडस वेढा घातला व रायगड किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला.

कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून या किल्ल्याला आपल्या राज्याची राजधानी बनविले. सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होती. महाराजांचा राज्याभिषेक याच राजगड किल्ल्यावर झाला.

 • शिवराज्याभिषेक :

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक विलक्षणीय घटना आहे. शिवराज्याभिषेक हा रायगड किल्ल्याने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे.

19 मे 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवरायांच्या राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली. त्या आधी शिवरायांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले. व सुमारे 56 हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. रायगड किल्ल्या वर 6 जून 1674 ला ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596, शनिवारी शिवराज्याभिषेक साजरा झाला. व त्यानंतर 24 सप्टेंबर 1674 ललिता पंचमीला तांत्रिक पद्धतीने शिवाजी राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.

या राज्याभिषेकाच्या मागचा खरा हेतू म्हणजे जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता.

 • रायगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

रायगड किल्ल्याचे मराठा इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील काही महत्त्वाचे ठिकाणे ही खालील प्रमाणे :

 • 1. नाना दरवाजा :

नाना दरवाजास ” नाणे दरवाजा ” असेही म्हणतात. नाना याचा अर्थ लहान असा होतो. इ.स. 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आत आला होता.

 • 2. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा :

जिजाबाईंच्या उतरत्या वयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा मानवत नसे म्हणून महाराजांनी जिजाबाईंन साठी पाचाडजवळच हा वाडा बांधला.

 • 3. खुबलढा बुरुज :

रायगड चढताना एक बुरुजाचे ठिकाण दिसते त्यालाच खुबलढा बुरुज असे म्हणतात.

 • 4. महादरवाजा :

रायगडावर आतमध्ये गेल्यास बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत हाच तो महादरवाजा आहे. आणि या दरवाजावर असणाऱ्या कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ” श्री आणि सरस्वती नांदत आहे”. ” श्री आणि सरस्वती” म्हणजेच ” विद्या व लक्ष्मी”.

 • 5. चोरदिंडी :

महादरवाजापासून उजवी कडच्या बाजूस एक तटबंदी जाते. त्या तटबंदी वरुन चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे जवळ बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली दिसेल.

 • 6. हत्ती तलाव :

महादरवाजातून थोडे पुढे गेले असता एक तलाव दिसतो त्यालाच हत्ती तलाव म्हणतात.

अशाप्रकारे गडावर अनेक ठिकाणी आहेत जी पर्यटकांना पाहण्यासारखी आहेत त्यामध्ये पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, राज्यसभा, नगारखाना, बाजार पेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी , कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी अशा ठिकाणांचा समावेश होतो.

 • रायगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

पुणे पासून रायगड पर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाड मार्गे पाचाड गावातून रायगडावरच्या दोरीवाटेच्या तळातून पाचाड खिंडीत येते.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment