जगातील पेट्रोल संपले तर मराठी निबंध । Petrol Sample tar Essay in Marathi

जगातील पेट्रोल संपले तर मराठी निबंध । Petrol Sample tar Essay in Marathi

 

नमस्कार मित्रांनो आपले Marathi Mitra या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

जगातील पेट्रोल संपले तर मराठी निबंध । Petrol Sample tar Essay in Marathi

आजच्या काळामध्ये अनेक चैनीच्या वस्तू या जीवनावश्यक वस्तू बनत चालले आहेत. अशाच प्रकारचा एक भौतिक सुखाचा दिवा म्हणजे पेट्रोल होय. आजच्या काळामध्ये पेट्रोल लाल अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या पेट्रोलच्या जोरावरच येथे विविध प्रकारचे वाहन चालवताना पाहायला मिळतात.

आज आलेली जीवनाची प्रगती एक प्रकारे पेट्रोलच वरदान ठरात आहे. या पेट्रोल मुळेचा आपण काही तासांमध्येच एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे आजचे युग हे पेट्रोलचे युग मांनणे चुकीचे ठरत नाही.

निसर्गाकडे अनेक गोष्टींचा खजिना आहे असे मानले जाते. त्यातील एक खजिना म्हणजे पेट्रोल होय. पेट्रोल मुळे आजच्याय जगाला वेग प्राप्त झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जगच बदलले. आजच्या आधुनिक जगाने खूपच प्रगती केली आहे, असे मानले जाते. या प्रगतीतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पेट्रोल आहे.

निसर्गाच्या पोटामध्ये आणि एक वस्तू सापडतात. त्यातील एक वस्तू म्हणजे पेट्रोल आहे. या निसर्गाच्या पोटातून पेट्रोल सारखे तेल सापडले. आणि आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पेट्रोलचा सर्रास वापर करतो.

जगामध्ये लोकसंख्या पेक्षा वाहनांची संख्या जास्त पाहायला मिळेल तर ते घरामध्ये एक तरी वाहन आपल्याला पाहायला मिळेल. या वाहनांना चालण्यासाठी गरज असतेअसते ती म्हणजे पेट्रोलची. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, पाणी आणि निवारा ह्या मांनल्या जातात परंतु आजच्या काळामध्ये या गरजांसोबत पेट्रोल देखील जोडले जात आहे.

पेट्रोल आपल्या दैनंदित जीवनाचा प्रवाह मांनला जातो. पेट्रोलच्या वाढत्या गरज अमन पेट्रोलचे दर हे नेहमी कधी पेट्रोल 100 लरा पर्यंत पोहोचते तर कधी त्यापेक्षा अधिक दरात विकले जाते.

तरी सुद्धा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशाचा विचार न करता पेट्रोल खरेदी करतो. यावरून आपल्याला कळते की, आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पृथ्वीवर सूर्याचे विविध स्त्रोत पहायला मिळतात त्यातील काही स्त्रोत हे

सामान्य आहेत तर काही स्त्रोत हे असामान्य आहेत. पारंपारिक स्त्रोतांमध्ये कोळसा, डिझेल, पेट्रोल आणि विविध खनिज तेलांचा समावेश होतो तर हवा, प्रकाश आणि बायोगॅस पेट्रोलियम हे ऊर्जेचा लहरी स्त्रोत आहेत. परंतु यातील सर्वात मुख्य आणि महत्त्वाचे खनिज म्हणजे पेट्रोल आणि डिझेल आहे कारण यांच्या जोरावर आज आपली वाहने चालत आहेत.

या पेट्रोल आणि डिझेल सेवा आपली वाहने चालवणे अशक्यच आहे. मनुष्य खूप काळापासून इंधनांचा वापर करीत आहे. पेट्रोल जरी पारंपारिक स्त्रोत असले तरी त्याची मर्यादाही कधी ना कधी संपणार आहे.

मग आपल्या आजचे संपूर्ण जीवन हे पेट्रोल अवलंबून आहे अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल संपले तर… आपले काय होईल याचा विचार कोणी करत नाही. खरंच! पेट्रोल संपले तर काय होईल? जी वाहने आपली गरज बनली आहे ती धावणार कशी? पेट्रोल संपले तर याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होईल….

आपण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणार कसे? पेट्रोल संपले तर आपले जीवन जगणे कठीण होईल. आपल्याला माहिती आहे की माणुस कीती  स्वार्थी आहे तो आपल्या स्वर्थापोटी कोणाचाही विचार करत नाही त्यामुळे आजचा माणूस पत्ता आजचा चा विचार करतो. येणाऱ्या भविष्याचा विचार तो करत नाही त्यामुळे पेट्रोल ही निसर्गाने दिलेली देणगी याचा वापर किती मर्यादित करायला पाहिजे याचा विचार कोणीही करत नाही.

जर अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल संपले तर आपली सर्व दळणवळणाची साधने ठप्प होतील. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी  आपल्याला कुठलीही साधने उपलब्ध राहणार नाहीत.

थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण आजच्या आधुनिक काळामध्ये प्राचीन काळ जगू. पेट्रोल विना सर्व जग जाग्यावर थांबेल. दळणवळणासाठी आपल्याला प्राचीन काळामध्ये वापरला जाणारा साधनांचा म्हणजे बैलगाडी, घोड, हात्ती, गाढव प्राण्यांचा वापर करावा लागेल.

परंतु याच मानवाने जंगल तोड करून या प्राण्यांच्या संख्यांवर ही बंधन घातले आहेत असे वन्य प्राणी आपल्याला पाहायला मिळत नाही हे प्राणी न मिळाल्यामुळे दळणवळणाची सोय करण्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे पायी चालणे.

आणि आजच्या या प्रगतीच्या काळामध्ये माणूस इतका आळशी झाला आहे की, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरासे अंतर असले तरी तो वाहनांचा वापर करतो. या  परिस्थितीमध्ये चालत जाणे माणसाकडून शक्य होईल का?

त्यामुळे जर पेट्रोल संपले तर माणसाचे जीवन जगणे अशक्य होईल. जर अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असेल तर पेट्रोलचा योग्य आणि मर्यादित वापर करणे आपल्यासाठी गरजेचे आहे.

तेवढेच नाही जर पेट्रोल संपल्यानंतर आपली आर्थिक स्थिती सुद्धा मंदावेल. कारण आपल्या देशातून बाहेर देशासाठी केमाल निर्यात केला जातो तो या वाहनांच्या माध्यमातून केला जातो. मग पेट्रोल संपले तर आपल्या देशातील मग बाहेर देशांमध्ये निर्यात करणे शक्य होईल का? मुळीच नाही!

म्हणता काय एका नाण्याच्या दोन बाजू असतात पेट्रोल संपले तर बरेच नुकसान होईल त्यासोबत आपले फायदे सुद्धा होतील. फायदा म्हणजे आपल्या वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे.

वाहनातून निघणारा घातक वायू मुळे संपूर्ण पर्यावरण दूषित होत आहे. अशा परिस्थिती मध्ये पेट्रोल संपले तर सर्व वाहने बंद होतील आणि याचा फायदा म्हणजे वातावरण आणि  पर्यावरण सुरक्षित होईल. त्यामुळे पेट्रोल हे आपल्यासाठी किती महत्वाच्या आहे किंवा नाही हे ठरवणे प्रत्येकाचे  कर्तव्य आहे.

तर मित्रांनो ! ” जगातील पेट्रोल संपले तर मराठी निबंध । Petrol Sample tar Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

 ” जगातील पेट्रोल संपले तर मराठी निबंध । Petrol Sample tar Essay in Marathi “ या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करा नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment