माझे आवडते शिक्षक मराठी निबंध । My Favorite Teacher Marathi Essay
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला व बुद्धिमत्तेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी शिक्षक करत असतात. घरामध्ये आई- वडील विद्यार्थ्यांचे पहिले शिक्षक जरी असले तरी सुद्धा शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनाही खूप महत्त्वाचे स्थान आहे.
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध । My Favorite Teacher Marathi Essay
विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जरी अनेक शिक्षक शिकवत असले तरी त्यामधील प्रत्येक शिक्षकातील एखादया शिक्षक हा आपल्या पसंतीचा, आवडीचा असतो. त्या शिक्षकांचे शिकवणे त्यांचे बोलणे विद्यार्थ्यांना आवडत असते तर आजच्या निबंधामध्ये आपण याच विषयावर निबंध बघणार आहोत.
माझे आवडते शिक्षक :-
शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात. जीवनाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मार्ग दाखविण्याचे काम शिक्षक करत असतात.
आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते बघायला मिळत आलेले आणि भारतीय संस्कृती मध्ये शिक्षकाला देवाचा दर्जा दिला जातो.
आणि शिक्षकांच्या हातात उद्याचे भविष्य असते असे समजले जाते त्या मागचे कारण म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षक करतात, त्यांना ज्ञान देतात. उद्याचे डॉक्टर, इंजिनीयर व इतर पदवी शिक्षक घडवण्याचे काम हेच शिक्षक करीत असतात. एक शिक्षकच विद्यार्थ्यांना चांगल्या- वाईट गोष्टींचा विचार करण्याची क्षमता विकसित करतात.
प्रत्येक शिक्षकांचा विचार असतो की आपला विद्यार्थी जास्तीत जास्त ज्ञान घेऊन प्रगती करून आपले शिक्षकाचे शाळेचे किंवा महाविद्यालयाचे नाव उंच करावे. आणि असेच शिक्षक माझ्या शालेय जीवनात आहेत आणि त्यांना माझ्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण महत्त्वाचे स्थान आहे. आणि मी प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाणार आणि माझे आयुष्य घडविणार.
माझ्या शाळेचे नाव ” गांधी विद्यालय” आहे आणि ते कोल्हापूर मध्ये स्थित आहे. आणि इथे आम्हाला प्रत्येक विशेष शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. त्यातील माझ्या आवडते शिक्षकांचे नाव मनमोहन पाटील सर आहे. ते मला विज्ञान विषय शिकवितात.
त्या सरांची व्यक्तिमत्व, बोलण्याची पद्धत, प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेण्याची सवय, आणि महत्वाचे म्हणजे शिकवण्याची पद्धत आणि तुमचा स्वभाव त्यामुळे मला त्या सरांबद्दल मनामध्ये आदराची भावना निर्माण झाली आणि मी पाटील सरांबद्दल प्रभावित झालो आहे.
सर्व विद्यार्थ्यांना एक समान नजरेने बघण्याचा दृष्टिकोन आहे सरांचा कोणामध्ये भेदभाव न करता अतिशय प्रेमळ आणि दयाळू पणा ने सर विद्यार्थ्यांची काळजी घेत असतात.
मनमोहन पाटील सरांची विज्ञानातील रिएक्शन ( Reaction) शिकवण्या मध्ये विशेष काळजी घेतात. सरांनी शिकवलेल्या प्रत्येक धडे ( Chapter , Concept ) आणि ( Reaction) एवढ्या योग्य पद्धतीने कळते की ते पुन्हा अभ्यास करण्याची आवश्यकता आम्हा विद्यार्थ्यांना पडली नाही.
आमचे सर आम्हा विद्यार्थ्यांन सोबत एक शिक्षक कमी पण मित्र समजून लागतात. अभ्यास- सोबत समाज मध्ये कसे वागावे याचे धडे पाटील सर आम्हाला अनेक उदाहरणांद्वारे सांगत असतात.
आम्ही कुठे चुकलो तर सर वेळेवर आम्हाला रागवतात व ते चूक पुन्हा करू नये म्हणून समजून सांगत असतात. सर जेवढे प्रेम आहेत तेवढेच रागीष्ट स्वभावाचे देखील आहेत. अभ्यास न केल्यास त्या त्या वेळेला रागवतात सुद्धा आणि गरज पडल्यास शिक्षा म्हणून संपूर्ण शाळेचे मैदान स्वच्छ करून घेतात.
पाटील सरांना विज्ञान विषयांमधील सखोल ज्ञान आहे. कुठलीही अडचण असल्यास सर समजावून सांगतात. विज्ञान विषयात झालेले चमत्कार. अनेक शास्त्रज्ञांनी केलेले वेग- वेगळे प्रयोग यांचे ज्ञान सर आम्हाला सतत देत असतात.
त्या बरोबरच वर्तमान पत्रामध्ये एखादा नवीन प्रयोग कोणी केला असल्यास सर ते ही आम्हाला सांगतात अर्थात, चालू घडामोडींची माहिती सरांकडून वेळेवर आम्हाला मिळत असते.
विज्ञान विषयाव्यतिरिक्त ही दुसऱ्या विषयाचे ज्ञान सरांना आहे त्यामुळे मी मला कुठल्याही विषयांमध्ये अडचण आल्यास पाटील सरांचा सल्ला घेतो व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत असतो.
आमच्या वर्गात एखादा विद्यार्थी मंद बुद्धीचा असल्यास सर त्याला कमी न लेखता दुसऱ्या विद्यार्थ्याप्रमाणेच त्या विद्यार्थ्यास ही समजून सांगतात.
अभ्यास कसा करावा याचे ज्ञान देतात. कोणास अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर तो विद्यार्थी सरांना जाऊन त्याची अडचण सांगतो तर त्यावर उपाय म्हणून एकाग्रता वाढवण्याचे मार्ग सांगतात योगा, ध्यान करण्यासाठी सांगतात. भाषा, विषयापेक्षा विज्ञान विषयाकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कल द्यावा या कडे सर जास्त लक्ष देतात.
प्रयोगशाळेमध्ये सुद्धा एखादा प्रयोग सुरुवातीला सर स्वतः करतात व नंतर विद्यार्थ्यांना करण्यासाठी सांगतात जर कोणाला कळाले नसेल तर सर पुन्हा पुन्हा सांगण्यात कंटाळा न करता.
आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समजून सांगत असतात. व आम्ही सर सांगताना लक्ष देऊन ऐकत असतो. पाटील सर अभ्यासाला जेवढे लक्ष देण्यास प्रोत्साहन देतात तेवढेच ते खेळ खेळण्यासाठी सांगत असतात. सरांच्या मध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ मोठी भूमिका बजावतात.
म्हणून आमच्या शाळेत आठवड्यातून तीन तास खेळ खेळायला घेतले जातात व वर्षातून एक आठवडा क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याच बरोबर सरांच्या मते विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान असणे सुद्धा गरजेचे आहे. म्हणून पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये दर वर्षी अनेक स्पर्धांचे आयोजन सुद्धा केले जाते, जनरल नॉलेज च्या स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गॅदरिंग इत्यादींचे आयोजन सुद्धा सर करत असतात.
सर ज्या पद्धतीने मुलांना समजवत असतात तसेच ते मुलींना ही मार्गदर्शन करत असतात. व काही मुलींचे ही आवडते व आदर्श शिक्षक म्हणून सरांना ओळखले जातात.
सर नेहमी म्हणत असतात की मारहाण करून सांगण्यापेक्षा प्रेमाने व हसत खेळत सांगितल्यास विद्यार्थ्यांना लवकर समजते आणि माझ्या मते ते एकदम बरोबर आहे.
आमच्या शाळेत आदर्श शिक्षकांचा पुरस्कार सुद्धा पाटील सरांना दिला आहे. पाटील सर एक परिपूर्ण विद्यार्थी कसा घडेल याकडे लक्ष देतात. आणि आम्ही सुद्धा सरांच्या या कल्पनेला साथ देतो. सर सामाजिक दृष्ट्या सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.
आमच्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना वही, पुस्तक, पेन आणि गणवेश साठी आर्थिक दृष्ट्या सर मदत करत असतात. आणि आम्हाला सुद्धा त्यासाठी उत्साहित करतात.
समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे उपक्रम ” झाडे लावा, झाडे जगवा”, ” पाणी आडवा, पाणी जिरवा”, ” स्वच्छतेचे महत्व” या उपक्रमांमधून जनजागृती करण्याचे त्यांचे विचाराला आम्हा विद्यार्थ्यामार्फत सर चालना देतात.
अशा ह्या माझा आदर्श आणि आवडत्या शिक्षका साठी आम्ही विद्यार्थी ५ सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व साठी नमस्कार करत असतो.
पेन किंवा डायरी किंवा फुल, गुलदस्ता देऊन सर्वांचे आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थी थोडे- थोडे पैसे जमा करून सरांसाठी व विद्यार्थ्यांसाठी काही गोड मिठाईचे नियोजन करतो व सरांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत असतो.
अशा प्रकारे आयुष्यात घडविताना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता प्रत्येकाला असते. पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली माझे आयुष्य घडवण्याची चालना मिळाली पाटील सरांसारखे आदर्श शिक्षक मला लाभले हे माझे नशीबच !
माझ्या पुढील भविष्यकालीन जीवन काळात अनेक शिक्षक मला मिळतील प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळेल काही माझे आवडते शिक्षक होतील पण माझ्या आजवरच्या जीवनामध्ये मला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा वारसा हा पाटील सरांनीच जपला आहे
आणि मी सुद्धा भविष्यामध्ये सरांनी दिलेल्या ज्ञानाचा, संस्काराच्या आधार वरच माझे पुढील भविष्य जगेल आणि हृदयात असलेले पाटील सरांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही हे मात्र नक्कीच !
आजवर ऐकत आलो होतो की भविष्य आणि करियर घडवण्या मागे आपला परिवार आणि शिक्षकांचा खूप मोठा वाटा ( जबाबदारी ) असतो. आणि पाटील सरांच्या सहवासामध्ये राहिल्याने कळाले की
जे ऐकत आलो ते एकदम बरोबरच होते आणि आज मला हे कळाले की आयुष्यामध्ये शिक्षकांचा दर्जा काय असतो त्यांचे महत्त्व काय असते म्हणून,
मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक शिक्षकांचा मान ठेवील त्यांची इज्जत करेन आणि सरांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल चांगल्या- वाईट गोष्टीची परख करेन. आणि मी सुद्धा भविष्यामध्ये पाटील सरांसारखेच चांगले व्यक्तिमत्व घडवण्याचे प्रयत्न करेन
आणि माझे आवडते शिक्षक पाटील सर हे नाव माझ्या जीवनामध्ये कायमस्वरूपी अमर राहील हे मात्र नक्कीच !
ये देखील अवश्य वाचा :-
- दिवाळी सणाची माहिती
- शिक्षणाचे महत्व मराठी निबंध
- शिक्षक दिवस
- भारता मधले खेळांची माहिती
- भारतातील विविध प्रकारचे पिकांची माहिती
धन्यवाद मित्रांनो !