Poppy Seeds in Marathi | खसखस चे फायदे आणि नुकसान आणि खसखस बद्दल संपूर्ण माहिती

Poppy Seeds in Marathi | खसखस चे फायदे आणि नुकसान आणि खसखस बद्दल संपूर्ण माहिती 

आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे कित्येक पदांचा वापरात असतो ज्यांची आपल्या शरीराला खूप फायदे होत असतात परंतु त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते. खसखस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते गरम मसाला मध्ये खसखस चा वापर नेहमी केला जातो. या व्यतिरिक्त गोड खाद्यपदार्थांमध्ये देखील खास खास वापरले जाते.

आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील खसखस चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आजच्या लेखामध्ये आपण याच poppy सीड बद्दल माहिती पाहणार आहे. चला तर मग पाहूया, Poppy seeds in Marathi | खसखस चे फायदे आणि नुकसान

Poppy Seeds in Marathi | खसखस चे फायदे आणि नुकसान आणि खसखस बद्दल संपूर्ण माहिती

आपल्या स्वयंपाक घरामध्ये जवळजवळ सर्वात गरम मसाला जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी वापरले जातात. परंतु हे पदार्थ चव वाढवण्या शिवाय आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी देखील खूप फायद्याचे ठरतात. यातील बहुतांश मसाल्यांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. खसखस देखील याच मसाल्यांच्या प्रकारामध्ये मोडते.

खास खास एक तेलबियांचा प्रकार आहे. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून खसखस कडे पाहिले जाते. याव्यतिरिक्त खसखस हे प्रथिने आणि आहारातील फायबर तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसह काही आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्रोत आहेत.

खसखस आकाराने लहान, काळी आणि भुऱ्या रंगाची असते. ते हजारो वर्षांपासून पारंपारिक भूमध्यसागरीय आणि मध्य पूर्व आहाराचा भाग आहेत.
अलिकडच्या वर्षांत, खसखस युनायटेड स्टेट्समध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. लोक त्यांचा वापर बॅगल्स आणि मफिन्स सारख्या पाककृतींमध्ये करत आहेत तसेच कच्चे देखील खातात.

खसखस वनस्पतीपासून ज्या बिया येतात त्यांना खसखस असे म्हटले जाते. उत्पादक हेरॉईन, मॉर्फिन आणि ऑक्सिकोडोन यांसारखी ओपिओइड औषधे तयार करण्यासाठी खसखस ​​वनस्पतीच्या रसाचा वापर करतात. याचा अर्थ असा की खसखसच्या बियांमध्ये काहीवेळा कमी प्रमाणात ओपिएट संयुगे असू शकतात .
खसखसमध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबरचे प्रमाण देखील भरपूर आहे.

याव्यतिरिक्त त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅग्नीज हे घटक देखील आहेत. पोटाशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून खसखसचा वापर केला जाऊ शकतो. यातील पोषक घटकांमुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासातून सुटका मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खसखसचा आहारात समावेश केल्यास पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल. जाणून घेऊया खसखसचे अन्य आरोग्यदायी लाभ

खसखस बियाण्यांशी संबंधित सविस्तर आरोग्य फायदे आणि पौष्टिक माहितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी poppy seeds in Marathi लेखाचे वाचन सुरू ठेवा.

खसखस चे प्रकार Types of Poppy Seed in Marathi

खास खास चे सामान्यता तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

1. पांढरी खसखस

पांढरे खासकर चा वापर मुख्यता भारतामध्ये केला जातो तसेच गोड खाद्यपदार्थांमध्ये आणि मसाला म्हणून ही खसखस वापरली जाते. या खसखशीचा वापर स्वयंपाकामध्ये केल्याने त्याला एक विशिष्ट चव आणि सुगंध येतो.

2. ब्ल्यू खसखस

ही खसखस युरोपीअन पॉपी सीड्स या नावाने सुद्धा ओळखली जाते. ही सहसा बेकिंगमध्ये वापरली जाते.

३. ओरिएन्टल पॉपी सीड्स –

यातून ऑपीअमचे (एकप्रकारचे ड्रग) उत्पादन केले जाते.

खसखस मधील पौष्टिक तत्व :

100 ग्राम कच्च्या खसखस च्या बियांमध्ये पुढील प्रमाणे पौष्टिक तत्व असतात.

 

ऊर्जा – 536 कॅलरीज
प्रथिने – 21.43 ग्रॅम
एकूण लिपिड ( चरबी ) – 39.29 ग्रॅम
कार्बोहायड्रेट – 28.57 ग्रॅम
फायबर – 25 ग्रॅम
साखर – 3.57 ग्रॅम
कॅल्शियम – 1,250 मिलीग्राम (मिग्रॅ)
लोह – 9.64 मिग्रॅ
मॅग्नेशियम – 357 मिग्रॅ
जस्त- 8.04 मिग्रॅ
सोडियम
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन ए
फॅटी ऍसिडस्
कोलेस्टेरॉल

खसखस चे फायदे Benefits of Poppy Seed in Marathi :

खसखस च्या बियां मध्ये आढळून येणारे अनेक पौष्टिक तत्व आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात. त्यामुळे खसखसचे आरोग्यासाठी खूप फायदे (benefits of Poppy seed in Marathi) आहे ते पुढील प्रमाणे-

1. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी खसखस चे फायदे

अलीकडच्या काळामध्ये मधुमेह हे खूप वेगाने वाढत चाललेली समस्या आहेत. परंतु टाईप टू मधुमेहासाठी खसखस खूप गुणकारी ठरते. परंतु खसखस सेवन करण्यापूर्वी मधुमेह आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य द्यावा.

2. प्रथीने ची कमतरता असणाऱ्यांसाठी खसखस फायदेशीर

खसखस ला प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हटले जाते. कारण प्रत्येकी तीन चमचे खसखस मध्ये सहा ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे जर तुम्हाला प्रतिनिधींची कमतरता भासत असे असं का बाहेर येल तर तुम्ही नेहमी खसखस खाल्ल्या तुमच्या शरीरातील प्रथिनांची मात्रा भरून येते.

3. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खसखस चे फायदे

खसखस मध्ये झिंक हे खानिज अधिक प्रमाणात आढळते रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी झिंक खूप फायद्याचे ठरते. याव्यतिरिक्त सर्दी, खोकला, ताप सारखे विकार दूर करण्यासाठी झिंक खनिजाचा वापर केला जातो त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खास खास खाल्ली जाते या व्यतिरिक्त सर्दी खोकला ताप यांसारखे विकार देखील कमी होण्यासाठी खसखस चा कमी होण्यास फायदा होतो.

4. मुतखड्यावर खसखस घरगुती उपाय

खसखस मध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात आढळते. मुतखड्यावर पोटॅशियम खूप फायद्याचे ठरते त्यामुळे मुतखडा विरघळावा व लघवीवाटे शरिराच्या बाहेर पडावा यासाठी खसखस चे सेवन केले जाते.

5. हाडे मजबूत बनण्यासाठी खसखस फायदेशीर

खसखस च्या बिया मध्ये कॅल्शियम आणि जास्त चे प्रमाण अधिक असते त्यामुळे हाडे मजबूत बनविण्यासाठी खसखस खूप फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त खसखस मध्ये फास्फोरस देखील असते त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि हाडांची मात्रा वाढवण्यासाठी खसखस अतिशय फायदेशीर ठरते.

6. पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी खसखस चे फायदे

खसखस मध्ये फायबरचे प्रमाण विपुल प्रमाणात आढळते आणि आपली पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी फायबर खूप फायद्याची ठरते. जीभ किंवा तोंड येणे यासारखे समस्या देखील अपचनामुळे होता त्यामुळे खसखस त्याचे सेवन केल्यास या संबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळतो.

7. थायराॅइडचे निदान करण्यासाठी खसखस फायदेशीर

खसखस मध्ये .सेलेनियमचे प्रमाण देखील अधिक असते . सेलेनियम थायरॉईड चे निदान करण्यासाठी फायद्याचे ठरते. त्यामुळे नियमितपणे खसखसचे सेवन केल्यास
थायरॉईडच्या समस्यावर मात मिळविता येते.

8. ह्रदयाच्या आरोग्या साठी खसखस फायदेशीर

खसखस मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण विपुल प्रमाणात असल्याचे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्याप्रमाणेच खसखस याचे नियमित सेवन केल्यास शरीरात गुड कोलेस्ट्रॉल पातळी वाढते ओळख खराब कोलेस्टेरॉल ची पातळी कमी होते.

9. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खसखस चे फायदे

ओलेईक ऍसिड’ हे खसखशीत असणारे घटक आपल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा किंवा ‘लो ब्लड प्रेशरचा’ त्रास आहे त्यांनी आहारात खसखशीचा योग्य प्रमाणात समावेश केला तर वाढलेला रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते.
तसेच जर रक्तदाब खूप कमी असेल तर तो नियंत्रणात आणण्यास मदत होते.

10. महिलांची प्रजोत्पादन क्षमता वाढवण्यासाठी खसखसचे फायदे

खसखशीच्या बियांमधून काढलेले तेल, हे ज्या बायकांना गर्भधारणा करायला काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर असते.
अशा महिलांनी रोज थोड्या प्रमाणात खसखस खाल्ली तर त्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढते.

बायकांचे अंडाशय आणि गर्भपिशवी याला जोडणारी जी ट्यूब (फॅलोपीअन ट्यूब) असते त्यामध्ये कधी कधी काही पेशी अडकून बसतात ज्यामुळे अंडाशयातून स्त्रीबीज गर्भपिशवीत येऊ शकत नाही.

खसखशीमुळे या ट्यूबमध्ये अडकलेल्या अतिरिक्त पेशी विरघळून जातत् ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

चांगली खसखस कशी निवडावी आणि कशा प्रकारे साठवून ठेवावे

ताजे संपूर्ण किंवा ग्राउंड खसखस ​​किराणा दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते. बियांमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते ऑक्सिडेशनला असुरक्षित बनवतात आणि रॅसीड होतात. त्यामुळे चांगल्या प्रतीचे संपूर्ण ताजे बियाणे अस्सल दुकानातून खरेदी करा.

खसखसच्या बिया थंड, कोरड्या, गडद ठिकाणी, हवाबंद डब्यात ठेवा जेथे ते सहा महिन्यांपर्यंत ताजे राहतील.

खस खस चे नुकसान :

व्यक्तीला खसखस खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते त्यामुळे एखाद्या व्यक्तीने खसखस चे सेवन केल्यास अलर्जी उत्पादन स्थानिक त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
खसखस चे सेवन घेतल्यास ते शक्यतो सुरक्षित असते. 35-250 ग्रॅम खसखस ​​असलेले एक पेय किंवा दही सुरक्षितपणे वापरले गेले आहे.

खसखस चहा पिणे शक्यतो असुरक्षित आहे . खसखसचा चहा पाण्यात खसखस ​​भिजवून बनवला जातो. खसखसच्या बाहेरील पृष्ठभागावर मॉर्फिन आणि इतर ओपिएट्स असू शकतात . चहा बनवण्यासाठी खसखस ​​पाण्यात भिजवल्यास मॉर्फिन आणि इतर अफू पाण्यात शिरू शकतात. हे पाणी प्यायल्याने साइड इफेक्ट्स किंवा अफूच्या प्रमाणामुळे मृत्यू होऊ शकतो .

खूप मोठ्या प्रमाणात खसखस ​​खाणे देखील शक्यतो असुरक्षित आहे . खूप जास्त प्रमाणात खसखस ​​खाल्ल्याने आतड्यांमध्ये अडथळा येऊ शकतो. पण हे फारच असामान्य आहे.

( सूचना : Poppy Seeds in Marathi | खसखस चे फायदे आणि नुकसान या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा. )

तर मित्रांनो ! ” Poppy Seeds in Marathi | खसखस चे फायदे आणि नुकसान “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment