माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My Favourite Parrot Bird Essay in Marathi

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My Favourite Parrot Bird Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे.या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझा आवडता पक्षी पोपट ( My Favourite Parrot Bird Essay in Marathi )” घेऊन आलेत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My Favourite Parrot Bird Essay in Marathi

पक्षी म्हटले की कोणाला आवडत नाही, या संपूर्ण सृष्टी वर प्रत्येकाला कुठलाना कुठला पक्षी हा आवडतच असतो. कारण पक्षी हे असतातच एवढे सुंदर की, त्यांचे ते रुप पाहून प्रत्येक जण मोहित होतो तसा त्यांचा आवाज देखील मनाला मोहित करणार असतो. पक्ष्यांचे रुप, रंग आणि त्यांचा आवाज हा खूप आकर्षित असतो.

सर्वसाधारण प्रमाणेच ” माझा आवडता पक्षी पोपट “ आहे.

कारण मला पोपटाचा रंग फार आवडतो आणि त्याचा आवाज सुद्धा म्हणून पोपट हा माझा आवडता पक्षी आहे.

पोपटाला इंग्रजी भाषेत पॅरेट ( Parrot ), हिंदीमध्ये तोता आणि मराठी मध्ये पोपट असे म्हणतात.

पोपट भारतात सर्वत्र बघायला मिळतो, पोपट या पक्षाला भारतात राघू , मिटू, मैना च्या नावाने ओळखले जाते. भारता प्रमाणेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये पोपट पहायला मिळतो.

जगभरत पोपट निळा, पांढरा, गुलाबी, पिवळा, लाला अशा वेगवेगळ्या रंगाचा आढळतो. परंतु भारतात आढळणारा पोपट हा मुख्यतः हिरव्या रंगाचा असतो.

पोपटाच्या वजन सुमारे 110 ग्रॅम भरते, तसेच पोपटाची संपूर्ण उंची म्हणजे शेवटी पासून ते डोक्या पर्यंतची  ही 16 ते 35 सेमी असते. व पोपटाचा जीवन काळ हा 8 ते 40 वर्षाचा असतो.

म्हणून भारतात आढळणारा हा हिरव्या रंगाचा पोपट मला खूप आवडतो. संपूर्ण शरीराने हिरवा आणि चोच फक्त गडद लाल रंगाची असणारा हा पोपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आकर्षक करतो. पोपटाच्या या हिरव्या रंगाबद्दल एक अख्यायिका आहे ती म्हणजे अशी-

देवाने पोपटाला हिरवा रंग का दिला या मागचे कारण म्हणजे, पूर्वी कुठल्याही पक्षांना रंग नव्हता सगळे पक्षी रंगहिन होते. त्यामुळे शिकारी जंगलात येत व पक्षांची शिकार करून घेऊन जात होते.

त्यामुळे सर्व पक्षांनी श्रीगणेश देवाकडे विनंती केली, तेव्हा गणपती बाप्पा ने ठरवले की सर्व पक्षांना आता रंग द्यायचे.  त्यामुळे गणपती बाप्पा नी  सर्वप्रथम पोपटाला विचारले तुला कुठला रंग हवाय?

पोपट हा सर्व पक्षांमध्ये हुशार असल्याने पोपटाने हिरवा रंग मागितला त्यासोबतच पोपट म्हणाला की, ” माझे पूर्ण शरीर हिरव्या रंगाचे आणि चोच फक्त लाल रंगाची असावी.”

त्यामुळे मी हिरव्या झाडावर राहून सुद्धा मी शिकाऱ्यांच्या दृष्टीस पडणार नाही व माझे शरीर पण रंग सर्वांना आवडेल. अशा प्रकारे पोपटाने स्वतःच्या चतुराईने हिरवा रंग आणि लाल चोच घेतली,व सर्व पक्षांमध्ये एक आकर्षित पक्षी बनला.

पोपटाचे सुंदर रूप पाहून अलीकडे पोपटाला पाळीव प्राण्यां प्रमाणे पाळले जात आहे. म्हणून बहुतेक पक्षी प्रेमींच्या घरात पोपट हा पक्षी पिंजरा मध्ये आढळतो.

परंतु पोपटाच्या मुख्य घरट्याला ‘ ढोली ‘ असे म्हणतात. पोपटाची ढोली ही झाडांच्या पोकळीत असते. उंच झुपकेदार पाने असणाऱ्या झाडांवर पोपटाला राहायला आवडतं.

पोपटाचा आवाज मिठू मिठू असा असतो ,त्यामुळे सर्व लहान मुले पोपटाकडे आकर्षित होतात. पोपटाचे हे मिठू मिठू बोलले सर्वांना फार आवडते.

पोपटाच्या या मिठू मिठू आवाजामुळे पोपटाला सर्कशीत अथवा घरामध्ये ठेवतात. पोपट आपल्या मनुष्याचे बोलण्याचे हुबेहूब परिवर्तन त्याच्या आवाजात करू शकतो. त्यामुळे भविष्य बघण्या मध्ये पोपटाचा वापर करून पैसे कमावतात. पोपटाची ही बोलण्याची कला इतर कुटल्याही पक्ष्या मध्ये पाहायला मिळत नाही.

पोपटाचे खाद्य म्हणजे फळे असतात, फळे खाणे पोपटाला खूप आवडते. विशेषता आंबा, डाळिंब, पेरू ही फळे पोपट आवडीने खातो. त्यासोबतच मिरची पोपटाला फार आवडते. तसेच इतर पक्ष्यांप्रमाणे पोपट दाणे, बिया, शिजलेले अन्न इत्यादी पदार्थ खाद्य म्हणून खातात.

पोपट हा पक्षी समूहाने राहतो आणि समूहाने आकाशात विहार करतो. पोपटाच्या या समूहाने राहण्याच्या गुणा मुळे पोपटावर एक कथा सुध्दा आहे ती म्हणजे ” शिकारी आणि पोपटाचा थावा “, तसेच पोपट या पक्षाबद्दल अनेक बालकथा सुद्धा आहेत. या कथा तून लहान मुलांना लहान वयातच पोपट या पक्षाबद्दल आपुलकी निर्माण होते.

जगभरात सुमारे पोपटाच्या ३०० पेक्षा ( तीनशे पेक्षा ) अधिक प्रजाती आढळतात. पण अलीकडे वाढती लोकसंख्या त्यामुळे होणारे प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे या पक्षांच्या प्रजातींची संख्या कमी होत आहे. पक्षी हे निसर्गाने दिलेले सुंदर देणगी आहे, मग कुठलाही पक्षी असू द्या.

त्यासोबतच शिकारी अशा पक्षांची शिकार करतात यामुळे सुद्धा पोपटांचे संख्या कमी होत आहे, काही लोक पोपटाला ना बंदिस्त पिंजरा मध्ये ठेवतात. त्यांना गुलाम बनवतात, त्यांची स्वातंत्रता हिसकावून घेतात.

परंतु पोपट झाडावर राहतो.त्यामुळे आपण या पोपटाला बंदिस्त न ठेवता त्यांना स्वतंत्रपणे संचार करण्या साठी सोडले पाहिजे. त्या सोबतच पोपटचे मुख्य निवास स्थान असलेली झाडे वाचविण्यासाठी  वृक्षतोड थांबवली पाहिजे सोबतच प्रदूषणही कमी केले पाहिजे.

त्यांना आकाशात निर्भयतेने उंच भरारी घेऊ दिली पाहिजे. पोपटाला घरामध्ये पिंजऱ्यामध्ये बंदिस्त न ठेवता आकाशात सोडले पाहिजे. पक्षी हे निसर्गाची शोभा त्यामुळे त्यांना निसर्गातच राहू दिले पाहिजे. त्यांना निसर्गात ठेवून निसर्गाची शोभा  वाढवली पाहिजे व पक्षाच्या सौंदर्याचे कौतुक केले पाहिजे.

अशा प्रकारे माझा आवडता पक्षी पोपट आहे त्यामुळे त्याच्या रक्षणाची जबाबदारी ही सुद्धा माझी वैयक्तिक आहेच. माझ्या सोबतच अनेक पक्षी प्रेमी किव्वा पोपट प्रेमी यांनी या पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे एक दिवस नक्कीच या पक्ष्यांची संख्या वाढेल.


तर मित्रांनो ! ” माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध ( My Favourite Parrot Bird Essay in Marathi) “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता पक्षी पोपट ” ( My Favourite parrot Bird Essay in Marathi) “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 धन्यवाद मित्रांनो  !

Leave a Comment