माझा आवडता विषय गणित निबंध मराठी | My Favourite Subject Maths Essay in Marathi

माझा आवडता विषय गणित निबंध मराठी | My Favourite Subject Maths Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो! आपले…….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता विषय गणित निबंध मराठी | My Favourite Subject Maths Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता विषय गणित निबंध मराठी | My Favourite Subject Maths Essay in Marathi

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात. प्रत्येक विषयाचे आपली काही विशिष्ट विशेषता असते आणि त्या विषयातून बरेच ज्ञान मिळाले जाते जे आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडते.

परंतु शाळा महाविद्यालय मध्ये शिकवले जाणारे या विषयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा आवडता असा एक विषय असतो. काहीजणांना मराठी विषय खूप आवडतो तर, काहीजणांना इंग्रजी.

तसेच सर्वसामान्यांना प्रमाणे शाळेत असताना मला गणित विषय खूप आवडायचा. म्हणूनच आर्टिकल मध्ये आणि माझा आवडता विषय गणित यावर मराठी निबंध घेऊन आलो.

साधारणता मूल जेव्हा शाळेला जाते तेव्हा पासून ते पूर्ण शिक्षण होईपर्यंत गणिताचा संहवास मध्ये आसा्ते. लहानपणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारखे गणिताचे सोपे सोपे उदाहरणे सोडवण्यासाठी दिली जातात.

यातूनच विद्यार्थ्यांना गणिता बद्दल आवड निर्माण होते. सुरुवातीला मला गणिताची आवड फारशी नव्हती आणि जसा जसा मी मोठा होत गेलो तसा मला गणिताचे आवड निर्माण झाली. मला आठवण आहे जेव्हा मी इयत्ता पहिली मध्ये होतो तेव्हा सरांनी प्रथमता एक ते शंभर अंक वाचन करण्यास सांगितले.

त्यानंतर घरी माझ्या आईने मला एक ते पन्नास पर्यंत अंक शिकवले. हे अंक असे करत असताना माझ्या मनामध्ये गणिताबद्दल आवडता निर्माण झाली व मी एका दिवसामध्ये गणिताचे एक ते शंभर अंक पाठ केले. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसोबत मी हे अंक मनून दाखविले तेव्हा सरांनी मला शब्बास की दिली. ही शब्बास की, माझ्या आयुष्यातील हे माझे पहिले कौतुक ठरले.

सुरुवातीला सर्वांप्रमाणे मला गणित विषय खूप अवघड वाटला. परंतु गणित विषयाची आवड निर्माण करणे मध्ये माझ्या आईचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण, स्वयंपाक करताना ती घरातील वस्तू जसे की, फळे, चमचा, शेंगाचे दाणे, चपाती किंवा भाकरी इत्यादी मोजून माझा गणिताचा पाया भक्कम करीत.

यानंतर हळूहळू माझ्यामध्ये गणिताची आवड वाढू लागली. माझी गणित विषयाबद्दल आवड पाहून आई-बाबांनी मला गणिताचे क्लास लावले.

यानंतर शाळेत होणाऱ्या विविध गणिती स्पर्धांमध्ये मी भाग घेऊ लागलो. इयत्ता चौथीमध्ये असताना मी स्कॉलरशिप ची परीक्षा दिली. व या परीक्षांमध्ये गणित विषयांमध्ये मला 100 पैकी 92 मार्क मिळाले.

त्यानंतर मी ठरवले की, मला माझे करियर हे गणित विषया मध्येच करायचे आहे. गणित विषयातील अवघड उदाहरणे सोडवणे, पाढे पाठ करणे, गुणाकार – भागाकार करणे मला फार आवडते. मला असे वाटते की, गणित विषयामुळे बुद्धीला चालना मिळते आणि बुद्धी अजून तर्कशुद्ध होते.

गणिताची आवड माझ्यासाठी एक उत्तम संधी झाली. कारण, मी मॅथ ऑलिंपियाड मध्ये भाग घेतला होता आणि यामध्ये मला चांगले गुण मिळाले. या परीक्षांमध्ये मला चांगले मार्क मिळाल्यामुळे शाळेतर्फे मला आंतरशालेय गणित ऑलिंपियाड मध्ये पाठवणार आहे.

गणित विषयाचा अभ्यास करायला मला खूप आवडते मी स्वतः गणित विषयाचा अभ्यास करत असतो आणि या विषयांमध्ये मला पैकीच्या पैकी गुण मिळतात. इतकेच नव्हे तर मी गणित विषया सोबत इतर विषयाचा अभ्यास सुद्धा मन लावून करतो.

मला गणितातील सर्व प्रकारची गणिते सोडवता येतात तसेच माझे बरेच वर्गमित्र मला गणितात आलेला त्यांच्या समस्या माझ्या कडून सोडवून घेतात. आणि मी या सर्वांची मदत करीत असतो.

एवढेच नसून मी, गणितातील अवघड प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना मदत करीत असतो. माझी गणिताची आवड पाहून सर्वजण मला गणितातील शास्त्रज्ञ असे म्हणतात. आणि माझी इच्छा आहे की मी मोठे होऊन गणितातील एक उत्तम तज्ञ बनावे‌.

आपल्या देशामध्ये अनेक गणिती शास्त्रज्ञ होऊन गेले.  प्रत्येक शास्त्रज्ञाने नवीन नवीन काही ना काही शोध लावला आणि त्यांचा शोधांचा वापर आपण आजही आपल्या जीवनामध्ये उपयोग करतो. माझी इच्छा आहे की मी मोठे होऊन गणिती शास्त्रज्ञ होऊन आपल्या देशासाठी काहीतरी शोध लावावेत. आणि माझ्या या गणिती  शोधांमुळे आपल्या देशाचे नाव आणि माझ्या आई-बाबांचे नाव उंच व्हावे ही माझी इच्छा आहे.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता विषय गणित निबंध मराठी | My Favourite Subject Maths Essay in Marathi ” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता विषय गणित मराठी निबंध | maza avadta vishay marathi nibandh “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “माझा आवडता विषय गणित निबंध मराठी | My Favourite Subject Maths Essay in Marathi”

Leave a Comment