ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi

ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले डॉट डॉट या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi

ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध :

ह्या जगामध्ये ज्ञाना इतके सुंदर आणि पवित्र असे दुसरी कुठलीही गोष्ट नाही. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की, वाटल्याने कमी होत नाही उलट वाढते. माणसाला असं  पवित्र ज्ञान विविध माध्यमातून मिळते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे ग्रंथालय किंवा वाचनालय हे आहे.

आजच्या अजून एक जग हे बदलत आहे हे विसरून चालणार नाही. तरीसुद्धा या जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत ज्या आजही वाचनालय किंवा ग्रंथालयाला देवालय समजून त्याची पूजा करतात.

खरंतर! आजच्या काळाला वाचनालयाची खूप आवश्यकता आहे.  कारण आज ची आधुनिक पिढी है वाचनालय आणि ग्रंथालय यासारख्य गोष्टींना विसरत चालली आहे.

दररोज हजारो पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे सोपे नाही. ज्या व्यक्तींना वाचनाची आवड आहे आणि त्यांच्याजवळ पुस्तके  खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत अशा व्यक्तींसाठी ग्रंथालय खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

दरमहा शंभर रुपये शुल्क भरून आपण ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचा लाभ घेऊ शकतो. जगातील सर्व साहित्य, कला, विज्ञान, तर्कशास्त्र आणि धोरण इत्यादी ज्ञानाचे अपार भांडार आपल्याला एकाच ठिकाणी वाचायला मिळते ते म्हणजे वाचनालय म्हणून वाचनालयाला  देवालय म्हणतात.

वाचनालय हे एकमेव असे भांडार आहे ज्या ठिकाणी जगातील सर्व ज्ञानाचे पूर्ती केली जाते. वाचनालय मध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती काही ना काही ज्ञान घेऊनच बाहेर जातो. वाचनालयातून केवळ ज्ञानच न देता एक सुसंस्कृत ज्ञान दिले जाते. जीवनाच्या वाटेवर पावलोपावली ज्या समस्या येतात त्या समस्यांना तोंड देण्याचे धाडस वाचनालयातील विज्ञानामुळे प्राप्त होते.

चांगल्या वाचनालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्यास कोणत्याही विषयावर जास्तीत जास्त ज्ञान देणे होय. तसेच या विषयावर विविध सामग्री उपलब्ध करून देणे. या कारणामुळेच वाचनालय देवालय समजले जाते कारण, आपण आपल्या मनातल्या सर्व  इच्छा आपण देवापाशी व्यक्त करतो. तसेच एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचनालयातून त्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच वाचनालय आजचे दिवाले म्हटले जाते.

वेळेच्या चांगला वापर करण्यासाठी वाचनालय खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पत्ते, सिनेमा किंवा इतर कामासाठी वेळ घालवण्यापेक्षा वाचनालयातील कालिदास, सूरदास, तुळसिदास, सेक्सपियर इत्यादी कवितांचा आस्वाद घेतल्यास त्यातून वेगळाच आनंद प्राप्त होतो तसेच ज्ञान वाढण्यास सुद्धा मदत होते.

एवढाच नसून वाचनालयामध्ये विविध महापुरुषांचे चरित्र  पुस्तके असतात  यातून आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांची माहिती मिळते.

तसेच दररोज वर्तमानपत्र, मासिके वाचून आपण आपले सामाजिक ज्ञान पाठवू शकतो. जीवन अमर करणारे उत्तम ग्रंथ आपण सहजरित्या वाचनालयामध्ये बसून वाचू शकतो.

खरेतर! ग्रंथालयाचे बौद्धिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. गावोगाव फिरून विविध पुस्तकांचे वितरण करणारे चालते फिरते ग्रंथालय ग्राम सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत.

ग्रंथालय एक आदर्श आहे. ग्रंथालयातील पुस्तकांमुळे विविध लोकांचे जीवन यशस्वी होण्यासाठी महत्वाचे योगदान ठरत आहे. गरीब मुला मुलांनी तर ग्रंथालयातील पुस्तके वाचून आपले जीवन यशस्वी केले आहे त्यामुळे ग्रंथालयातील पुस्तकांचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी ग्रंथालय सभासद फी खूप कमी असली पाहिजे.

ग्रंथालय मध्ये सर्व ज्ञान विज्ञान यांच्या संबंधित पुस्तकांचा संग्रह असला पाहिजे. आपल्या देशातील बऱ्याच ग्रंथालयांमध्ये फार प्राचीन काळा पूर्वीची पुस्तके खूप वाईट अवस्थेमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे ग्रंथालयातील सभासदांनी या पुस्तकांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ग्रंथालय पूर्णपणे सार्वजनीक असणे गरजेचे आहे.

ग्रंथालयातील पुस्तके वाचून लोकांचा जास्तीत जास्त फायदा होत असेल तर खऱ्या अर्थाने ग्रंथालय आजचे देवालय होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आजचे जग हे डिजिटल जग झाल्यामुळे  मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा गोष्टींचा जास्त वापर केला जात आहे. त्यामुळे आजची पिढी ग्रंथालयांमध्ये जाऊन पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाईल सारख्या गॅजेट्स मधील ज्ञान प्राप्त करून घेण्याकडे जास्त भर देत आहेत.

याच कारणामुळे आपल्या देशातील ग्रंथालयांचे संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परंतु ग्रंथालय व्यक्ती, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे ठरतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ग्रंथालय आजचे देवालय  आहे  हेही विसरून चालणार नाही. म्हणून प्रत्येकाने ग्रंथालयाचे महत्व समजून ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध ” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध “‌ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment