पुरंदर किल्ल्याची माहिती मराठी । Purandar Fort Information In Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर सहर्ष स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी भाषेतून मिळेल.
आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही ” पुरंदर किल्ल्याची माहिती “ घेऊन आलोत.
या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती वाचायला मिळेल.
पुरंदर किल्ल्याची माहिती मराठी । Purandar Fort Information In Marathi
” पुरंदर किल्ला ” हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील सासवड गावाजवळच्या परिसरात वसलेला किल्ला आहे. पुरंदरच्या या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे यामुळे या किल्ल्याला सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरंदर किल्ला तसा आकाराने खूप मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे.
पुरंदर किल्ल्याची रचना आणि स्थान :
पुरंदर किल्ल्याची उंची ही सुमारे 1500 मीटर असून हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा किल्ल्यांमध्ये मोडतो. पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगर रांगेत पुरंदर किल्ला आहे. ज्या डोंगर रांगेवर हा पुरंदर किल्ला आहे. त्याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड हे किल्ले वसलेले आहेत. पुरंदर किल्ल्याला चौफेर माच्या आहेत.
किल्ल्याचे स्थान 18.18 अंश अक्षांश व 74.33 अंश रेखांश वर स्थित आहे. पुरंदर किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला 20 किलो मीटरवर आहे आणि सासवडच्या नेऋत्य दिशेला 6 किलो मीटरवर आहे.
गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला 13- 14 किलो मीटरच्या अंतरावर सिंहगड आहे. तर पश्चिमेला 19- 20 किलो मीटरच्या अंतरावर राजगड आहे
पुरंदर किल्ल्याचा विस्तार मोठा आहे. किल्ला मजबूत आहे. पुरंदर किल्ल्याची एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत.
पुरंदर किल्ल्याचा इतिहास :
पुराणात या डोंगराचे उल्लेख ‘ इंद्रनील पर्वत ‘ कसा आहे. जेव्हा हनुमान द्रोणागिरी उचलून नेत होते त्यावेळी त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तो म्हणजे हाच पुरंदर किल्ल्याचा डोंगर.
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्र देवाचे स्थान बलाढ्य होते. तसाच हा पुरंदर किल्ला सुद्धा बलाढ्य आहे. बहामनीकाळात बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने हा पुरंदर ताब्यात घेतला. व पुढे इ.स. 1489 च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमदने हा पुरंदर किल्ला जिंकून घेतला.
व पुढे 1550 मध्ये तो आदिलशाहीत आला. व इ.स. 1649 मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना कैदेत घातले तेव्हा शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले.
त्यावेळी आदिलशहाने फत्तेखान शिवाजी महाराजांकडे रवाना केले. एकीकडे वडील आदिलशहाकडे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात आले त्यावेळी महाराजांनी या लढाईसाठी पुरंदर किल्ला नेमला.
व या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली व ही लढाई जिंकली. पहिल्याच लढाईत मोठे यश प्राप्त झाल्याने इ.स. 1655 मध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुरंदर किल्ल्याचा सरनौबत निवडले. पुढे 14 मे 1657 मध्ये संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
पुरंदर किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
पुरंदर किल्ल्यावर बरीच ठिकाणे आहेत जी पर्यटकांना बघण्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :
1. बिनी दरवाजा :
पुरंदर माचीवर जाण्यासाठी असलेला हा एकमेव दरवाजा म्हणजे बिनी दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा बिनी दरवाजा लागतो.
2. पुरंदरेश्वर मंदिर :
पुरंदरेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात इंद्र देवाची सव्वा ते दीड फुटापर्यंत ची मूर्ती बघायला मिळते.
3. रामेश्वर मंदिर :
पुरंदरेश्वर मंदिराच्या मागच्या कोपऱ्यात पेशवे वंशांचे हे रामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पेशव्यांचे खाजगी मंदिर आहे. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर दुमजी वाड्याचे अवशेष बघायला मिळतात.
4. दिल्ली दरवाजा :
हा दिल्ली दरवाजा हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे.
5. खन्दकडा :
दिल्ली दरवाजातून आत गेल्यास डावीकडे एक कडा थेट पूर्वी कडे गेलेला दिसतो आणि या कड्यालाच खन्दकडा आहे. या कड्याच्या शेवटी एक बुरुज आहे.
6. पद्मावती तळे :
मुरारबाजींच्या पुतळ्या पासून थोड पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
7. शेंदऱ्या बुरुज :
पद्मावती तळ्याच्या मागे आणि बालेकिल्ल्याच्या वायव्येस एक बुरुज आहे आणि त्यालाच शेंदऱ्या बुरूज आहे. याप्रमाणेच पुरंदरच्या किल्ल्यात केदारेश्वर दरवाजा / मंदिर, पुरंदर माची, भैरवगड, वीर मुरारबाजी यांसारखी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहे.
पुरंदर किल्ल्यावर जाण्याच्या वाटा :
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यता दोन वाटा आहेत.
1. पुण्याहून :
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्यापासुन 30 किलो मीटरच्या अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी जावे व तेथून पुढे सासवड ते नारायणपूर अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. या गावापासून थेट किल्ल्या पर्यंत जातो.
2. सासवडहून :
किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट जरा आडमार्गी आहे. सासवड पासून सासवड- भोर. अशी गाडी पकडावी व या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे ” पुरंदर घाटमाथा ” येथे उतरावे व येथून पुढे पुरंदर किल्ल्याला जाता येते.