पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा । Payakhalache Gavat Bolu Lagale Tar

पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा । Payakhalache Gavat Bolu Lagale Tar

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट वर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा । Payakhalache Gavat Bolu Lagale Tar

नेहमी प्रमाणेच मी आजही सकाळी फिरण्यासाठी बागेत गेलो होतो. फिरत असताना मी पायातील चपला काढून ठेवल्या आणि मैदानावर असलेल्या हिरव्यागार गवतावर माझी नजर गेली. आणि त्या गवता वरून फिरण्याची माझी इच्छा झाली.

त्याप्रमाणे मी त्या हिरव्या गवतावर चालायला सुरुवात केली. गवताचा तो स्पर्श मला अगदी हवाहवासा वाटला. तेवढ्यातच गवतावर कोणीतरी जोरात पाय घासले व बागेतील पसरलेले ते गवत तुटू लागले.

व अचानक माझ्या कानावर एक आवाज आला, ” आहो, बागेत आला आहात ना ? हळुवार पावले टाका. तुमच्या पायांखाली आम्ही पसरलो आहोत ना ?”

अहो, इथे पहा ! इथे !

मी गवत बोलतोय !

बागेत फिरायला येणारे तुम्ही सर्वजण रोज येथे येता. आमचे हिरवेगार रूप पाहून आनंदित होता. तुमच्या पैकी काही जण आम्हाला पाणी घालतेत. आमची काळजी घेतेत ते पाहून आम्हाला खूप बरे वाटते.

पण तुमच्यातील काहीजण आम्हाला रोज पायाखाली तुडवितात. आमच्यावर पाय घासतात. काही वेळा तर आम्हाला मुळां पासून तोडतात सुद्धा मला खूप दुखावतो.

तुमच्या पायाच्या वजनामुळे काही वेळा आम्ही तुटून पडतो. आमचे हिरवेगार रुप नष्ट होते व आम्ही वाळायला लागतो. आमच्या अंगावरील रंगीबेरंगी फुले चूरगळतात. तसेच लहान- लहान कीटक आमच्या अंगावर सुखाने राहत असतात. पण तुमच्यातील काही निष्काळजी लोकांमुळे ते कीटक चिरडले जातात.

आमच्या सुंदर हिरव्यागार रंगाचा आणि रंगीबेरंगी फुलांचा आनंद घेतल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख कमी वाटून तुम्हाला आनंद वाटेल आणि तुम्हाला आनंदी पाहून आम्हा गवतांनाही बरं वाटेल.

आम्ही इवलेशे दिसणारे गवत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतो.

मित्रांनो ! आम्ही क्रिकेटच्या मैदानावर पसरलेलो असतो. खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून काळजी घेतो. ते हिरवेगार मैदान तुम्हाला आवडत असेल ;

होय ना !

तसेच आम्ही जमिनीचा ओलावा टिकवून ठेवतो. त्यामुळे जमिनीची धूप थांबते. जमिनीवर असलेल्या अनेक सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी आम्हीच आधार देतो.

शाकाहारी प्राण्यांची भूक भागवतो आणि संपूर्ण परिसराला सौंदर्य बहाल करतो. म्हणून आम्हाला संभाळणे हे तुम्हा सर्वांचे कर्तव्य आहे ! येवढे बोलून तो आवाज नाहीसा झाला व मला माझी चूक कळाली. इवल्याशा कोवळ्या गवतांना आपल्यामुळे इजा होते. परंतु हे गवत आपल्याला विविध प्रकारे मदत करते.

त्यामुळे आजपासून मी या गवतांना जराही इजा होऊ देणार नाही उलट त्यांचे संगोपन करेल हे मात्र नक्कीच !


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment