पैनगंगा अभयारण्य माहिती मराठी । Painganga Abhayaranya Information In Marathi
महाराष्ट्र राज्यातील पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले हे पैनगंगा अभयारण्य आहे.
विविध वन्य जीवनाचे संरक्षण करण्यासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
आज पण याच पैनगंगा अभयारण्याची माहिती ( Painganga Abhayaranya Information In Marathi ) जाणून घेणार आहोत.
चला तर मग बघुयात पैनगंगा अभयारण्य माहिती.
पैनगंगा अभयारण्य माहिती मराठी । Painganga Abhayaranya Information In Marathi
Table of Contents
पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा ह्या दोन विभागांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूस असलेला संरक्षित वनास दिलेले नाव आहे.
तीन बाजूंनी पाणी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पैनगंगा अभयारण्याची स्थापना ही 1 जानेवारी 1916 रोजी झाली. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 325 चौरस किलोमीटर आहे.
पैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. पैनगंगेच्या उजव्या तीराला कयाधू ही एकमेव नदी मिळते. तर डाव्या तीराला पुस, आरना, अडाण वाघाडी आणि खुनी या नद्या मिळतात.
जलाशयाने परिपूर्ण असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर घनदाट पैनगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आढळते. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभलेली आहे.
पैनगंगा नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आहे आणि किनवट अभयारण्य आहे. किनवट अभयारण्य हे सुद्धा पैनगंगा नदीच्याच खोऱ्यात आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ हे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांना मिळून 219 चौरस किलोमीटर येवढे आहे.
या अभयारण्यात शुष्क पानझडी वनस्पती आढळतात. त्यात मुख्यता साग, सलई, सावर इत्यादी वृक्ष आहेत. वाघ, बिबटे, अस्वल, सांबर हे वन्य पशु या किनवट जंगलात आढळतात. आणि इतर पक्षी जीवनही आहे. पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेश द्वारा जवळ खरबी या गावी वन खात्याचे विश्राम गृह आहे.
-
पैनगंगा अभयारण्यातील जैवविविधता :
तिन्ही बाजूंनी पाण्याने व्यापलेले हे पैनगंगेचे अभयारण्य आहे. घनदाट जंगलामुळे ह्या अभयारण्यात आपल्याला जैवविविधता बघायला मिळेल.
पैनगंगा या अभयारण्यातील वने, दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पर्णगळी वने या प्रकारात मोडतात. या अभयारण्याच्या निसर्गमय वातावरणात पैनगंगा नदीवर एक नैसर्गिक डोह आहे. त्याला ‘ सहस्त्रकुंड ‘ म्हणून ओळखले जाते.
1000 ते 1500 मिलि मीटर पर्जन्यमान आणि आजू बाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या पैनगंगा अभयारण्य परिसरात साग, आर्जुन, आवळा, ऐन, कदंब, मोहा, गुळवेल, चारोळी, तिवसा, चिंच, धामण वेल, धावडा, मोईन, बेहडा, साजड, हलदू, सूर्या इत्यादी वृक्ष आढळतात.
पैनगंगा अभयारण्यात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या सुमारे 200 जाती आहे.
-
पैनगंगा अभयारण्यातील प्राणी जीवन :
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अभयारण्या पैकी पैनगंगा हे एक अभयारण्य आहे. घनदाट जंगल आणि आजू बाजूला असलेल्या जलाशया मुळे या अभयारण्यात प्राणी जीवन सर्वाधिक आहे.
या अभयारण्यात कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल यांसारख्या गवताच्या जाती उगवत असल्याने येथे अस्वल, खवले मांजर, कोल्हा, चिंकारा, चितळ, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, हरीण, रान मांजर, चौसिंगा हे तृणभक्षी वन्य प्राणी या अभयारण्यात मोठ्या संख्येने आढळतात. अशा लहान प्राण्यांवर आपली उपजीविका करणारे बिबट्या, रानकुत्रे हे प्राणी सुद्धा या पैनगंगा अभयारण्यात आढळतात.
तसेच, या अभयारण्यात सापांच्या विविध जाती व प्रजाती आढळतात. त्यात अजगर, घोणस, धामण, फुरसे, घोरपड आणि लाल तोंडाचा साप या अभयारण्यात बघायला मिळतो.
प्राण्यांच्या विविध जातींसोबतच पैनगंगा अभयारण्यात अनेक पक्षी सुद्धा बघायला मिळतात. जकाना, पाणकावळा, पाणपिपुली, अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कुट, हळदी कुंकू ( सॉफ्टबिल बदक ), कोतवाल, पारवा, भोरी, शिक्रा, गरुड आणि हेरॉन इत्यादी पक्षी पैनगंगा अभयारण्यात आढळतात.
-
पैनगंगा अभयारण्यात कसे जावे :
पैनगंगा हे अभयारण्य यवतमाळ पासून ते 150 किलो मीटरवर आहे. यवतमाळ- उमरखेड मार्गी किंवा यवतमाळ- महागाव- ढाणकी- बिटरगाव या मार्गी आपण पैनगंगा अभयारण्यास पोहोचू शकतो. दोन्ही मार्गावर आपल्या एस.टी. बसचा प्रवास करावा लागतो.
उमरखेड किंवा ढाणकी, बिटरगाव पासून पैनगंगा अभयारण्यास येण्यासाठी खाजगी वाहने आणि ऑटो रिक्षा ची सेवा उपलब्ध आहे.
-
पैनगंगा अभयारण्यातील पर्यटन :
पैनगंगा अभयारण्यात भेट देण्यास जुलै ते ऑक्टोबर महिन्याचा काळ अगदी योग्य आहे. कारण या महिन्यात या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यास अधिक आनंद वाटतो. पायाखालची माती उडवत चालताना गळणाऱ्या पाना मधून किंवा पानांवर पाय टाकून चालताना एक वेगळेपणा जाणवतो.
श्यामा कोलमची टेकडी, दोधसि धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, सहस्त्रकुंड धबधबा, एक शिवालय अशी अनेक ठिकाणे येथे पर्यटकांना पाहण्या सारखी आहेत.
आणि दरवर्षी अनेक पर्यटक पैनगंगा अभयारण्यात पर्यटना साठी येतात.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- रायगड किल्ल्याची माहिती
- मुरुड जंजिरा किल्ला माहिती मराठी
- जायकवाडी पक्षी अभयारण्य मराठी माहिती
- शिवनेरी किल्ल्याची माहिती
- कर्नाळा किल्ल्याची माहिती