पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Nibandh in Marathi

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध आणि बंद वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Nibandh in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Nibandh in Marathi

पावसाळ्याचे दिवस होते. खूप जोराचा पाऊस पडत होता आणि मी नेहमी प्रमाणे शाळेला जाण्यासाठी तयार झालो होतो. घरी नेहमी प्रमाणे सकाळच्या बातम्या सुरु होत्या आणि बातम्यात सांगितले की आज खूप जोराचा पाऊस असल्याने शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

ही बातमी ऐकून मी आनंदाने नाचू लागलो. पण टीव्हीवर बातम्या चालूच होत्या त्यात सांगितले जात होते की, मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी आले आहे, त्यामुळे सर्व वाहतूक थप्प झाली आहे. या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. हे सर्व दृश्य पाहून मी थक्क झालो. आणि तेवढ्यात माझ्या मनात एका कल्पनेने जन्म घेतला की, ” पाऊस पडला नाही तर ” किती बरे होईल ना. !

पाऊस पडला नाही तर लोकांना पावसामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. वाहतूक ही थप्प होणार नाही आणि पिकांचेही नुकसान होणार नाही, ना कुणाच्या घरात पावसाचे पाणी शिरणार नाही. सगळे आनंदाने राहतील. पण नंतर माझ्या मनात दुसरा ही विचार आला. खरोखरच ! हा पाऊस पडला नाही तर… ?

आपण सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याला अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टींची गरज आहे. मग पाऊस पडला नाही तर पाणी कोठून येणार ? मग पाणी नसेल तर शेतात पिकी कसे येणार ? मग आपल्याला खाण्यासाठी अन्न, घालण्यासाठी वस्त्र आणि राहण्यासाठी निवारा कसा मिळणार ? पाऊस नसेल तर आपल्याला पाणी कसे मिळेल. जर पाऊस पडला नाही तर नदी, नाले, तलाव राहणारच नाही.

पावसाचे पाणी नाही तर नदी आणि तलावांमध्ये राहणारे जीव जगूच शकणार नाही. आपल्या आजू- बाजूला असलेली हिरवळ ही पाण्यामुळेच दिसते. पण जर पाऊस पडला नाही तर निसर्गाचे सर्व हिरवळ नष्ट होईल. झाडे वाळायला लागतील.

जर झाडे वाळली तर आपल्याला ऑक्सिजन कोठून मिळणार, खायला फळे, सावली कशी मिळणार. पावसाच्या पाण्याविना सर्व झाडे सुकून जातील वाढतील त्यामुळे सुंदर दिसणाऱ्या या निसर्गाचे रूपांतर एका दगड धोंड्याच्या वाळवंटा मध्ये होईल.

आपला भारत देश हा कृषि प्रधान देश आहे. आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात अन्न- धान्याचे उत्पादन होते. हे धान्य पिकते ते ह्या पावसाच्याच पाण्यावर मग हा पाऊस पडला नाही तर सर्व शेतातील पिक जळून जाईल.

सर्व शेतींचे रूपांतर वाळलेल्या वाळवंटा मध्ये होईल. त्यामुळे आपली आर्थिक व्यवस्था ढासळेल व महागाई, बेरोजगारी अशा संकटांना सामोरे जावे लागेल.

तसेच लहान मुलांना पावसात भिजण्याची मज्जा अनुभवता येणार नाही. पावसाने मातीला येणारा सुगंध मिळणार नाही. पाउस पडून गेल्याने आभाळात येणारा इंद्रधनुष्य बघायला मिळणार नाही.

पावसाळा आलाच नाही तर पावसात वापरल्या जाणाऱ्या छत्री कधीच बघायला मिळणार नाही. श्रावणात पाऊस सुरू होताच ऐकायला येणारा कोकिळेचा मधुर आवाज कधीच कानावर पडणार नाही. जर का पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर जीवन जगणे शक्यच होणार नाही.

पाऊस नाही म्हणजे पृथ्वी वरील तापमान वाढीत भरमसाठ वाढ होणार. तापमान वाढल्याने उष्णता पसरणार कडाक्याचे ऊन पसरणार मग घराच्या बाहेर निघणे सुद्धा अशक्य होईल. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला अश्या प्रकारच्या बऱ्याचश्या समस्यांतून जावे लागेल.

पाऊस पडल्याने नुकसान होते हे खरे आहे पण पाऊस पडल्याने मिळणारे पाणी हे आपले जीवन आहे. आपण पाऊस पडल्याने होणाऱ्या नुकसानामुळे रडतो पण या नुकसानामध्ये आपलीच चूक आहे. कारण सगळीकडे सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. त्यामुळे जमिनीला पाणी शोषता येत नाही. शहरांमध्ये पावसाच्या पाण्याला नीट वाहता येत नाही म्हणून पावसामुळे आपले नुकसान होते.

पावसामुळे कितीही नुकसान झाले तरी सुद्धा पाऊस आहे तर आपले जीवन आहे. म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment