प्रतापगड किल्ला विषयी माहिती । Pratapgad Fort Information in Marathi

प्रतापगड किल्ला विषयी माहिती । Pratapgad Fort Information in Marathi

प्रतापगड किल्ला विषयी माहिती । Pratapgad Fort Information in Marathi : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणजे हा प्रतापगड होय.

आज आपण याच ” प्रतापगड किल्ला विषयी माहिती ( Pratapgad Fort Information in Marathi ) ” बघणार आहोत.

चला तर मग बगूया ( Pratapgad Fort Information in Marathi ) विषयी  माहिती संपूर्ण सविस्तर माहिती.

प्रतापगड किल्ला विषयी माहिती । Pratapgad Fort Information in Marathi

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये वसलेला हा प्रतापगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे. जिंकल्या नंतर मोरी त्रिंवक पिंगळे यांना 1656 मध्ये हा प्रतापगड किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली.

असा हा शिवकालीन काळातील प्रतापगड किल्ला महाराष्ट्राचा इतिहासामध्ये महत्त्वाचा समजला जातो.

  • प्रतापगड किल्ल्याची रचना :

महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला हा किल्ला महाबळेश्वराच्या नैऋत्य दिशेस सुमारे 13 किलो मीटर वर आहे. व ह्या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारे 1,081 मीटर येवढी असून या किल्ल्याच्या दोन्ही बाजूस 200 ते 250 मीटर खोल दरी आहे.

प्रतापगड किल्ल्याचे मुख्यता दोन भाग पडतात एक म्हणजे मुख्यकिल्ला व दुसरा भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या दोन्ही भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चारही बाजूस भक्कम व मजबूत तटबंदी व बुरुज आहेत.

बालेकिल्ल्याची एकूण क्षेत्रफळ हे 3,660 चौरस मीटर तर मुख्य किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे 3,885 चौरस मीटर आहे. तर प्रतापगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूस 10 ते 15 मीटर उंचीचे बुरुज आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार या बुरुजांचे अवशेष आजही टिकून आहेत.

प्रतापगड किल्ला हा गिरिदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो तर या किल्ल्याची चढाई ही सोपी आहे व या किल्ल्याची सध्याची स्थिती ही व्यवस्थित आहे.

  • प्रतापगड किल्ल्याचा इतिहास :

असे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञे वरून मोरे त्रिंबक पिंगळे यांनी 1656 मध्ये प्रतापगड किल्ला बांधला. या किल्ल्याचे दोन भाग पडतात. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला. आणि या मुख्य किल्ल्या मध्ये शिवाजी महाराजांनी इ.स. 1661 मध्ये मोरे त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते तुळजा भवानी मंदिराची स्थापना केले होते.

इस 1659 मध्ये अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग आणि शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा केलेला वध यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

पुढे छत्रपती राजाराम सुद्धा जिंजीस जाताना प्रथम याच प्रतापगडावर आले. व पेशवाईत नाना फडणवीस येथे सखाराम बापूस काही दिवस नजर कैदेत ठेवले होत.

सन इ.स. 1778 च्या सुमारास नाना फडणवीसा विरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले. तेव्हा नाना फडणविसांनी 1796 मध्ये काही दिवस याच प्रतापगड किल्ल्यावर आश्रय घेतला होता. व पुढे 1818 च्या सुमारास इतर किल्ल्यां प्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

  • अफझलखानाचा वध :

प्रतापगड किल्ल्याचे नाव आजही आजरामर आहे त्यामागचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखानाचा वध. 10 डिसेंबर 1659 ला दुपारी 2 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला होता.

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाच्या भेटीस गेले तेव्हा अफझलखानाने मोठ्या आनंदाने छत्रपती शिवाजी राजांची गळाभेट केली. व छत्रपती शिवाजी राजांची मान अफझलखानाने आपल्या बगलेत घेऊन दाबली व कट्यार छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत घुसवली.

अफजल खानाची ही कपटी भावना महाराजांनी पहिलाच ओळखून आपल्या अंगात चिलखते घातली होती त्यामुळे अफझलखानाचा हा वार फुकट गेला व छत्रपती शिवाजी राजांनी मोठ्या शिताफीने आपली वाघनखे अफझलखानाच्या पोटात खुपसून अफजलखानाचा वध केला.

  • प्रतापगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

प्रतापगडावर पर्यटकांना पाहण्यासाठी विविध ठिकाणे आहेत त्यामध्ये अफझलखानाची कबर, भवानी मातेचा मंदिर, हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टी यांचा समावेश होतो.

तसेच प्रतापगडा पासून जवळ असलेल्या महाबळेश्वर मधील 23 पॉईंट बघण्यासारखी आहेत व पाचगणी येथील 1 पॉईंट पहावा. तसेच महाबळेश्वरातील मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची ओढ असते.

निसर्गाने नटलेल्या या प्रतापगड किल्ल्यावर आपण गेलो तर दोन दिवस मुक्काम करावा व निसर्गाने नटलेल्या या प्रतापगड किल्ल्यास एकदा तरी नक्कीच भेट द्यावी.

  • प्रतापगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

प्रतापगडावर जाण्यासाठी आपण पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांवरून जाऊ शकतो तर पुणे- महाबळेश्वर हे अंतर 120 किलो मीटर येवढे आहे. तर महाबळेश्वर पासून प्रतापगड अवघ्या 22 किलो मीटरच्या अंतरावर आहे. सातारा हे प्रतापगड पासूनचे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment